नवीन मतदार नोंदणी मोहीम –
मतदार कार्ड दुरुस्ती
मयत मतदारांचे नाव कमी
मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहीम अंतर्गत नवीन चार दिवस नवीन मतदार नोंदणी,मतदार कार्ड दुरुस्ती,मयत मतदारांचे नाव कमी करण्याची मोहीम सुरु आहे तरी नागरीकांनी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी केंद्राशी संपर्क साधावा.
लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदार म्हणून आपल्या अधिकारांचा उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.ही एक संधी आहे.ज्याद्वारे आपण मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेऊ शकता.
जे युवक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असून 01.01.2025 रोजी ज्यांचे 18 वर्षे वय पूर्ण होत आहे.त्यांनी आपले नाव मतदार यादीत त्वरित नोंदवावे.
जर 01.01.2025 रोजी आपले वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल किंवा होणार असेल तर आपण मतदार होण्यास पात्र आहात.ही नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सुलभ असून खालील तारखेला जाऊन मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या मतदान नोंदणी केंद्रात जाऊन फॉर्म भरा किंवा ऑनलाइन सुविधा वापरूनही अर्ज करू शकता.
माननीय मुख्य निवडणूक अधिकारी,बंगळुरू यांच्या निर्देशनानुसार दिनांक 01.01.2025 च्या पात्र दिनांकावर आधारित मतदार यादीचे पूनर्परिक्षण आयोजित करणे आवश्यक आहे.यासाठी नवीन मतदार नोंदणी मोहिम खालील वेळापत्रकानुसार असेल.सदर दिवशी बीएलओ आपापल्या मतदान ठिकाणी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:30 या वेळेत उपस्थित राहतील तरी पात्र नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.
विशेष मतदार नोंदणी मोहिम वेळापत्रक –
शनिवार- 09.11.2024
रविवार- 10.11.2024
शनिवार- 23.11.2024
रविवार- 24.11.2024
नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
१) एक पासपोर्ट साईज फोटो
२) आधारकार्ड, पॅनकार्ड, कॉलेज ओळखपत्र
३) वीजबिल, गॅसबिल. आधारकार्ड (पत्त्याचा पुरावा)
४) वडिलांचे किंवा आईचे मतदान कार्ड
५) जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
मतदार यादीतील दुरुस्ती साठी लागणारी कागदपत्रेः-
1. मतदान कार्ड झेरॉक्स.
2. आधारकार्ड.
3. मोबाईल नंबर
मयत मतदारांचे नाव कमी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
1. मोबाईल नंबर.
2. मयत दाखला.
3. मयत मतदाराचे मतदान कार्ड झेरॉक्स
4. कुटुंबातील सदस्याचे मतदान कार्ड झेरॉक्स.
ही मोहीम केवळ नोंदणीसाठी नाही, तर आपल्या अधिकारांचा जाणीव करून देण्यासाठी आहे. आपले मत देशाच्या भविष्याचा मार्ग ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच, आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा आणि लोकशाही प्रक्रियेत भाग घ्या.
आपणांस विनंती आहे की आपण स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी मतदार नोंदणी करावी आणि इतरांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे.
धन्यवाद!
आपला हक्क, आपला मत