इयत्ता – आठवी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
विषय – स्वाध्याय
प्रकरण 1 – पिकांचे उत्पादन आणि व्यवस्थापन
प्रश्नोत्तरे
1. खाली दिलेल्या यादीतून अचूक शब्द निवडा आणि रिकाम्या जागा भर.
(तरंगतात पाणी पीक, पोषक घटक, मशागत)
(a) एकाच ठिकाणी एकाच प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात
वाढविणे आणि संगोपन (मशागत ) करणे त्या वनस्पतीना पीक असे
संबोधले जाते.
(b) पिकांची वाढ होण्यापूर्वी जमिनीची मशागत करणे ही प्रथम पायरी आहे.
(c) खराब बिजे पाण्यावर तरंगतात.
(d) पिकांच्या वाढीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश आणि मातीतून पाणी आणि पोषक
घटक यांची आवश्यकता आहे.
2. स्तंभ A मधील
घटकांची स्तंभ B मधील
घटकाशी जोड्या जुळवा.
A B
i. खरीप पिके भात आणि मका
ii. रब्बी पिके .. गहू, चणा, वाटाणा
iii. रासायनिक खते .. युरिया आणि सुपर फॉस्फेट
iv. सेंद्रिय खते …प्राण्यांचे उत्सर्जित पदार्थ, गोबर, मूत्र आणि वनस्पती उत्सर्जित पदार्थ
3. प्रत्येकी दोन उदाहरणे द्या.
(a) खरीप पिके :
भात,
मका,
सोयाबीन,
भुईमूग,
कापूस
(b) रब्बी पिके :
गहू,
चणा,
वाटाणा,
मोहरी
4. खालील दिलेल्या प्रत्येकाचा तुमच्या शब्दात एक परिच्छेद लिहा.
(a) जमिनीची मशागत करणे – पिकांची प्रत्यक्ष लागवड करण्या अगोदर जमिनीची नांगरण आणि मशागत करणे अत्यंत महत्वाचे असते. कारण त्यामुळे जमिन भुसभुशीत होते व मूळे सहजपणे खोलवर रुजतात. तसेच मूळे खोलवर जाऊन देखील श्वसन करतात. त्याच बरोबर हलक्या भुसभुशीत मातीत गांडूळ आणि सूक्ष्मजीवांची वाढ करण्यासाठी सहाय्यक ठरते. यासाठी नांगर फावडे आणि कल्टीव्हेटर चा वापर केला जातो.
(b) पेरणी करणे : या प्रक्रियेत बिया मातीत घातल्या जातात.त्यासाठी पारंपारिक पद्धतीत एक नरसाळे व त्याला 3 ते 4
पाईप्स जोडून तिक्ष्ण टोके असणाऱ्या दोन किंवा तीन नलिकातून बाहेर पढतात. यात बियाणे नरसाळ्यात भरल्यानंतर पाईपांद्वारे विखुरले जाते. पण आता ट्रॅक्टरद्वारे धान्य पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते. या अवजाराद्वारे धान्य समान अंतरावर व योग्य खोलीपर्यंत पेरण्याचे कार्य होते. नंतर बियाणे योग्य प्रकारे झाकली जातात त्यामुळे पक्षापासून बियाणांचे रक्षण होते.
(c) तण निर्मूलन : तण काढून टाकण्याच्या प्रक्रियेला तण निर्मूलन असे म्हणतात. मुख्य पिकाबरोबर कित्येक अनावश्यक वनस्पती वाढतात त्यामुळे तण मुख्य पिकाबरोबर पाणी, पोषक घटक, जागा व प्रकाश यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. यासाठी शेतकरी तण नियंत्रणासाठी पेरणी पूर्वी नांगरण करून तण उखडून काढतात. त्याच बरोबर हाताने देखील खुरपीने व कोळपणीच्या सहाय्याने तण निर्मूलन करतात. तसेच ठराविक रासायनिक तणनाशकांच्या उपयोगाने देखील तण निर्मूलन करतात.
(d) मळणी : कापणी केलेल्या पिकामधून बीज अथवा दाणे वेगळे केले जातात. पारंपारीक पद्धतीत सुपांच्या सहाय्याने वारे देवून दाणे वेगवेगळे केले जातात. आता आधुनिक मशिनद्वारे कापणी आणि मळणी यंत्राद्वारे केली जाते. याच्यात श्रम व वेळ या दोन्हींची बचत होते.
5. नैसर्गिक खतांपेक्षा कृत्रिम खते वेगळी कशी आहेत ? स्पष्ट करा.
कृत्रिम खते | नैसर्गिक खते |
1. हे असेंद्रिय क्षार असतात रसायनाने तयार होतात. | 1. हे निसर्ग-निर्मित असून ज्याची निर्मिती गोबर, मानवी टाकाऊ पदार्थ व वनस्पतीचे अवशेष यांच्या विघटनाने |
2. कृत्रिम | 2. नैसर्गिक |
3. कृत्रिम | 3. नैसर्गिक |
4. कृत्रिम खते | 4. नैसर्गिक |
6. जलसिंचन म्हणजे काय ? जलसंरक्षण
करणाऱ्या दोन जलसिंचन पद्धतीचे वर्णन करा.
उत्तर – पिकांना योग्य कालावधी नंतर योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करणे म्हणजेच जलसिंचन होय. जल संरक्षण करणाऱ्या पद्धती खालील प्रमाणे आहेत.
1. तुषार सिंचन पद्धत – या पद्धतीचा वापर कमी पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी केला जातो. यामध्ये ऊर्ध्व नळाच्या डोक्यावर फिरते नोझल बसवलेले असते. हे नळ मुख्य नळाला निश्चित अंतरावर बसवलेले असतात. त्यामध्ये पंपाद्वारे उच्च दाबाने पाणी प्रवाहित केले असता पाणी पावसासारखे पिकांवर तुषार रूपात पडते.
2. ठिंबक सिंचन पद्धत – या पद्धतीमध्ये थेंबा थेंबाने जलसिंचन मुळाजवळ होत असते. या मध्ये पाणी व्यर्थ जात नाही. फळाच्या वनस्पतींना बाग व झाडांना ही पद्धत उत्तम आहे.
7. खरीप ऋतू काळात जर गहू पेरला तर काय होईल ? चर्चा करा.
उत्तर – गहू हा कमी प्रमाणात पाण्याच्या वापराने उत्पादित होतो. जर गहू खरीप ऋतू काळात पेरला तर त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही अथवा जास्त पाणी साचल्याने त्याच्यावर विपरीत परिणाम होऊन पिकाचे उत्पादन घटून शेतकऱ्यांचे नुकसान होईल
8. एकाच शेतामध्ये नियमित पीक घेतल्याने त्याचा मातीवर कसा परिणाम होतो ? वर्णन करा.
उत्तर – एकाच शेतात नियमित पीक घेतल्याने मातीतील पोषक घटक कमी होतात. त्याची सुपीकता कमी होते.
त्यामुळे क्षार जमिनीत साठून जमिन नापीक बनते. सतत पिके असल्याने पिकांनी वापरलेले पोषक घटकांचा पुनर भरणी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही.
9. तण म्हणजे काय ? त्यावर नियंत्रण कसे ठेवाल ?
उत्तर – मुख्य पिकांबरोबर अनावश्यक अशा वनस्पती नैसर्गिकपणे वाढतात. त्यांना ‘तण असे म्हणतात. तण मुख्य पिकांबरोबर पाणी पोषक घटक जागा आणि सूर्यप्रकाश इ. स्पर्धा करतात त्यामुळे पिकांचे उत्पादन घटते. सर्व प्रथम पेरणी अगोदर नांगरण करणे त्यामुळे तण उखडले जाऊन मारले जाते. त्याचबरोबर कोळपण व हाताच्या सहाय्याने किंवा खुरपीच्या सहाय्याने तण उखडले अथवा कापले जातात त्यामुळे तणांचा नाश होतो शिवाय रासायनिक फवारणी करून देखील तण मारले जावून त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते.
10. खालील पेट्या योग्य क्रमात जुळवा जेणेकरून उसाच्या पिकाच्या उत्पादनाचे रेखाचित्र तयार होईल.
i. जमीन नांगरणे
ii. जमिनीची मशागत
iii. पेरणी
iv. नैसर्गिक खत देणे
v . जलसिंचन
vi. कापणी
vii. पीक साखरेसाठी कारखान्याला पाठवणे