7वी समाज विज्ञान
पाठ 18 कर्नाटकाचे एकीकरण आणि सीमावाद
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 18 कर्नाटकाचे एकीकरण आणि सीमावाद
I. योग्य शब्दासह रिकाम्या जागा भरा.
- कर्नाटक विद्यावर्धक संघाचे प्रथम अध्यक्ष रा. हा. देशपांडे.
- कर्नाटक कुलपुरोहित असे आलूर व्यंकटराय यांना म्हणतात.
- कन्नडचे प्रथम राष्ट्रकवी मंजेश्वर गोविंद पै.
- एकीकृत कर्नाटकाचे प्रथम मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा.
II. खालील प्रश्नांची एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा.
- हैदराबाद संस्थानातील कन्नड जिल्ह्यांची नावे लिहा.
- कलबुरगी, रायचूर, बिदर.
- कर्नाटकच्या एकीकरणात योगदान दिलेल्या दोन संघटनांची नावे लिहा.
- कर्नाटक साहित्य परिषदे आणि कर्नाटक सभा.
III. दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
- फजल अली आयोगाच्या कोणत्या शिफारशीला कन्नडिगांनी विरोध केला?
- फजल अली आयोगाने बळ्ळारी जिल्ह्याचा काही भाग आंध्र प्रदेशला जोडण्याची आणि कासरगोडला केरळमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. या निर्णयाला कन्नडिगांनी तीव्र विरोध केला.
- कर्नाटकाचे एकीकरण करण्यासाठी प्रयत्न केलेल्यांची यादी करा.
- आलूर व्यंकटराय, हुइलगोळ नारायणराव, शांतकवी, मंजेश्वर गोविंद पै, आणि कैय्यार कियण्ण रै यांनी कर्नाटकाच्या एकीकरणासाठी मोठे योगदान दिले.
IV. टीपा लिहा.
i) आलूर व्यंकटराय
- आलूर व्यंकटराय यांनी “कर्नाटकाचे गतवैभव” हे पुस्तक लिहून कन्नडिगांमध्ये जागृती केली.
- त्यांनी कर्नाटकाला एकत्रित करण्यासाठी ‘कर्नाटक कुल पुरोहित’ म्हणून ओळख निर्माण केली.
ii) फजल अली आयोग
- 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष एस. फजल अली होते.
- या आयोगाने भाषावार राज्य पुनर्रचनेसाठी शिफारसी केल्या, ज्यामुळे कर्नाटक राज्याची स्थापना झाली.