सेतूबंध म्हणजे काय?
सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.
सेतुबंध कधी करता येईल?
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कौशल्ये वाढवण्यासाठी सेतुबंध –
शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला दीर्घ सुट्टीतून शाळेत परत आलेल्या विद्यार्थ्यामध्ये पूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये किती अवघड आहेत?कोणती कौशल्ये आत्मसात केलेली नाहीत? पुढील अध्ययनांशास पूरक सामर्थ्ये कोणकोणती?
हे सर्व लक्षात घेऊन या आधी आत्मसात केलेल्या क्षमतांना पुढे आत्मसात करण्यास आवश्यक असलेल्या क्षमतांमध्ये विलीन करण्याची प्रक्रिया शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीची प्रक्रिया म्हणजे सेतुबंध.
सेतुबंध का करावा? (Importance of bridge course)
सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – तिसरी
पायाभूत सामर्थ्याची यादी
विषय – मराठी
1) सांगितलेली कथा,कविता, विवरण, कोडी लक्ष देऊन ऐकणे व आपल्या भाषेत सांगणे.
2) ऐकलेले किंवा पाहिलेले प्रसंग कथा,कविता, चित्र याबाबत आपले विचार अथवा प्रतिक्रिया व्यक्त करणे.
3) भाषेमध्ये बोलताना वापरावयाचा योग्य ध्वनी शब्दातील लय, यमक लक्षात घेऊन त्याचा आनंद घेणे.
4)आपल्या कल्पनाशक्तीच्या मदतीने कविता म्हणणे व अभिनयासहित सादर करणे.
5) चित्र पाहून प्रत्येक पैलू चे सूक्ष्म निरीक्षण करणे व आपले विचार सांगणे.
6) एखाद्या चित्रातील क्रमाने जोडलेल्या घटना, त्यातील पात्रांचा संबंध/ संदर्भ /गोष्ट पाहून आकलन करून घेणे.
7) लिखित/ मुद्रित अक्षरे शब्द, वाक्य इत्यादींचे स्वरूप जाणून घेणे.( उदाहरणात-‘ माझे नाव कमल‘ या वाक्यात किती शब्द आहेत?)
8) ठळक व लहान आकारातील मुद्रित अक्षरे, शब्द ओळखणे.
9) काना मात्रा चा योग्य वापर करून शब्द लिहिणे व वाचणे.
10) जोडाक्षर युक्त वाक्यांचे अनुलेखन करणे.
>