8th SS ONLINE TEST LESSON 13.Atmosphere वातावरण

NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी इयत्ता आठवीच्या समाज विज्ञान या विषयाच्या तयारीसाठी योग्य सराव आवश्यक आहे.या पोस्टमध्ये प्राचीन भारताची संस्कृती आणि सिंधू-सरस्वती व वेदकालीन संस्कृती या पाठातील लक्षात ठेवायचे आवश्यक मुद्दे व पाठावर आधारित बहुपर्यायी ऑनलाईन सराव चाचणी उपलब्ध करू देत आहोत.विद्यार्थ्यांनी जास्तीत जात सराव करून याचा उपयोग करून घ्यावा.

कर्नाटक राज्य पाठ्यक्रमातील 8वीच्या समाज विज्ञान विषयातील घटकांवर आधारित ऑनलाईन सराव चाचणी विद्यार्थ्यांना NMMS व इतर परीक्षेच्या तयारीसाठी अधिक उपयुक्त आहेत.

प्रश्न सोप्या आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळेल आणि अभ्यासात रुची निर्माण होईल.प्रत्येक घटकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न (MCQs)प्रश्नांचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थित करता येते.

NMMS EXAM COMPLETE GUIDE – CLICK HERE

ही ऑनलाईन सराव चाचणी नियमितपणे सोडवून विद्यार्थ्यांनी आपल्याला अवघड वाटणाऱ्या घटकांचा अभ्यास करावा आणि त्यात सुधारणा करावी.तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या सत्र आणि वार्षिक परीक्षांसाठी ही ऑनलाईन सराव चाचणी खूप उपयुक्त ठरते.

NMMS पेपर-1- मानसिक क्षमता चाचणी:- (मानसिक क्षमता चाचणी -MAT)

या पेपरमध्ये 90 बहुपर्यायी प्रश्न असतील.प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे 90 गुण असतील.या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या तर्क,विश्लेषण,संश्लेषण इत्यादी क्षमता मोजता येतील असे प्रश्न असतील.

NMMS पेपर-2- Scholastic Aptitude Test -SAT

या पेपरमध्ये 90 गुणांसाठी एकूण ९० बहुपर्यायी प्रश्न असतील. यापैकी 35 प्रश्न विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र),35 प्रश्न समाज विज्ञान (इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि व्यवसाय अभ्यास) आणि 20 प्रश्न गणित विषयाचे असतील.

इयत्ता – आठवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

13.Atmosphere वातावरण

1. वातावरणाचा अर्थ आणि महत्त्व:

पृथ्वीच्या आजूबाजूला असणारा वायू, धूलिकण आणि बाष्पांचा थर म्हणजे वातावरण.

वातावरण जैविक जीवनाचे संरक्षण करते, सजीवांसाठी श्वासोच्छवासात मदत करते आणि वनस्पतींच्या अन्ननिर्मितीत उपयुक्त ठरते.

2. वातावरणाचे संघटन:

वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, ऑर्गन, कार्बन डाय ऑक्साईड, ओझोन यांसारख्या वायूंचे प्रमाण असते.

धूलिकण व बाष्प जलकणांच्या सांद्रीभवनात मदत करतात व ढगांची निर्मिती करतात.

3. वातावरणाचे थर:

क्षोभावरण: सर्वात खालचा थर; हवामानाचे सर्व घटक येथे आढळतात.

स्थितांबर: 50 कि.मी. उंचीपर्यंत पसरलेला; ओझोन थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करतो.

मध्यांबर: 80 कि.मी. उंचीपर्यंत पसरलेला; येथे सर्वात कमी तापमान असते.

उष्णांबर: येथे तापमान अधिक वाढते; रेडिओलहरी परावर्तित करतो.

बाह्यांबर: सर्वात वरचा थर, हवा विरळ असते.

4. हवामानाचे घटक:

तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, ढग व पाऊस हे हवामानाचे घटक आहेत.

5. तापमान:

पृथ्वीला सूर्यापासून उष्णता मिळते, यामुळे हवामान बदलते.

‘नित्य तापमान घट’ – प्रत्येक 1 कि.मी. उंचीवर तापमान 6.4°C ने कमी होते.

उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि शीत कटिबंधात तापमान वेगवेगळे असते.

6. वायुदाब:

हवेचे वजन म्हणजे वायुदाब. तापमानानुसार वायुदाबात बदल होतो.

विषुववृत्तीय, उपउष्णकटिबंधीय आणि उपध्रुवीय पट्ट्यातील दाबाचे भाग पृथ्वीवर आढळतात.

7. विशेष वैशिष्ट्ये:

लिबियातील अल अजिजिया (सर्वाधिक तापमान) आणि सायबेरियातील व्हर्कोयान्स्क (अत्यंत कमी तापमान) ही तापमानाची ठळक उदाहरणे आहेत.

अंटार्टिकातील वास्टोक हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण मानले जाते.

8. हवेचा दाब आणि वातावरणातील विविध भागांचे प्रभाव:

पृथ्वीवरील वायुदाबाचे वितरण विषुववृत्तीय, उपउष्णकटिबंधीय, उपध्रुवीय आणि ध्रुवीय पट्ट्यात विभागलेले आहे.

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now