पाठ 1. अनंतशक्ती परमेश्वरु
शब्दार्थ :
हस्ती – हत्ती
जात्यंध – जन्मापासून अंध
सर्वज्ञ – श्रीचक्रधर स्वामी
दृष्टांत – दाखला, उदाहरण
पावो – पाय
मुसळ
– धान्य सडण्याचे एक साधन
उरोधिती – आपलेच म्हणणे खरे म्हणून वाद घालणे
एका वाक्यात उत्तरे
लिहा.
1.
अनंत शक्ति परमेश्वरु या पाठाचा
साहित्यप्रकार
कोणता?
उत्तर – अनंत शक्ति
परमेश्वरु या पाठाचा साहित्यप्रकार प्राचीन गद्य हा आहे.
2.
अनंत शक्ती परमेश्वरु या पाठाचे
लेखक कोण आहेत?
उत्तर – अनंत शक्ती
परमेश्वरु या पाठाचे लेखक केसोबास उर्फ केशिराज बास ही होय.
3.
केसोबास हे
कोणत्या शतकातील आहेत?
उत्तर –केसोबास हे तेराव्या शतकातील आहेत.
4.
महानुभव पंथाचे दुसरे आचार्य कोण होते?
उत्तर –महानुभव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य हे होते.
5.
महानुभाव पंथाचे संस्थापक कोण होते?
उत्तर –महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी हे होते.
6.
श्री चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत कोठे सांगितला?
उत्तर –श्री चक्रधर स्वामींनी हा दृष्टांत डोमेग्राम येथे सांगितला.
7.
सर्वज्ञ म्हणजे कोण?
उत्तर –सर्वज्ञ म्हणजे श्री चक्रधर स्वामी हे होय.
8.
अनंत शक्ति परमेश्वरु या पाठाचे मूल्य कोणते?
उत्तर –अनंत शक्ति परमेश्वरु या पाठाचे मूल्य ज्ञान,उत्सुकता हे
आहे.
दोन ते तीन वाक्यात
उत्तरे लिहा.
1.
अनंत शक्ती परमेश्वर या कथेचे तात्पर्य–
उत्तर –ज्याला जी शक्ती प्रकाशली,त्या शक्तीलाच तो परमेश्वर मानतो.ज्ञानी मनुष्य मात्र म्हणतो की ही
परमेश्वराची एक शक्ती होय.पण परमेश्वर नव्हे.अशा सर्व
शक्तीने युक्त असा परमेश्वर असतो.
चार ते पाच वाक्यात
उत्तरे लिहा
1. डोळस मनुष्य आंधळ्यांना काय म्हणाला?
उत्तर – गावांमध्ये हत्ती आला असता.हत्ती पाहण्यासाठी गावातील जन्मांध लोक गेले होते.त्यामध्ये पाय
पाहिलेला म्हणाला ‘हत्ती खांबासारखा’!,सोंड पाहिलेला म्हणाला ‘हत्ती मुसळासारखा’! ,कान
पाहिलेला म्हणाला ‘हत्ती सुपासारखा’! पाठ पाहिलेला म्हणाला ‘हत्ती भिंतीसारखा’ पोट
पाहिलेला म्हणाला ‘हत्ती कोथळ्यासारखा’! शेपूट पाहिलेला म्हणाला ‘हत्ती खराट्यासारखा’!
अशा रीतीने एकमेकास विरोध करत हत्तीच्या अवयवांनाच ते हत्ती
समजत होते.त्यावेळी डोळस मनुष्य आंधळ्यांना म्हणाला हा
हत्ती
नसून हत्तीचा एक एक अवयव आहे पण हा
हत्ती नव्हे
आणि अशा सर्व अवयवांनी युक्त तो एक हत्ती आहे.याप्रमाणे डोळस
व्यक्तीने आंधळ्यांची समजूत काढली.
या पाठाचा प्रमाण मराठीत अर्थ व प्रश्नोत्तरे यासाठी येथे स्पर्श करा.. CLICK HERE