इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
घटक – 5
आम्ले, अल्कली आणि क्षार
स्वाध्याय
1. आम्ल आणि
अल्कलीतील फरक लिहा.
आम्ल | अल्कली |
चवीला आंबट असतात. | चवीला कडू असतात. |
निळा लिटमस तांबडा बनतो. | तांबडा लिटमस निळा बनतो. |
उदाहरणे: दही, लिंबू रस आणि व्हिनेगर. | उदाहरणे: बेकिंग सोडा आणि साबण. |
2. अनेक
घरगुती उत्पादने, जसे की खिडकी स्वच्छके
इत्यादीमध्ये अमोनिया दिसून येतो. हे तांबड़ा लिटमस निळा बनविते. तर याचे गुणधर्म काय
आहेत ?
उत्तरः
अल्कली तांबडा लिटमस निळा करतात,म्हणून अमोनियायुक्त घरगुती उत्पादने ही अल्कधर्मी आहेत.
3. ज्यापासून लिटमस द्रावण मिळते त्या स्रोतांची नावे सांगा. त्याच्या द्रावणाचे
उपयोग काय?
उत्तरः
लिटमस हे एक नैसर्गिक सूचक आहे. लिटमस द्रावण हे दगड फूलापासून मिळते.
हे द्रावणाच्या स्वरूपात किंवा कागदाच्या पट्ट्यांच्या
स्वरूपात उपलब्ध असते.एखादे द्रावण आम्लधर्मी, अल्कधर्मी किंवा उदासीन आहे हे लिटमस पेपरचा उपयोग करून
तपासता येते.वेगवेगळ्या द्रावणात लिटमस पेपर वेगवेगळ्या रंगाचा बनतो.
द्रावण | लिटमस पेपर |
आम्लधर्मी | तांबडा |
अल्कधर्मी | निळा |
उदासीन | रंग बदलत नाही |
4. उर्ध्वपातीत पाणी आम्लधर्मी / अल्कधर्मी / उदासीन असते का ? तुम्ही याची खात्री कशी कराल?
उत्तरः
उर्ध्वपातीत पाणी उदासीन असते.तांबडा आणि निळ्या लिटमस कागदांचा वापर करून हे
सिद्ध केले जाऊ शकते.उर्ध्वपातीत पाण्यामध्ये निळा व तांबडा लिटमस पेपर बुडवल्यास दोन्ही
पेपरचा रंग न बदलता आहे तसाच राहतो.यावरून सिद्ध होते की उर्ध्वपातीत पाणी उदासीन
असते.
5. उदासिनीकरणाची प्रक्रिया एक उदाहरण देऊन स्पष्ट करा.
उत्तर
: उदासिनीकरण क्रियेत आम्ल व अल्कली या दोन्हींचे गुणधर्म नष्ट होतात.आम्लाची अल्कलीशी
रासायनिक क्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होते. या क्रियेलाच उदासिनीकरण असे म्हणतात.या
क्रियेत उष्णता निर्माण होते.
6.खालील
विधाने बरोबर असल्यास (a) लिहा व चूक असल्यास
(x) लिहा.
(i) नैट्रीक आम्लामध्ये लाल लिटमस निळा होतो. (x)
(ii) सोडीयम हैड्रॉक्साईड द्रावणामध्ये निळा लिटमस लाल होतो. (x)
(iii) सोडीयम हैड्रॉक्साईड आणि हैड्रोक्लोरीक आम्ल एकमेकांना उदासीन करून क्षार व
पाणी बनवितात. (a)
(iv) जो आम्लधर्मी आणि अल्कधर्मी द्रावणामध्ये रंग दर्शवितो
तो सूचक पदार्थ आहे. (a)
(v) ‘दात किडणे‘ यास कारणीभूत क्षार असतात. (x)
7. दोरजीच्या रेस्टॉरंटमध्ये शीतपेयांच्या काही बाटल्या आहेत.पण त्याच्यावर कोणतेही
लेबल नाही.ग्राहकांच्या मागणीनुसार पेय द्यावयाचे आहे. एका ग्राहकाला आम्लधर्मी पेय
पाहिजे, दुसऱ्याला अल्कधर्मी आणि तिसऱ्याला उदासीन पेय पाहिजे
तर दोरजी कसे निर्णय घेईल की कुठली बॉटल कुठल्या ग्राहकांना द्यावयाची आहे?
उत्तरः
दोरजी पेय चाखून निर्णय घेऊ शकतो.किंवा रेस्टॉरंटमधील शीतपेये आम्लधर्मी, अल्कधर्मी किंवा उदासीन आहे हे तपासण्यासाठी दोरजी लिटमस
पेपर चा वापर करू शकतो.
Ø ज्या शीतपेयात निळा लिटमस पेपर बुडवला असता तांबडा होतो,ते शीतपेय आम्लधर्मी आहे.
Ø ज्या शीतपेयात तांबडा लिटमस पेपर बुडवला असता निळा हातो,ते शीतपेय अल्कधर्मी आहे.
Ø ज्या शीतपेयात लाल व निळा हे दोन्ही लिटपस पेपर बुडविले असता आपला रंग
बदलत नाहीत,ते शीतपेय उदासीन
असेल.
8. कारणे सांगा. (a) जर तुम्ही पित्ताने पिडीत असाल तर तुम्ही
प्रत्याम्लाची गोळी घेता.
उत्तरः
पित्ताने पिडीत असताना प्रत्याम्लाची गोळी घेतली असता शरीरात स्त्रवलेल्या आम्लाशी
क्रिया करून आम्लाचे उदासीन करते व आराम देते आणि पित्ताचा त्रास कमी होतो.
(b) जेव्हा मुंगी चावते तेव्हा त्वचेवर कॅलॅमाइनचे द्रावण लावतात.
उत्तरःकारण
मुंगीच्या दंशात फॉर्मिक आम्ल असते.त्यामुळे त्वचेची आग होते.अशावेळी दंश झालेल्या
जागी कॅलॅमाइनचे द्रावण लावल्यास त्या आम्लाचे उदासिनीकरण होते व त्वचेची आग शांत
होते.म्हणून जेव्हा मुंगी चावते तेव्हा त्वचेवर कॅलॅमाइनचे द्रावण लावतात.
(c) कारखान्यातील टाकाऊपदार्थ जलाशयांना मिसळण्यापूर्वी त्याला
उदासीन केले जाते.
उत्तरः
अनेक कारखान्यांच्या कचऱ्यामध्ये आम्लधर्मी पदार्थ असतात.जर तो कचरा जलाशयामध्ये मिसळला
तर जलाशयातील जलचर प्राण्यांना धोका होऊ शकतो म्हणून कारखान्यातील टाकाऊपदार्थ जलाशयांना
मिसळण्यापूर्वी त्याला उदासीन केले जाते.
9.तुम्हाला
तीन द्रव दिलेले आहेत ज्यामध्ये एक हैड्रोक्लोरिक आम्ल आहे,दुसरे सोडीयम हैड्रॉक्साईड आणि तिसरे साखरेचे द्रावण आहे.तुम्ही
हळद सूचक म्हणून वापरून त्याची परीक्षा कशी कराल?
उत्तरः
हळदीचा रंग पिवळा असतो. हळद सूचक म्हणून वापरून तिन्ही द्रवांचे परीक्षण खालीलप्रमाणे
करू शकतो.
Ø हळदीवर हैड्रोक्लोरिक आम्ल टाकले असता हळदीचा रंग निळा होतो.
Ø हळदीवर सोडियम हैड्रॉक्साईड टाकले असता हळदीचा रंग लाल होतो.
Ø साखरे (सोडीयम हैड्रॉक्साईड)च्या द्रावणाचा हळदीवर कोणताही परिणाम होत
नाही.हळद पिवळीच राहते.
अशा प्रकारे हळद सूचक म्हणून वापरून दिलेल्या तीन द्रवातून हैड्रोक्लोरिक
आम्ल,सोडीयम हैड्रॉक्साईड व साखरेचे
द्रावण आपल्याला ओळखता येते.
10.निळ्या
लिटमस पेपरला एका द्रावणात बुडविले असता पेपर निळाच राहतो तर त्या द्रावणाचे गुणधर्म
काय? स्पष्ट करा.
उत्तरः
जर निळ्या लिटमस पेपरला एका द्रावणात बुडवल्यास निळा लिटमस कागदाचा रंग निळाच राहत
असेल तर ते द्रावण अल्कलीधर्मी किंवा उदासीन असू शकते.
जर लाल
लिटमस पेपरला त्या द्रावणात बुडविले असता पेपर निळा होत असेल तर ते द्रावण अम्लधर्मी
आहे असे समजावे.
11.खालील
विधाने लक्षपूर्वक वाचा.
(a) आम्ल आणि अल्कली दोन्ही सर्व सूचकांच्या रंगामध्ये बदल करतात.
(b) जर एक सूचक आम्लासोबत रंग बदल करत असेल तर तो अल्कलीसोबत रंग बदल करत नाही.
(c) जर सूचक अल्कलीसोबत रंग बदल करत असेल तर तो आम्लासोबत
रंग बदल करत नाही.
(d) आम्ल आणि अल्कलीमध्ये रंगबदल हे सूचकांच्या प्रकारावर
अवलंबून असते.
वरील विधानांमध्ये
कोणती विधाने बरोबर आहेत.
(i) सर्व चार
(iii) b आणि c
(ii) a आणि d
(iv) फक्त d
उत्तरः
(iv) फक्त d