NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीच्या समाज विज्ञान या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये प्राचीन भारताची संस्कृती आणि सिंधू-सरस्वती व वेदकालीन संस्कृती या पाठातील लक्षात ठेवायचे आवश्यक मुद्दे व पाठावर आधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.
कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील 8वीच्या समाज विज्ञान विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.
प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.
NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE
NMMS EXAM QUESTION PAPERS PDF – CLICK HERE
8TH CLASS TEXTBOOK SOLUTIONS ALL SUBJECTS – CLICK HERE
ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.
NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)
या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.
NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT
या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.
इयत्ता – आठवी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
3 दगडी कोळसा आणि पेट्रोलियम
3. Coal and Petroleum
पाठातील महत्वाचे अंश –
1. साधनसंपत्तीचे प्रकार:
साधनसंपत्ती दोन प्रकारांत विभागली जाते:
1. संपणारी साधनसंपत्ती (उदा. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू)
2. न संपणारी साधनसंपत्ती (उदा. सूर्यप्रकाश, हवा)
2. जीवाश्म इंधन:
कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी वनस्पती आणि सजीव प्राण्यांच्या अवशेषांपासून झाली आहे, त्यामुळे त्यांना जीवाश्म इंधन असे म्हणतात.
3. कोळसा:
कोळसा हा मुख्यतः कार्बनचे मिश्रण आहे. त्याचा उपयोग औष्णिक विद्युत निर्मितीसाठी तसेच उद्योगधंद्यांमध्ये केला जातो.
4. पेट्रोलियम आणि त्याचे घटक:
पेट्रोलियममधून LPG, पेट्रोल, डिझेल, वंगण तेल, पॅराफिन मेण, आणि बिटुमेन इत्यादी पदार्थ मिळतात. यांचे विविध उद्योग आणि दैनंदिन उपयोग आहेत.
पेट्रोलियमला “काळे सोने” असे म्हणतात कारण त्याचे व्यावसायिक महत्त्व खूप आहे.
5. नैसर्गिक वायू:
नैसर्गिक वायूचे मुख्यतः CNG (Compressed Natural Gas) रूपात वाहतूक व इतर इंधनासाठी वापर होतो. CNG एक स्वच्छ इंधन आहे आणि यामुळे प्रदूषण कमी होते.
6. साधनसंपत्तीचे शोषण:
मानवी उपक्रमांमुळे संपणाऱ्या साधनसंपत्तीचे शोषण होते, म्हणून त्यांचा विवेकाने वापर करावा लागतो.
ऑनलाईन सराव चाचणी