इयत्ता – दुसरी
विषय – मराठी
पाठ – 1
प्रार्थना
नवीन शब्दांचे अर्थ
अजाण – समज नसलेला
नमितो – नमन करतो
माया – प्रेम
लेकरे – मुले
हौस – आवड
अभ्यास
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. आम्ही कोणाची लेकरे आहोत?
उत्तर – आम्ही
देवाची
लेकरे आहोत
२. देवाचे घर कोठे आहे ?
उत्तर – देवाचे
घर दाही दिशांना आहे.
३. देव सगळ्यांवर कशी माया करतो?
उत्तर – देव
सगळ्यांवर सारखीच माया करतो.
४. देवाची कोण कोण लेकरे आहेत?
उत्तर –सर्व मुले,पक्षी,प्राणी,फुले,फळे इत्यादी ही सर्व देवाची लेकरे आहेत.
५. लेकरांनी देवाकडे कोणती मागणी केली?
उत्तर – आम्ही सर्वांनी खूप शिकावे,काम करावे व एकमेकाशी
प्रेमाने वागावे अशी लेकरांनी
देवाकडे मागणी केली.
६. सर्वांचा पिता कोण ?
उत्तर – देव हाच सर्वांचा पिता आहे.
आ. कवितेतील ओळीवरुन उदाहरणाप्रमाणे शब्द लिही.
उदा. खूप शिकावे
काम करावे
प्रेम धरावे
इ. शिक्षकांच्या सहाय्याने दहा दिशांची नावे
लिही.
पूर्व पश्चिम
दक्षिण उत्तर
आग्नेय नैऋत्य
वायव्य ईशान्य
उ. खालील नमुन्याप्रमाणे कवितेतील नौदमधुर शब्द
शोधून
नमुना :- घर, वर
पाखरे – वासरे
नमितो – गातो
ऊ. खालील नमुन्याप्रमाणे लिहा.
नमुना :- गुरे – वासरे
1. फूले – फळे
2. घर – दार
3. पाला – पाचोळा
4. लपत – छपत
5. धर – सोड
ए. कंसातील योग्य अक्षर रिकाम्या जागी वापरुन
शब्द बनवा. आता तो शब्द उलट सुलट कसाही वाचा, त्या
शब्दांचा अर्थ दिला आहे.
स – स =(क, च, म) पौष्टिक आहार
उत्तर – सकस
न – न = (स, म, ल) नमस्कार
उत्तर – नमन
म – म = (श, ल, क) जखमेवर लावण्याचे औषध
उत्तर – मलम
क – क = (चि, णि, वि) गव्हाचे पीठ
उत्तर -कणिक
प्रार्थना या कवितेची प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा..