6vi Marathi 5. BUDDHIBAL (Chess)

 पाठ  – 5 

बुद्धिबळ 
 
%25E2%2580%2594Pngtree%25E2%2580%2594chess+board+game+concept+of 4996213

नवीन शब्दार्थ

शतरंज बुद्धिबळ या खेळाचे नाव

प्यादीबुद्धिबळ या खेळातील सैनिक

मोहरेराजा व प्यादी या व्यतिरीक्त बुद्धी बळातील दळे

वजीरबुद्धिबळ या खेळातील प्रधान

            अभ्यास

अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.

1. खेळांचे मुख्य प्रकार किती आहेत?

उत्तर – खेळाचे मुख्य दोन प्रकार आहेत.

 1. बैठे खेळ 2. मैदानी खेळ

2. बुद्धिबळ हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे?

उत्तर – बुद्धिबळ हा बैठे खेळ या प्रकारचा खेळ आहे.

3. बुद्धिबळ या खेळाला कोणत्या नावाने ओळखतात?

उत्तर – बुद्धिबळ खेळाला शतरंज या नावाने ओळखतात.

4. बुद्धिबळाची सुरूवात केव्हा झाली?

उत्तर – बुद्धिबळाची सुरुवात 4 – 5 हजार वर्षांपूर्वी झाली.

5. बुद्धिबळात किती प्रकारची सेना उपयोगात आणली जाते?

उत्तर – बुद्धिबळात चार प्रकारची सेना उपयोगात आणली जाते. हत्ती,उंट,घोडे,पायदळ

6. बुद्धिबळ या खेळाची सुरूवात कोण करतो?

उत्तर – पांढऱ्या मोहऱ्याचा खेळाडू या खेळाची सुरुवात करतो.

7. उंटाची चाल कशी असते?

उत्तर – उंटाची चाल तिरकस असते.

8. जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या बुद्धिबळ खेळाडूंची नावे लिहा.

उत्तर – विश्वनाथन आनंद,कोनेरू हम्पी इत्यादी हे जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्वल करणाऱ्या बुद्धिबळ खेळाडू आहेत.

 




 

आ. खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात

1. बुद्धिबळ खेळामुळे कोणते गुण वाढीस लागतात?

उत्तर – निर्णयक्षमता,एकाग्रता हे गुण बुद्धिबळ खेळामुळे वाढीस लागतात.

2. बैठ्या खेळांची चार उदाहरणे लिही

उत्तर – बुद्धिबळ,सापशिडी,पत्ते,भातुकली हे बैठे खेळ आहेत.

3. मैदानी खेळांची चार उदाहरणे लिही

उत्तर – कबड्डी,खो-खो,फुटबॉल,क्रिकेट हे मैदानी खेळ आहेत.

4. बुद्धिबळ या खेळाला चतुरंग असे का म्हणतात?

उत्तर – हत्ती,उंट,घोडे आणि पायदळ ही चार प्रकारची सेना
बुद्धिबळ खेळात वापरली जाते म्हणून या खेळाला चतुरंग असे म्हणतात.

5. राजाचे रक्षण कोण कोण करतात?

उत्तर – हत्ती,उंट,घोडे किंवा पायदळ यापैकी कोणीही एक किंवा गरज पाडलेस सर्वजण राजाचे रक्षण करतात.

6.बुद्धिबळ सामने कोणत्या प्रकारानी खेळले जातात?

उत्तर – बुद्धिबळ सामने सांघिक,वैयक्तिक,लीग पद्धत,नॉकाउट या प्रकारानी खेळले जातात.

7. पटावर मोहोऱ्यांची मांडणी कशी करतात?

उत्तर- पटावर मोहोऱ्यांची मांडणी करताना प्रत्येक खेळाडूने आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्यास पांढरे घर येईल अशा बेताने पट मांडावयाचा असतो.त्यानंतर आपल्या कडील बाजूच्या पहिल्या पट्टीवर आपले आठ मोहोरे व दुसऱ्या आडव्या पट्टीवर आठ प्यादी मांडावयाची असतात. दोन्ही पक्षांनी याप्रमाणे आपले मोहोरे व प्यादी मांडली म्हणजे दोन्ही पक्षांच्या मोहोऱ्यासमोर त्याच दर्जाचे मोहोरे मांडलेले असतात.

 




 

8. प्यादयांची चाल कशी असते?

उत्तर –     प्यादे हे एकावेळी एक घर पुढे जाते. मात्र प्रतिपक्षाचे मोहरे मारताना त्याला एक घर तिरपी चाल घ्यावी लागते. सुरूवातीला प्याद्याला मूळ घरातून एकवार 2 घरे समोर चालण्याचा हक्क आहे.प्यादे एकदा पुढे 2 सरकावल्यास ते मागे येऊ शकत नाही. कोणतेही प्यादे आपल्या आठव्या घरी पोहचल्यास खेळणाऱ्याच्या इच्छेनुसार त्याचे कोणत्याही मोहोऱ्यात रूपांतर करून त्याच ठिकाणी ते खेळावयास घेता येते.दोन्ही पद्धतीत राजाच्या आठव्या घरी पोहोचलेल्या प्याद्याचा राजा होऊ शकत नाही.

9. बुद्धीबळातील सर्वश्रेष्ठ मोहोरा कोणता व का?

उत्तर –  वजीर हा सर्व मोहोऱ्यामध्ये श्रेष्ठ दर्जाचा मोहरा असतो कारण वजीर उभा, आडवा किंवा तिरकस कसाही व कितीही घरे जाऊ शकतो. कारण त्याच्या अंगी उंटाचे व हत्तीचे सामर्थ्य एकवटलेले असते.

इ. खालील मोकळ्या जागा भर.

1.वजीराला प्रधान असेही म्हणतात.

2. पटाच्या प्रत्येक बाजूला 8 मोहरे असतात.

3. बुद्धिबळाच्या पटावर 64 एवढी घरे असतात.

4. राजा, वजीर, उंट, घोडे या योध्याना मोहरे अशी संज्ञा आहे.

5. मोहोऱ्यांच्या किवा प्याद्यांच्या डोकीवरून उंट हा मोहोरा उडी मारून जाऊ शकतो.

ई. जोड्या जुळवा.

उत्तर – मोहरे                        चाल

1.      प्यादे (सैनिक)        II. उभा, शत्रूला मारताना तिरकस

2.      उंट                        V. फक्त तिरकस

3.      घोडा                     IV. अडीच घरांची चाल

4.     हत्ती                      I. उभा , आडवा

5.      प्रधान                   III. उभा, आडवा, तिरकस

 




 

ए. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.

1. घोडे मारणे नुकसान करणे

मी घाबरत नाही कारण मी कुणाचेही घोडे मारलेले नाही.

2. बेत करणे योजना  करणे

वर्गशिक्षकांनी सहलीला जाण्याचा बेत केला.

3. मात करणे विजय मिळवणे

भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तान संघावर सहज मात केली.

4. तोंड देणे सामोरे जाणे

महात्मा फुलेंनी अनेक संकटांना तोंड दिले.

5. चाल करणे हल्ला करणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकानी शत्रूच्या सैनिकावर
चाल केली.

ऐ. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिही.

1. करमणूक – मनोरंजन

2. राजा – भूपति

3. प्रधान – वजीर

4. सामर्थ्य – शक्ती

5. चतुरंग – चार अंगे असलेले

वरील नोट्स pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  CLICK HERE

 




Share with your best friend :)