7वी समाज विज्ञान
पाठ 16: भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध (1857)
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 16: भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध (1857)
I. रिकाम्या जागा भरा:
- सामान्य सेनासेवा कायदा लॉर्ड कॅनिंग यांनी आणला.
- बराकपूर येथे चरबी फासलेली काडतूस वापरण्यास मंगल पांडे यांनी नकार दिला.
- बिहारमध्ये कुंवर सिंग यांनी बंडाचे नेतृत्व केले.
- 1857 च्या लढयातून भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे विनायक दामोदर सावरकर यांनी संबोधले.
II. एका वाक्यात उत्तर द्या:
- 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचे तात्कालीक कारण कोणते होते?
- चरबी फासलेल्या काडतुसांचा वापर ही तात्कालीक कारणे होती.
- 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाचा कोणताही एक परिणाम सांगा.
- भारतावर ब्रिटिश सरकारने थेट नियंत्रण घेतले.
- ब्रिटीशांच्या राजकीय धोरणामुळे कोणते प्रांत ब्रिटीशांच्या आधिपत्याखाली आले?
- सातारा, झांशी, अवध, जयपूर ही प्रांत ब्रिटीशांच्या आधिपत्याखाली आले.
III. टिपा लिहा:
- स्वातंत्र्य युद्धाची कारणे:
- राजकीय: इंग्रजांच्या आक्रमक धोरणामुळे राजे-नवाब पदच्युत झाले.
- सामाजिक: ब्रिटिशांनी भारतीय प्रथा व धर्मावर टीका केली.
- आर्थिक: कर वाढीमुळे शेतकऱ्यांची स्थिती खराब झाली.
- लष्करी: भारतीय सैनिकांना कमी वेतन व वाईट वागणूक मिळाली.
- तात्कालीक: चरबी फासलेल्या काडतुसांचा वापर.
- झांशीची राणी लक्ष्मीबाई:
- राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीचे रक्षण करताना वीर मरण पत्करले.
- ब्रिटिशांविरुद्ध पराक्रमाने लढल्या व भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरल्या.
- दुसरा बहादूर शहा:
- दुसऱ्या बहादूर शाह यांना स्वातंत्र्य संग्रामात मोगल सम्राट म्हणून घोषित केले.
- यानंतर त्यांना ब्रिटिशांनी अटक करून रंगून येथे पाठवले.