8. MARATHE (7th SS)

 

पाठ 8

           
मराठे

रायगड किल्ला 

————————————-

1) शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर — शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

2) शिवाजी महाराजांचे आई वडिलांची नावे सांगा ?

उत्तर—  शहाजी
भोसले व जिजाबाई ही महाराजांच्या आई वडिलांची नावे होत.

3) शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ?

उत्तर — दादोजी कोंडदेव व जिजाऊ हे दोन गुरु होते.

4) शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला
घेतला
?

उत्तर — शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला  सर्वप्रथम जिंकला.

5) शिवाजी महाराजांनी कोणाचा वध केला?

उत्तर — शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला.

6) शिवाजी महाराजांनी कोणती पदवी धारण केली ?

उत्तर—  शिवाजी
महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली.

7) शिवाजी महाराजांनी कोणत्या साम्राज्याची
स्थापना केली
?

उत्तर — शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना
केली.

8) प्रमुख पेशवे यांची नावे सांगा ?

उत्तर — बाळाजी विश्वनाथ पहिले बाजीराव व बाळाजी बाजीराव
हे प्रमुख पेशवे  होते.

9) शाहिस्तेखान हा कोण होता ?

उत्तर — शाहिस्तेखान हा औरंगजेब याचा मामा होता.

10) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला ,?

उत्तर–  शिवाजी
महाराजांचा राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाला.




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *