Chouthi 5. Mi Killa Bolatoy

 

           पाठ – 5  मी किल्ला बोलतोय 

Picture1

नवीन शब्दांचे अर्थ

Ø आयोजन – जुळवाजुळव करणे,ठरविणे

Ø नियोजन – तयारी करणे 

Ø  शिल्प कलाकृती –दगडातील कोरीव काम

Ø  जल विहार – पाण्यातून प्रवास करणे

Ø आनंद लुटणे – आनंद घेणे

Ø लाईफ जॅकेट – पाण्यात बुडू नये म्हणून घालायचा रबरी पोशाख

Ø कारंजी – पाण्याचे फवारे

Ø खंदक – किल्ला किंवा गाव यांच्याभोवती खणलेला चर,मोठा खळगा

Ø प्रवेशद्वार – मुख्य दरवाजा (आत जाण्यासाठी)

Ø पुरातन – प्राचीन खूप जुने

Ø गाभारा – देवळाच्या आतील (ज्यात मूर्ती असते तो) भाग

Ø सभामंडप – गाभाऱ्यापुढे असलेली जागा

Ø संघर्ष – भांडण,वाद

अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

1) राघव गुरूर्जीनी कशाचे नियोजन केले होते ?

उत्तर – राघव गुरूर्जीनी इयत्ता चौथीच्या वर्गाच्या सहलीचे  नियोजन केले होते.

2) सहलीला कोठे जायचे ठरविले होते ?

उत्तर – बेळगावीचा भुईकोट किल्ला येथे सहलीला जायचे ठरविले होते.

3) किल्ला कोणाशी बोलत होता ?

उत्तर – किल्ला लेखकाशी बोलत होता.

4) किल्ल्यात कोणकोणती मंदिरे आहेत ?

उत्तर – किल्ल्यात दुर्गामाता मंदिर,कमल बस्ती,रामकृष्ण मठ ही मंदिरे आहेत.

5) या किल्ल्यावर राज्य केलेल्या राजांची नावे कोणती ?

उत्तर – कदंब,राष्ट्रकूट,छत्रपती शिवाजी महाराज,इंग्रज यांनी या किल्ल्यावर राज्य केले.

आ) खालील प्रश्नांची उत्तरे ३-४ वाक्यात लिही.

 

1) सहलीमध्ये किल्ला परिसरातील कोणकोणती स्थळे पाहायचे ठरविले होते ?

उत्तर – सहलीमध्ये किल्ला परिसरातील दुर्गामाता मंदिर,रामकृष्ण मठ,,पुरातन कमलबस्ती इत्यादी स्थळे पहायचे ठरविले होते.

2) सहलीला येताना कोणते साहित्य आणण्यास सांगितले होते?

सहलीला येताना जेवणाचा दाबा,वही,पेन,वॉटर बॅग,छोटासा टॉवेल इत्यादी साहित्य आणण्यास सांगितले होते.

3) कमल बस्ती विषयी माहिती लिही.

उत्तर – कमल बस्तीची निर्मिती 13व्या शतकात रट्ट राजाने केली.या
बस्तीच्या गाभाऱ्यात नेमिनाथांची मूर्ती आहे
.या बस्तीमध्ये कमळ पुष्पांच्या सुंदर नक्षी आहेत.म्हणून या बस्तीला कमल बस्ती असे म्हणतात.

4) किल्ल्याच्या बाह्यरुपाचे वर्णन करा.

उत्तर – भुईकोटकिल्याभोवती खंदक खोदून एकप्रकारे किल्ल्याला संरक्षीत केले आहे. शत्रूला सहजपणे किल्ल्याला भिडता येऊ नये यासाठी केलेली ही खास योजना,खंदकामध्ये पाणी, मगरी, साप असे प्राणी सोडले जात,जेणेकरुन एक-प्रकारे भुईकोट किल्ल्याभोवती हे सुरक्षाकवच होते.

5) किल्ल्याने कोणती खंत व्यक्त केली ?

उत्तर – सामान्य माणसे खंदकात केरकचरा टाकून प्रदूषण करत आहेत.त्यामुळे माझे ऐतिहासिक महत्व कमी होत आहे.अशी
किल्ल्याने खंत व्यक्त केली.

6) ऐतिहासिक स्थळांचे रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे ?

उत्तर – ऐतिहासिक स्थळांचे महत्व लोकांना सांगणे. परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे.  

इ) गाळलेल्या जागी कंसातील योग्य शब्द भर. (कमलबस्ती, भुईकोट, 13व्या, प्रदूषण)

1) बेळगावी येथे भुईकोट किल्ला आहे.

2) हा किल्ला 13व्या शतकात बांधण्यात आला.

3) बेळगावीच्या किल्ल्यात असणाऱ्या बस्तीला कमलबस्ती म्हणतात.

4) प्रदूषण मुळे किल्ल्यांचे महत्व कमी होत आहे.

 

 

Share with your best friend :)