8th SS ONLINE TEST LESSON 14. अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व

NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीच्या समाज विज्ञान या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये प्राचीन भारताची संस्कृती आणि सिंधू-सरस्वती व वेदकालीन संस्कृती या पाठातील लक्षात ठेवायचे आवश्यक मुद्दे व पाठावर आधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.

कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील 8वीच्या समाज विज्ञान विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE

ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.

NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT

या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

अर्थशास्त्राचा अर्थ आणि महत्व

1. अर्थशास्त्राचा अर्थ: अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र असून ते व्यक्ती, संस्था, समाज आणि जगभरातील आर्थिक उपक्रमांशी संबंधित आहे. यात मानवाच्या मर्यादित संसाधनांच्या वापरातून त्याच्या अमर्याद इच्छांची पूर्ती कशी होते हे समजून घेतले जाते.

2. इतिहास आणि महत्त्व: प्राचीन काळात मनुस्मृतीत कृषी, उद्योग, कर व महसूलाचे वर्णन आहे. कौटिल्याने मौर्य दरबारात अर्थशास्त्रावरील ग्रंथ लिहिला होता, ज्यामध्ये राज्य व आर्थिक व्यवस्थापनाचा समावेश होता.

3. अर्थशास्त्राची व्याप्ती: अर्थशास्त्रात उत्पादन, उपभोग, विनिमय व वितरण या आर्थिक क्रिया समाविष्ट आहेत, ज्याद्वारे मानवी गरजांची पूर्तता केली जाते.

4. अर्थशास्त्राचे क्षेत्र:

उत्पादन: शेती, उद्योग, खाणकाम यांसारख्या उपक्रमांतून वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात.

उपभोग: लोक आपल्या गरजा भागविण्यासाठी वस्तू व सेवा वापरतात.

विनिमय: बाजारव्यवस्थेत वस्तूंची खरेदी-विक्री होते.वितरण: उत्पादित वस्तू व सेवांचा न्याय्य वाटप करण्यात येतो.

5. अर्थशास्त्राचे महत्त्व: आर्थिक असमानता, गरिबी, बेरोजगारी यांसारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अर्थशास्त्राचे ज्ञान महत्त्वपूर्ण ठरते. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, किंमत स्थिरता आणि मर्यादित संसाधनांचे अधिक कार्यक्षम वापर यासाठी अर्थशास्त्र मदत करते.

6. मानवी इच्छा: आर्थिक क्रियांमधील सर्व घटक मानवी इच्छांशी संबंधित आहेत. इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य पैसे कमावतो आणि त्यामुळे आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेला असतो.

Share with your best friend :)