इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
9. गती आणि वेळ
उत्तर –
पथसंचलन करणारे सैनिक – रेषीय
सरळ दिशेत चालणारी बैलगाडी – रेषीय
पळणाऱ्या धावपटूच्या हाताची हालचाल – आवर्तनीय
चालत्या सायकलच्या पेडलची गती – वर्तुळाकार
सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीची गती – वर्तुळाकार
झोपाळ्याची गती – आवर्तनीय
घड्याळाच्या लंबकाची गती – आवर्तनीय
उत्तर –
क्रमांक | सजीवाचे नाव | गती (km/h) | गती (m/s) |
1 | बहिरी ससाणा पक्षी | 320 | 88.89 |
2 | चिता | 112 | 33.11 |
3 | निळा व्हेल मासा | 40 – 46 | 11.11 – 12.78 |
4 | ससा | 56 | 15.56 |
5 | खार | 19 | 5.28 |
6 | उंदीर | 11 | 3.06 |
7 | मानव | 40 | 11.11 |
8 | भीमकाय कासव | 0.27 | 0.075 |
9 | गोगलगाय | 0.05 | 0.014 |
1. खालील गतीचे सरळ रेषीय, वर्तुळाकार आणि आंदोलनात्मक गतीमध्ये वर्गीकरण करा.
(i) पळताना तुमच्या हाताची होणारी हालचाल.
(ii) सरळ रस्त्यावर गाडी ओढणाऱ्या घोड्यांची गती.
(iii) मेरी-गो-राऊंड (merri-go-round) खेळातील
(iv) सी-सॉ (see-saw) वर बसलेल्या मु
(v) विद्युत घंटेतील हातोड्याची
(vi) सरळ पुलावरुन धावणाऱ्या आगगाडीची गती.
उत्तर –
गतीचे वर्गीकरण:
सरळ रेषीय गती: एका सरळ रेषेत गती.
वर्तुळाकार गती: गोलाकार मार्गावर गती.
आंदोलनात्मक गती: एका निश्चित बिंदूपासून दोन्ही बाजूंच्या हालचाली.
1. सरळ रेषीय गती:
(ii) सरळ रस्त्यावर गाडी ओढणाऱ्या घोड्यांची गती.
(vi) सरळ पुलावरून धावणाऱ्या आगगाडीची गती.
2. वर्तुळाकार गती:
(iii) मेरी-गो-राऊंड (merri-go-round) खेळातील.
3. आंदोलनात्मक गती:
(i) पळताना तुमच्या हाताची होणारी हालचाल.
(iv) सी-सॉ (see-saw) वर बसलेल्या मुलांची हालचाल.
(v) विद्युत घंटेतील हातोड्याची हालचाल.
2. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
(i) वेळेचे मूळ एकक सेकंद आहे.
(ii) प्रत्येक वस्तू समान गतीने जाते.
(iii) दोन शहरांतील अंतर किलोमीटरमध्ये मोजले जाते.
(iv) एका दिलेल्या गोलकाचा आवर्तनकाल स्थिर नसतो.
(v) आगगाडीची गती m/h मध्ये व्यक्त करतात.
उत्तर: (ii) प्रत्येक वस्तू समान गतीने जाते.
स्पष्टीकरण: प्रत्येक वस्तू समान गतीने जातेच असे नाही. काही वस्तू स्थिरही राहतात.
(v) आगगाडीची गती m/h मध्ये व्यक्त करतात.
स्पष्टीकरण: आगगाडीची गती km/h मध्ये व्यक्त करतात.
3. एका साध्या गोलकाला 20 आंदोलन पूर्ण करण्यासाठी 32 सेकंद लागतात. तर गोलकाचा आवर्तनकाल किती?
उत्तर:
आंदोलनांची संख्या = 20
एकूण वेळ = 32 सेकंद
गोलकाचा आवर्तनकाल = ?
आवर्तनकाल = एकूण वेळ ÷ एकूण आवर्तने
आवर्तनकाल = 32 sec ÷ 20
= 1.6 sec
गोलकाचा आवर्तनकाल = 1.6 sec
4. दोन रेल्वे स्थानकातील अंतर 240 km आहे. एका रेल्वेला हे अंतर कापण्यासाठी 4 तास लागतात. तर त्या रेल्वेची गती शोधून काढा.
उत्तर –
दिलेले अंतर (d) = 240 km
लागलेला वेळ (t) = 4 तास
गतीचे सूत्र:
गती (v) = अंतर ÷ वेळ
गती = 240 ÷ 4
= 60 km \ h
आगगाडीची गती 60 km/h आहे.
5. एका कारच्या ओडोमीटर मध्ये 8:30 AM वाजता 57321.0 km इतके रिडींग होते. जर 08:50 AM वाजता ओडोमीटरमध्ये बदल होऊन 57336.0 km रिडींग होते. तर कारने आक्रमिलेले अंतर किती? कारची गती km/min मध्ये काढा. या गतीला km/h मध्ये पण व्यक्त करा.
उत्तर –
सुरुवातीचे रिडींग (08:30 AM) = 57321.0 km
अंतिम रिडींग (08:50 AM) = 57336.0 km
आक्रमिलेले अंतर = ?
अंतर = 57336.0 – 57321.0 = 15 km
वेळ : 08:30 AM ते 08:50 AM = 20 मिनिटे
गती = अंतर ÷ काळ
= 15 ÷ 20
= 3 / 4
= 0.75 km/min
गती km/h मध्ये :
0.75 x 60 = 45 km/h
गती = 0.75 km/min किंवा 45 km/h
6. सलमाला आपल्या घरापासून सायकलवरुन शाळेत पोहचण्यासाठी 15 मिनिटे लागतात. जर सायकलची गती 2 m/s असेल तर घरापासून शाळेपर्यंतचे अंतर काढा.
उत्तर:
सलमाला शाळेत पोहोचण्यासाठी 15 मिनिटे लागतात –
15 मिनिटे = 15 Ï 60 = 900 सेकंद
सायकलची गती – 2 m/s
तर घरापासून शाळेपर्यंतचे अंतर किती?
अंतर = गती x वेळ
= 2 x 900
= 1800 मीटर
घरापासून शाळेपर्यंतचे अंतर 1800 मीटर.
7. खालील प्रसंगामध्ये गतीचा अंतर वेळ (काल) आलेख दर्शवा.
(a) समान गतीने चालणारी कार.
(b) रस्त्याशेजारी थांबलेली एक कार.
उत्तर –
(a) समान गतीने चालणारी कार – अंतर रेषेने वाढत जाते.
(b) रस्त्याशेजारी थांबलेली कार – अंतर स्थिर राहते.
8. खालीलपैकी कोणते सुत्र अचूक आहे?
(i) गती = अंतर × वेळ
(ii) गती = अंतर ÷ वेळ
(iii) गती = वेळ ÷ अंतर
(iv) गती = 1 ÷ (अंतर × वेळ)
उत्तर: (ii) गती = अंतर ÷ वेळ
9. गतीचे मूळ एकक –
(i) km/min
(ii) m/min
(iii) km/h
(iv) m/s
उत्तर: (iv) m/s
10. एक कार सुरुवातीला 40 km/h या या गतीने 15 मिनिटे धावते, त्यानंतर ती पुन्हा 60 km/h या गतीने 15 मिनिटे धावते. तर कारने आक्रमिलेले एकूण अंतर.
(i) 100 km
(ii) 25 km
(iii) 15 km
(iv) 10 km
उत्तर – (ii) 25 km
11. समजा चित्र 9.1 आणि चित्र 9.2 मध्ये दर्शविलेले फोटोग्राफ 10 सेकंदाच्या अंतराने काढले आहेत. जर या फोटोग्राफमध्ये 100 मीटरचे अंतर 1 cm या प्रमाणात दर्शविले आहे. तर निळ्या कारची गती शोधून काढा.
उत्तर:
12. चित्र 9.15 मध्ये A आणि B वाहनांच्या गतीचा अंतर – वेळेचा आलेख दर्शविलेला आहे. यापैकी कोणते वाहन अति जलद गतीने जात आहे?
उत्तर: A वाहन अधिक वेगवान आहे.
13. 9. खालील अंतर वेळेच्या आलेखांमध्ये कोणता आलेख त्या ट्रकची गती दर्शवितो ज्यामध्ये त्याची गती समान नाही आहे?
उत्तर -:
पाठ्यपुस्तकातील आलेख पहा.
(iii) क्रमांकाचा आलेख वाहनाची गती समान नाही हे दर्शवितो.