6वी समाज विज्ञान
पाठ 14 विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
पाठ 14 विजयनगरचे साम्राज्य आणि बहामनी राज्य
कालगणना –
- विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336
- साम्राज्याच्या कारकिर्दीचा काळ 1336-1646
- कृष्णदेवरायाचा काळ 1509-1529
- रक्कस तंगडीची लढाई जानेवारी 23, 1565
- बहामनी राज्याचा काळ 1347-1489
- बिदरमध्ये मदरशाची स्थापना 1461
- आदिलशाहीचा काळ 1489-1686
- इब्राहिम रोजाची निर्मिती 1626
- गोलघुमटाची निर्मिती सुमारे 1650
नवीन शब्द
1. फकीर – मुस्लिम साधू
2. बुरुज वाड्यावर बांधलेला घुमट
3. फारसी पर्शियन देशाची भाषा
4. दख्खन – दक्षिण भारतीय प्रदेश
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
- विजयनगर साम्राज्याचे प्रतिक बराह होते.
- बहामनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी होता.
- कर्नाटक संगीत पितामह पुरंदरदास असे यांना म्हणतात.
- गोलघुमट विजापूर शहरामध्ये आहे.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- आदिलशाही राजांपैकी श्रेष्ठ राजे कोण होते?
आदिलशाही राजांपैकी फिरोज शहा हे श्रेष्ठ राजे होते. - गोलघुमट का प्रसिद्ध आहे?
गोलघुमट हे जगातील सर्वात मोठ्या घुमटांपैकी एक आहे आणि त्याचा आवाज प्रतिध्वनी होतो, हे वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. - विजयनगर राजांपैकी सर्वात श्रेष्ठ सम्राट कोण होता?
विजयनगर राजांपैकी सर्वात श्रेष्ठ सम्राट कृष्णदेवराय होते. - हंपीची मुख्य मंदिरे कोणती?
हंपीतील मुख्य मंदिरे विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिर आहेत. - कुमारव्यासांच्या कृती कोणत्या?
कुमारव्यासांच्या प्रमुख कृतीत कर्नाटक महाभारत आहे. - कृष्णदेवरायांच्या कृती सांगा.
कृष्णदेवरायांनी तेलगूमध्ये ‘अमुक्तमाल्यद’ आणि संस्कृतमध्ये ‘जांबवती कल्याण’ या साहित्य कृती लिहिल्या. - विजयनगरला भेट दिलेल्या विदेशी पर्यटकांची नावे सांगा.
विजयनगरला भेट दिलेले विदेशी पर्यटक म्हणजे डोमिंगो पायीस आणि अब्दुल रजाक.