असे होते पंडित नेहरू…
निर्मिती – गिरीष दारुंटे सर, मनमाड (नाशिक)
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. हॅरो व केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेऊन नेहरू 1912 मध्ये – ची परीक्षा उत्तीर्ण झाले. भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली न करता स्वातंत्र्याच्या आंदोलनात स्वतःला झोकून दिले.
गांधीजींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. 1912 मध्येच ते कॉंग्रेसचे सदस्य झाले. 1920 मध्ये प्रतापगड येथे शेतकऱ्यांच्या मोर्चाला संघटित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात केलेल्या आंदोलनात ते जखमी झाले होते. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहातही ते सहभागी झाले होते. त्यांना अटक करून सहा महिन्यांसाठी तुरूंगात पाठविण्यात आले. 1935 मध्ये झालेल्या अटकेवेळी त्यांना अल्मोडा येथील तुरूंगात ठेवले होते. तिथे त्यांनी आत्मचरित्र लिहिले.
1942 च्या आंदोलनात 9 ऑगस्ट 1942 ला त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांना अहमदनगरच्या तुरूंगात ठेवण्यात आले. तेथून 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांनी नऊ वेळा तुरूंगवास भोगला.
स्वातंत्र्यापूर्वी झालेल्या हंगामी सरकारमध्ये आणि स्वातंत्र्यानंतरही ते देशाचे पहिले पंतप्रधान झाले. 27 मे 1964 ला त्यांचे निधन होईपर्यंत ते या पदावर होते. नेहरूंच्या कार्यकाळात लोकशाही मजबूत करणे, देश व घटनेतील धर्मनिरपेक्षता कायम करणे आणि विविध योजनांच्या माध्यमातून देशाचा विकास करणे आदी कामे करण्यावर भर देण्यात आला.
त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. पंचशील तत्वेही त्यांनी मांडली. १९५४ मध्ये त्यांना भारत रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत तटस्थ राष्ट्रांचा गट बनविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
वरील भाषणाची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा… CLICK HERE
Pdf व संकलन : गिरीष दारुंटे सर, मनमाड (नाशिक)