पाठ
11
राज्याची मार्गदर्शक तत्वे
———————————–
1) राज्याची मार्गदर्शक तत्वे कशाला म्हणतात ?
उत्तर आपल्या संविधानाने सुखी राज्यनिर्मितीच्या ध्येयाची
तरतुद केली आहे अशा मार्गदर्शक ध्येयधोरणां ना
राज्याचे मार्गदर्शक तत्त्वे असे म्हणतात.
2) राज्य मार्गदर्शक तत्वे कोणती ?
उत्तर __
(1)सामाजिक न्याय
(2) दुर्बलांना सामाजिक न्याय
(3) महिला आणि बालकल्याण
(4) कामगार कल्याण
(5 )गरजूंना मदत
(6 )सर्वांना समान
कायदा
(7 )मध्यपान निषेध
(8 )कृषी आणि प्राणी संगोपन संघटना
(9 )परिसर संरक्षण
(10 )ऐतिहासिक स्मारकाचे रक्षण
(11) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता ही मुख्य तत्वे होत.
3) सामाजिक न्याय म्हणजे काय ?
उत्तर — समाजात नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजकीय
न्याय मिळवून देऊन लोककल्याण साधणे म्हणजे सामाजिक न्याय होय.
4) सामाजिक न्याय मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश
होतो ?
उत्तर — सामाजिक न्याय यामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय या
गोष्टींचा समावेश होतो.
5) आपल्या जवळ असणारे ऐतिहासिक स्मारके कोणती ?
उत्तर — विजापूर , पट्टदकल
हम्पी , बनशंकरी
, बदामी ऐहोळे, हळेबीड, बेल्लूर
ऐतिहासिक स्मारके होत.
6) महिलांसाठी कोणत्या सुधारणांची तत्त्वे दिली
आहेत ?
उत्तर — महिलांसाठी समान वेतन , प्रसूती रजा , शोषणाविरुद्ध आळा , निरोगी
वाढ होण्यासाठी सकस आहार , मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण ही तत्त्वे दिले आहेत.
7 ) राज्य मार्गदर्शक तत्वे ही मुख्य का आहेत ?
उत्तर — स्वातंत्र्य समानता एकता साध्य करण्यासाठी आणि
सुखी राज्य निर्माण करण्यासाठी राज्य मार्गदर्शक तत्वे मुख्य आहेत.
8) राज्य मार्गदर्शक तत्त्वांचा प्रमुख उद्देश
कोणता ?
उत्तर– कोणतेही
सरकार अधिकारावर आले तरी मार्गदर्शक तत्त्वांचे भान ठेवून राज्य कारभार चालवावा हा
त्यामागील प्रमुख उद्देश आहे.