KARNATAKA STATE SYLLABUS
वनस्पतींचा आधार-मूळ
महत्वाचे मुद्दे:
- मुळांचे मुख्य कार्य वनस्पतीला मातीतून पाणी आणि पोषक घटक शोषून घेणे आहे.
- मुळांनी शोषलेले पाणी आणि पोषक घटक खोड आणि पानांपर्यंत पोहोचवले जातात.
- मुळे मातीचे कण आणि पाणी वाहून जाण्यापासून रोखतात, ज्यामुळे मातीची धूप थांबते.
- मुळे रोपांना मातीत घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे वनस्पती स्थिर राहते.
- काही वनस्पतींची मुळे अन्नाचा साठा करतात आणि ती मुळे आपण खाण्यासाठी वापरतो.
- काही वनस्पतींची मुळे (उदा. अश्वगंध) औषधी गुणधर्मांसाठी वापरली जातात.
- काही वनस्पतींची मुळे खूप लांब वाढतात (उदा. गवताच्या जातीची मुळे 600 किमी पर्यंत लांब असू शकतात).
- वड, पिंपळ यांसारख्या झाडांच्या पारंब्या (हवेतील मुळे) त्यांना वाढण्यास आणि मोठ्या क्षेत्रावर पसरण्यास मदत करतात.
- बांडगुळांची मुळे हवेत उघडी असतात आणि ती हवेतील दमटपणा शोषून घेतात.
- कमी पावसाच्या प्रदेशातील वनस्पतींची मुळे पाणी साठवतात आणि गरज पडल्यास वनस्पतीला पुरवतात. काही आदिवासी लोक पिण्यासाठी या पाण्याचा वापर करतात.
प्रश्नांची उत्तरे:
1. या चित्रातील वनस्पतींच्या भागांची नावे लिही.
उत्तर – फूल,पाने,खोड,मूळ,फळ
2. वनस्पतीची मूळे कोठे वाढतात?
उत्तर – वनस्पतीची मुळे जमिनीखाली,मातीत वाढतात.
3. वनस्पतीची मूळे तू पाहिली आहेस का?
होय, मी वनस्पतीची मुळे पाहिली आहेत.
4. कोणत्या वनस्पतीची मूळे तू पाहिली आहेस?
उत्तर – कांदा, बटाटा, गाजर, मुळा, हरभरा, वाटाणा, इत्यादी वनस्पतीची मूळे मी पाहिली आहेत.
5. मुळांचा रंग कोणता असतो?
उत्तर – मुळांचा रंग लालसर-गुलाबी,पांढरा किंवा जांभळा असतो.
5. हे तू स्वतः कर
नारळाच्या दोन करवंट्या अथवा दोन लहान डबे घे. दोन्हीत माती भर. एकात थोडा नाचणा किंवा भाताच्या बिया घाल. दोन्ही करवंट्यावर रोज थोड़े पाणी शिंपड. आठवड्याभरात नाचणा किंवा भाताच्या बियांना अंकूर येतील. ते अंकूर थोड़े मोठे झाल्यावर दोन्ही करवंट्या उलट कर. दोन्ही करवंट्यातील मातीचे निरीक्षण कर.
उत्तर –
- एका करवंटीतील/डब्यातील बिया रुजल्या आणि त्यांना अंकुर आले.
- अंकुर फुटल्यानंतर त्यांची मुळे मातीत खाली वाढलेली दिसली.
6. हे तू स्वतः कर (हरभरे/कुळीथ):
शाळा अथवा घरासमोरील बागेत पाच सहा हरभरे अथवा कुळीथ पेर. त्याला रोज पाणी घाल. काही दिवसानंतर त्यांचे रोप तयार होते. त्यातील दोन रोपे त्यांची मुळे तुटणार नाहीत अशा रितीने हळूवारपणे मातीतून बाहेर काढ. त्यातील एका रोपाची मुळे काप. दुसरे तसेच राहू दे. त्यानंतर पसरट तोंड असलेले दोन कुंड घे. त्यातील जास्तीचे पाणी वाहून जाण्यासाठी खाली एक छिद्र असू दे. त्या दोन्ही कुंडात माती भरुन त्यात ती दोन्ही रोपे वेगवेगळी लाव. कुंड उन्हात ठेवून रोज पाणी घाल. 2 अथवा 3 दिवसानंतर रोपांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण कर.
तू निरीक्षण केलेले दोन मुद्दे खाली लिही.
उत्तर –
- ज्या रोपाची मुळे कापली होती, ते रोप 2-3 दिवसांनी सुकून गेले किंवा नीट वाढले नाही.
- ज्या रोपाची मुळे कापली नव्हती, ते रोप ताजे राहिले आणि व्यवस्थित वाढत राहिले.
हे तू स्वतः कर:
काचेचे एक पसरट भांडे अथवा ग्लास घे. त्यात थोडे पाणी घाल. त्या पाण्यात लाल शाई अथवा रंगाचे दोन थेंब घाल. तेरडा अथवा गौरी वनस्पतीचे एक रोप मुळासहीत मातीतून हळूवारपणे काढ. रोपाची मुळे धू आणि रंगीत पाण्याच्या भांड्यात ठेव. ते भांडे सूर्यप्रकाशात ठेव. दुसऱ्या दिवशी त्या रोपात झालेले बदल बघ.
तू निरीक्षणात काय आढळले? त्या मागील कारण कोणते?
उत्तर –
दुसऱ्या दिवशी काचेच्या भांड्यातील लाल पाणी शोषून घेतल्यामुळे वनस्पतीची खोड व पाने रंगीत झालेले दिसले.यावरून मुळे पाणी आणि त्यातील पदार्थ शोषून घेतात हे सिद्ध होते.

वरील चित्रात दर्शविलेल्या भाज्यांची नावे लिही. त्यांच्या वापर तुम्ही घरात करता का? वापरण्याचे कारण काय ? वनस्पतीच्या कोणत्या भागापासून ते आपणाला मिळते ?
उत्तर –
- मुळा
- गाजर
- बीट
- रताळे
होय,या सर्वांचा वापर आम्ही घरात करतो.कारण या भाज्या पौष्टिक,चविष्ट,डोळ्यांसाठी उपयुक्त व आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात.या सर्व भाज्या आम्हाला वनस्पतींच्या मुळापासून मिळतात.
7. तुम्ही वापरत असलेल्या 4 मुळांची नावे लिहा. त्यांचा वापर कशासाठी केला जातो ते देखील बाजूला लिहा.
अ. क्र. | मूळ | उपयोग |
1. | गाजर | खाण्यासाठी |
2. | मुळा | खाण्यासाठी |
3. | बीट | खाण्यासाठी |
4. | आले | मसाल्यासाठी / औषधासाठी |