पाठ – 7
आठवणींचे गाव
कवी– सदानंद सिनगार
नवीन शब्दार्थ :
आमराई – आंब्याच्या झाडांची बाग
पार — झाडाच्या भोवतीचा कट्टा
अथांग – अतिशय खोल
सुरपारंब्या – वडाच्या पारंब्यावर खेळला जाणारा एक खेळ.
आकांक्षा – अपेक्षा
आपुलकी – प्रेम, ममता, आपलेपणा
गर्द – दाट
माड – नारळाचे झाड
स्वाध्याय
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1. जिव्हाळ्याच्या घराभोवती काय असावे ?
उत्तर – जिव्हाळ्याच्या घराभोवती पिंपळाचा पार असावा.
2. पापणीचा किनारा कशानी भिजतो?
उत्तर – पापणीचा किनारा हिरव्या पाऊलवाटांनी भिजतो.
3. गोठ्यात कोण कोण असावे असे कवीला वाटते ?
उत्तर – गोठ्यात कपिला गाय,ढवळ्या – पवळ्या ही बैलजोडी हे
सर्वजण असावे असे कवीला वाटते.
4. कवी कोठे जाणार आहे?
उत्तर – कवी आठवणींच्या गावात जाणार आहे.
आ. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिही.
1. आनंदाला भरती केव्हा व कशी यावी ?
उत्तर – आठवणींच्या गावात गर्द आमराई असावी.निळे निळे आकाशही
असावे.तिथे एकमेकासोबत रुसत फुगत सुर पारंब्या खेळताना आनंदाला भरती यावी असे
कवीला वाटते.
2. ‘तिथे
असावा अथांग सागर
आकांक्षांचे
माड असावे,
दिल्या
– घेतल्या सुखदुःखाचे
आठवणींचे
झाड असावे.
(वरील ओळींचा अर्थ तुझ्या शब्दात लिही.
उत्तर – कवीला असे वाटते कि आठवणीच्या गावात अथांग समुद्र
असावा,अपेक्षांचे माड असावेत आणि एकमेकाला दिलेल्या व घेतलेल्या सुखदुःखाचे
आठवणीचे झाड असावे.
इ.कवितेत आलेली खालील शब्दांची विशेषणे ओळखून
लिही.
1. अथांग सागर
2. गर्द आमराई
3. निळा पोपटी पहाटवारा
4. हिरव्या पाऊलवाटा
5. मोरपिसांचा पदर
ई. खालील शब्दांना येणारे समानअर्थी शब्द निवड व
रिकाम्या जागी लिही.
1. आंब्याची बाग –
आमराई
2. प्रेम,आपलेपणा – आपुलकी
3. मान, वडीलधाऱ्यांचा हा करावा. – आदर
4. लक्षात ठेवणे, सय – आठवण
5. अन्न, हा प्रत्येक सजीवाला आवश्यक असतो. – आहार
6. आपल्याला बसण्यासाठी याची आवश्यकता असते. – आसन