• अपारदर्शक वस्तू प्रकाशाला आपल्यातून जाऊ देत नाहीत.
• पारदर्शक वस्तू प्रकाशाला आपल्यातून आरपार जाऊ देतात आणि म्हणून दुसऱ्या बाजूला असणाऱ्या वस्तू स्पष्टपणे आम्ही पाहू शकतो.
• अर्धपारदर्शक वस्तू प्रकाशाचा काही भाग आपल्यातून जाऊ देतात.
• प्रकाशाच्या मार्गात एखादी अपारदर्शक वस्तू आल्यास छाया तयार होते.
• सूची छिद्र कॅमेरा सामान्य वस्तुपासून तयार करता येतो आणि त्याचा उपयोग सूर्य व अति प्रकाशमान वस्तुंचे प्रतिबिंब पाहण्यास करता येतो.
• आरशावरील परावर्तनामुळे आपल्याला स्पष्ट प्रतिबिंब (प्रतिमा) मिळते.
• प्रकाश नेहमी सरळरेषेत प्रवास करतो.
इयत्ता – सहावी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
8.प्रकाश, छाया आणि परावर्तन
8.Light, shadow and reflection
स्वाध्याय
1: खाली दिलेल्या शब्दांची योग्य पुनर्रचना करा ज्यामुळे एक योग्य वाक्य तयार होईल, जे अपारदर्शक वस्तूंविषयी माहिती मिळवण्यास मदत करेल.
बनते क अ छाया दर्श पार मुळे वस्तूं
उत्तर : अपारदर्शक वस्तूंपासून छाया तयार होते.
2: खाली दिलेल्या वस्तूंचे किंवा पदार्थांचे अपारदर्शक, पारदर्शक, अर्धपारदर्शक तसेच प्रकाशित किंवा अप्रकाशित गटांमध्ये वर्गीकरण करा.
हवा, पाणी, खडकाचा तुकडा, अल्युमिनिअम पत्रा, आरसा, लाकडी बोर्ड, पॉलीथीन तुकडा, सीडी, सपाट काच, दाट धुके, तप्त लोखंडाचा तुकडा, छत्री, प्रकाशमान नलिका, भिंत, कार्बन पेपर, गॅसबर्नर ज्योत, कार्डबोर्ड तुकडा, बॅटरी, सेलोफेन, तारेचे जाळे, रॉकेल स्टोव्ह, सूर्य, काजवा, चंद्र
उत्तर:
अपारदर्शक : खडकाचा तुकडा, अल्युमिनिअम पत्रा, आरसा, लाकडी बोर्ड, सीडी, छत्री, भिंत, कार्डबोर्ड तुकडा, कार्बन पेपर, बॅटरी, तारेचे जाळे, रॉकेल स्टोव्ह, सूर्य, काजवा, चंद्र
अर्धपारदर्शक: पॉलीथीन तुकडा, दाट धुके, सेलोफेन, तारेचे जाळे
पारदर्शक: हवा, पाणी, सपाट काच
प्रकाशित: तप्त लोखंडाचा तुकडा, प्रकाशमान नलिका, गॅसबर्नर ज्योत, बॅटरी, रॉकेल स्टोव्ह, सूर्य, काजवा
अप्रकाशित: हवा, पाणी, खडकाचा तुकडा, अल्युमिनिअम पत्रा, आरसा, लाकडी बोर्ड, पॉलीथीन तुकडा, सीडी, सपाट काच, दाट धुके, छत्री, भिंत, कार्बन पेपर, कार्डबोर्ड तुकडा, सेलोफेन, तारेचे जाळे, चंद्र
3. आपण एक असा आकार बनवू शकाल का एका बाजूने पाहिल्यास वर्तुळाकार छाया मिळेल आणि दुसऱ्या बाजूने पाहिल्यास आयताकार छाया मिळेल. याचा विचार कराल का?
उत्तर: होय, आपण असे करू शकतो. दंडगोल (cylinder) आकाराची वस्तू तयार केल्यास, त्या वस्तूच्या एका बाजूने गोलाकार छाया आणि दुसऱ्या बाजूने आयताकार छाया मिळू शकते.
4. एखाद्या अंधाऱ्या खोलीत जर तुम्ही तुमच्या समोर आरसा धरला तर आरशात तुमचे प्रतिबिंब पाहू शकाल का?
उत्तर: आरशात प्रतिबिंब दिसण्यासाठी वस्तूवर प्रकाश पडणे आवश्यक आहे. प्रकाशाची किरणे वस्तूवरून परावर्तीत होऊन आरशात पडतात तेव्हाच प्रतिबिंब तयार होते. पूर्ण अंधार असल्यास परावर्तन शक्य होत नाही, म्हणून प्रतिबिंब तयार होणार नाही. परंतु, जर टॉर्चचा प्रकाश फक्त तुमच्या चेहऱ्यावर टाकला तर त्या प्रकाशामुळे तुमचे चेहऱ्याचे प्रतिबिंब आरशात दिसू शकते.