आठवी विज्ञान 2. सूक्ष्मजीव: मित्र आणि शत्रु
Important Points:
* काही संजीव आपल्या सभोवताली असतात पण साध्या डोळ्याने दिसत नाहीत अशा सजीवांना सूक्ष्मजीव असे म्हणतात.
* सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने आपण सूक्ष्मजीव पाहू शकतो.
* सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण 4 गटात केले आहे..
1. बॅक्टेरीया (जिवाणू )
2. कवक (फंगी )
3. आदिजीव (प्रोटोझुआ)
4. अल्गी (शैवाल )
* इतर सूक्ष्म जीवाणूंपेक्षा विषाणू फार वेगळे असतात. हे विषाणू बॅक्टेरीया, वनस्पती किवा प्राण्याच्या पेशी अशा इतर सजीवांच्यामध्ये शिरल्या नंतरच प्रजनन करू शकतात.
* सूक्ष्मजीव सर्व प्रकारच्या वातावरणा मध्ये म्हणजेच थंड ते उष्ण आणि वाळवंट ते सुपीक जमिनीवर ते जगू शकतात.
• काही सूक्ष्मजीव इतर संजीवांच्या शरीरामध्ये राहतात तर अमिबासारखे सूक्ष्मजीव स्वतंत्रपणे राहू शकतात.
* मानवी जीवनामध्ये सूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. अनेक सूक्ष्मजीव मानवाला उपयोगी असतात तर काही अपायकारक सुद्धा असतात.
* दही, पाव, केक, इतर खाद्य पदार्थ, अल्कोहोल, औषधे आणि लस निर्मिती मध्ये सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. तसे पर्यावरण शुद्धीकरणासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.
• सूक्ष्मजीवामार्फत मानवाला क्षय, गोवर, कांजण्या, पोलिओ, कॉलरा, टायफाईड, मलेरिया, कावीळ, एड्स या सारखे अनेक रोग होतात.
* वातावरणातील मुक्त स्थितीत असणारा नायट्रोजन प्राण्याना घेता येत नाही. हा नायट्रोजन वनस्पती नायट्रेटच्या स्वरुपात निर्माण करतात. खरे म्हणजे वनस्पतीच्या मुळावरील गाठीत असणारे रायझोबियम आणि अॅडॉटोबॅक्टर हे जीवाणू मुक्त नायट्रोजनचे नायट्रेटस् मध्ये रूपांतर करतात. या प्रक्रियेला नायट्रीकरण असे म्हणतात.
1. रिकाम्या जागा भरा.
(a) सूक्ष्मदर्शक च्या सहाय्याने आपण सूक्ष्मजीव पाहू शकतो.
(b) हवेमधील नैट्रोजनचे स्थिरीकरण नील हरित शैवाल करते व त्यामुळे सुपीकता वाढते.
(c) यीस्ट च्या सहाय्याने अल्कोहोलची निर्मिती करतात.
(d) बॅक्टेरीया मूळे कॉलरा होतो.
2. योग्य उत्तरे निवडा.
(a) खालील घटकाच्या निर्मितीसाठी यीस्टचा उपयोग करतात.
(i) साखर
(ii) अल्कोहोल
(iii) हैड्रॉक्लोरीक आम्ल
(iv) ऑक्सिजन
(b) खालील पैकी हे प्रतिजैविक (antibiotics) आहे.
(i) सोडियम बाय कार्बोनेट
(ii) स्ट्रेप्टोमायसीन
(iii) अल्कोहोल
(iv) यीस्ट
(c) खालील आदिजीवांपैकी मलेरियाचा वाहक ….
(i) अॅनॉफेलेस डासांची मादी
(ii) झुरळ
(iii) माशी
(iv) फुलपाखरू
(d) संसर्गजन्य रोगाचा सर्व सामान्य प्रसारक
(i) मुंगी
(ii) माशी
(iii) ड्रॅगॉन पलाय
(iv) कोळी
(e) ब्रेड किंवा इडलीचे पिठ खालील कारणामुळे फुगते.
(i) उष्णता
(ii)दळल्यामुळे
(iii) यीस्ट पेशींच्या वाढीमुळे
(iv) मळल्यामुळे
(f) साखरेपासून अल्कोहोल तयार होण्याची क्रिया
(i) नैट्रोजनचे स्थिरीकरण
(ii) मोल्ड
(iii) आंबविणे
(iv) संसर्ग
3. स्तंभ A मधील घटकांची स्तंभ B मधील त्यांच्या संबंधीत क्रियांशी
जोड्या लावा.
उत्तर – A ` B
I. बॅक्टेरीया • कॉलऱ्याला कारणीभूत
II. हायझोबियम • नैट्रोजनचे स्थिरीकरण
III. लॅक्टोबॅ सिलस • दही तयार होणे
IV. यीस्ट – ब्रेड भाजणे
V. आदिजीव – मलेरियला कारणीभूत
VI. विषाणू – एड्सला कारणीभूत
4. नुसत्या डोळ्यांनी सूक्ष्म जीव दिसू शकतात का ? तसे नसेल तर त्यांना आपण कसे पाहू शकतो ?
उत्तर – सूक्ष्मजीव नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. कारण त्यांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. काही फंगस किंवा कवक / बुरशी जर त्यांची वाढ ब्रेड वर वाढली तर आपण भिंगाद्वारे पाहू शकतो. सामान्यता सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपण सूक्ष्मजीवाना पाहू शकतो.
5. सूक्ष्मजीवांचे मुख्य गट कोणते ?
सूक्ष्मजीवाचे मुख्य 4 गटात वर्गीकरण केले आहे.
i. बॅक्टीरिया (जिवाणू)
ii. फंगी (कवक)
iii. आदिजीव (प्रोटोझुआ )
iv. अल्गी (शैवाल )
6. हवेमधील नायट्रोजनचे मातीमध्ये स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जीवांची नांवे सांगा.
उत्तर – रायझोबीयम,क्लोस्टीडीयम व अॅझोटोबॅक्टर हे हवेतील नायट्रोजन
6. हवेमधील नायट्रोजनचे मातीमध्ये स्थिरीकरण करणाऱ्या सूक्ष्म जीवांची नांवे सांगा.
उत्तर –रायझोबीयम, क्लोस्ट्रीडीयम व अॅझोटोबॅक्टर हे हवेतील नायट्रोजनचे मातीमध्ये स्थिरीकरण करतात.
7. सूक्ष्म जीवांचे आपल्या आयुष्यातील उपयोग यावर 10 ओळी लिहा.
सूक्ष्मजीव आपल्याला खालील बाबतीत उपयुक्त आहेत.
1. दुधाचे रूपांतर दहयात करणे (लॅक्टोबॅसिलस जीवाणूपासून)
2. ब्रेड केक बणविण्यासाठी तसेच इडली व डोशाचे पीठ आंबविण्यासाठी होतो . (यीस्ट)
3. अल्कोहोल, वाईन आणि व्हिनेगार यांच्या उत्पादनासाठी होतो. ( यीस्ट )
4. प्रतिजैविके (अॅटीबायोटिक्स) तयार करण्यासाठी होतो.
5. रोगांवर लस (व्हॅक्सीन तयार करण्यासाठी होतो.)
6. जमीनिची सुपीकता वाढविण्यासाठी होतो.
7. पर्यावरण शुद्धीकरणासाठी यांचा वापर केला जातो.
8. टाकाऊ पदार्थांना कुजवून खतांमध्ये रूपांतर करण्यासाठी होतो.
9. नैट्रोजनचे स्थिरिकरण करण्यासाठी होतो.
10. सूक्ष्मजीव कचऱ्याचे आणि सांडपाण्याचे विघटन करतात.
8. सूक्ष्म जीवांमुळे होणाऱ्या उपद्रवावर एक परिच्छेद लिहा.
उत्तर – सूक्ष्मजीव वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. गोवर, कांजण्या, पोलिओ, कॉलरा, टायफाईड, कावीळ, गॅस्ट्रो असे अनेक रोग सूक्ष्मजीवामुळे होतात. डासामुळे प्रसार होणारे हिवताप, डेंग्यु चिकन गुनिया, मलेरिया असे रोग होतात. तसेच सर्दी, खोकला, घटसर्प न्यूमोनिया, क्षय, कोरोना असे श्वसनमार्गाचे रोग देखील सूक्ष्मजीवामूळे होतात. अन्नावर काही सूक्ष्मजीवाची वाढ होते व अन्न खराब होते.
9. प्रतिजैविके म्हणजे काय ? ही प्रतिजैविके (अॅटीबायोटिक्स) घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?
उत्तर – शरीरातील रोगजंतूचा नाश करणाऱ्या व त्यांची वाढ रोखणाऱ्या विशिष्ठ प्रकारच्या औषधांना प्रतिजैविक असे म्हणतात.
प्रतिजैविकांच्या वापरांच्या बाबतीत खालील प्रकारे काळजी यानी
1. प्रतिजैविके ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली
2. प्रतिजैविके आवश्यकता नसताना किंवा चुकीच्या प्रमा शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात.
3. डॉक्टरांनी नेमून दिलेले डोस पूर्ण होण्याआधीच बरे वाटले तरी उरलेले प्रतिजैविकांचे डोस पूर्ण करावेत.
4. एक्सपायरीची तारीख होऊन गेलेली प्रतिजैविके घेवू नयेत.
Good work sir
Thank You