7vi 6. Dr. Chandrashekhar Vyankataraman

 पाठ – 6

डॉ.चंद्रशेखर व्यंकटरामन  
asa


 

नवीन शब्दार्थ :

ज्ञानलालसा – ज्ञान मिळविण्याची इच्छा

भांडार  – खजिना

मौलिक – मूल्यवान

आण्विक प्रक्रिया – पदार्थांच्या अणुविषयक प्रक्रिया

होतकरू – हुशार व गरजू

स्वाध्याय

अ. एका वाक्यात उत्तरे
लिही.

1. सर सी.व्ही. रामन
यांचे पूर्ण नाव काय
?

उत्तर – सर सी.व्ही. रामन यांचे पूर्ण नाव सर चंद्रशेखर
व्यंकटरामन हे होय.

2. सर सी.व्ही. रामन
यांच्या आई वडिलांचे नाव काय
?

उत्तर – सर सी.व्ही. रामन यांच्या आईचे नाव पार्वती अम्मा व
वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर असे होते.

3. सर सी. व्ही. रामन
यांनी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना कोठे केली?

उत्तर –  सर सी.
व्ही. रामन यांनी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना बेंगळूर येथे केली.

4. सर सी. व्ही. रामन
यांनी लंडनच्या
रॉयल सोसायटीमध्ये
कोणता शोध निबंध सादर केला
?

उत्तर –  सर सी.
व्ही. रामन यांनी लंडनच्या
रॉयल सोसायटीमध्ये भारतीय तंतुवाद्ये हा  शोध निबंध सादर केला.

5. सर सी. व्ही. रामन
यांना भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार केव्हा मिळाला
?

उत्तर – सर सी. व्ही. रामन यांना भौतिक शास्त्राचा नोबेल
पुरस्कार 1930 साली मिळाला.





 


आ. तीन ते चार क्यात
उत्तरे लिही.

1. सर सी. व्ही. रामन
यांचा जन्म केव्हा व कोठे झाला
?

उत्तर – सर सी. व्ही. रामन यांचा जन्म ०६ नोव्हेंबर १८८३
रोजी तामिळनाडू मधील तिरुचेरापल्ली जवळील थीरुवनैकवल्ल येथे झाला.

2. 28 फेब्रुवारी हा
दिवस
विज्ञान दिनम्हणून का साजरा केला जातो?

उत्तर – कारण 28 फेब्रुवारी 1928
रोजी सर सी.व्ही.रामन
यांनी आपल्या प्रसिद्ध अशा
रामन
इफेक्टचा शोध लावला होता.
या शोधनिबंधाला जगभरातून मान्यता मिळाली.याच शोधासाठी त्यांना
1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला.
याची आठवण म्हणून 1986 सालापासून 28 फेब्रुवारी
हा दिवस
राष्ट्रीय विज्ञान
दिवस म्हणून साजरा केला जातो
.

3. सर सी. व्ही. रामन
यांनी लावलेल्या शोधामुळे कोणते बदल घडले
?

उत्तर – सर सी. व्ही. रामन यांनी लावलेल्या शोधामुळे विकीरणाच्या आण्विक प्रक्रिया व रचना समजण्यास मदत झाली तसेच द्रव आणि वायूरूप पदार्थामध्ये होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास करणं
सो
पे झाले.

इ. रिकाम्या जागी योग्य
शब्द भर.

1. भारत सरकारने 1954 साली त्यांना भारतरत्न हा
पुरस्कार दिला.

2. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना 1943 साली
केली.

3. सी. व्ही. रामन यांनी लावलेला शोध म्हणजेच रामन
इफेक्ट  
म्हणून ओळखला जातो.

4. सर सी. व्ही. रामन यांना भारतातील 16 व जगातील 8
विद्यापीठांनी डॉक्टरेट पदव्या दिल्या

5. सर सी. व्ही. रामन यांचे 1970 साली निधन झाले.

ई. खाली दिलेल्या थोर भारतीय व्यक्तीनी कोणत्या
साली व कोणत्या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळविले याची माहिती भरा.

अ.न.

शास्त्रज्ञांचे
नाव

विषय

वर्ष

1

सर सी. व्ही. रामन

भौतिक शास्त्र

1930

2

रविंद्रनाथ टागोर

साहित्य

1913

3

अमर्त्य सेन

अर्थशास्त्र

1998

4

हरगोविंद खुराणा

वैद्यकशास्त्र

1968

5

मदर तेरेसा

शांतता

1979

6

सुब्रमण्यम् चंद्रशेखर

भौतिक शास्त्र

1983

 


 

उ. खालील शब्दांचे
विरुद्ध अर्थी शब्द लिही.

1. मौलिक x अमौलिक

4. परकीय X स्वकीय

2. साध्य X असाध्य

5. सुप्रसिद्ध  X कुप्रसिद्ध

ऊ. कंसातील योग्य शब्द
वापरून खालील म्हणी पूर्ण करा.

(मीठ, पाणी, पाने, साखरेचे, पोळी)

1. नावडतीच्या हातचे मीठ आळणी.

2. पळसाला पाने तीनच.

3. तळे राखील तोच पाणी चाखील.

4. साखरेचे खाणार त्याला देव देणार.

5. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.

वरील नोट्स PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा… CLICK HERE 

Share with your best friend :)