पाठ 4 समाजातील खेळ
प्रश्नोत्तरे
1) खेळ कशाला म्हणतात
उत्तर लोकांनी मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी शोधून काढलेली कृती म्हणजे खेळ
2 ) समाजात कोणकोणते खेळ खेळले जातात?
उत्तर समाजात क्रिकेट कबड्डी खो-खो कुस्ती लंगडी फुटबॉल दोरी उड्या लगोरी इत्यादी प्रकारचे खेळ खेळले जातात
3) खेळाचे दोन प्रकार कोणते?
उत्तर बैठे खेळ व बाहेर खेळ हे दोन प्रकार होत.
4) बैठे खेळात कोणकोणते खेळ खेळतात?
उत्तर बैठे खेळांमध्ये कॅरम,बुद्धिबळ,फासे,सापशिडी,सारीपाट इत्यादी खेळ बैठे खेळात खेळतात.
5 ) खेळामुळे आपणास कोण कोणते फायदे होतात?
उत्तर 1) शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते.
2 )स्नायू बळकट होतात.
3 )शरीराचे वजन समतोल राहते.
4 )शरीर सुडौल बनते.
5) आत्मविश्वास वाढतो.
(6) खेळांमधून फक्त आपणास फायदा होतो का?
उत्तर खेळांमधून फक्त आपणास फायदा होत नाही तर खेळामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राज्य आणि देश विदेश यामध्ये मैत्री सहकार्य आणि परस्पर बंधुत्वाची भावना वाढते.
(7 )आंतरराष्ट्रीय खेळांची नावे सांगा.
उत्तर क्रिकेट , टेनिस , फुटबॉल , हॉकी जिम्नॅस्टिक, हॉलीबॉल इत्यादी आंतरराष्ट्रीय खेळ होत.
( 8)साहसी खेळ कशाला म्हणतात?
उत्तर रोमांचक आणि विशेष अनुभव देणाऱ्या शारीरिक सामर्थ्यावर आधारित खेळाना साहसी खेळ असे म्हणतात.
(9) साहसी खेळ कोणकोणते?
उत्तर पर्वतारोहण , कार ड्रायव्हिंग , खडकारोहन, रिवर राफ्टींग,सायकलिंग ही साहसी खेळांची उदाहरणे होत.