10th Marathi 12.PATH ANI POT YANCHA ZALA TAL 12.पाठ आणि पोट यांचा झाला टाळ |विंदा करंदीकर

KTBS KARNATAKA

STATE SYLLABUS

CLASS – 10

MARATHI MEDIUM

SUBJECT – MARATHI

PART – 2

मराठी

कविता 12

पाठ आणि पोट यांचा झाला टाळ

विंदा करंदीकर – परिचय
      विंदा करंदीकर (1918-2010) यांचे संपूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर होते. ते मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी, समीक्षक, आणि अनुवादक होते. त्यांनी अनेक बालकविता, समीक्षा ग्रंथ, तसेच गंभीर कविता लिहिल्या. त्यांचे प्रमुख काव्यसंग्रहांमध्ये ‘स्वेदगंगा,’ ‘मृदगंध,’ ‘धृपद,’ ‘जातक,’ आणि ‘विरूपिका’ यांचा समावेश आहे. त्यांच्या कवितांचे अनुवाद हिंदी, इंग्रजी, आणि गुजराती भाषेत झाले आहेत. मराठी साहित्य विश्वात त्यांचे योगदान अद्वितीय आहे.

कवितेचा सारांश
पाठ आणि पोट यांचा झाला टाळ या कवितेत कवी विंदा करंदीकर यांनी माणसाची मूलभूत गरज भूक आणि त्या भुकेमुळे होणारी वेदना आणि त्यातून निर्माण होणारे असहाय्यता याचे उल्लेख या कवितेत केला आहे.ही कविता विठ्ठलाला उद्देशून आहे,जिथे कवी भूकेल्या पोरांच्या व्यथा व्यक्त करतात. भुकेमुळे ते सैरावैरा धावत आहेत आणि त्यांना शमविण्यासाठी ते विठ्ठलाकडे भाकरी मागत आहेत. या वेदनेतून कवी म्हणतो की, भुकेलेले माणसाला काहीही वर्ज्य नसते, अगदी देवरक्तही त्यांच्यासाठी वर्ज्य नाही. त्यामुळे परमेश्वराने देवपण दाखवावे किंवा भूक शमवावी, अन्यथा भुकेने मरताना पडणारे घणांचे घाव मुकाट्याने सोसायला माणसाला तयार व्हावे लागेल.

स्वाध्याय
प्र.1) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. भुकेलेली पोरे कशी धावतात?
उत्तर: भुकेली पोरे सैरावैरा म्हणजेच इकडेतिकडे धावतात.

2. भुकेलेले जीव काय देतात?
उत्तर: भुकेलेले जीव इशारा देतात.

3. भुकेलेल्या पोटांना काय वर्ज्य आहे?
उत्तर: भुकेलेल्या पोटांना देवरक्त (देवाचे रक्त) सुद्धा वर्ज्य नाही.

4. विठ्ठलाला पोरे काय दाखव अशी विनवणी करतात?
उत्तर: विठ्ठलाला पोरे त्याचं देवपण दाखव असं सांगतात.

5. विठ्ठलाच्या पोटी काय आहे?
उत्तर: विठ्ठलाच्या पोटी माया आहे.

प्र.2) खालील ओळीत रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1. पोटामध्ये येई | शांतवाया
2. आम्ही भुके जीव । देतसूं इशारा
3. ऊठ ऊठ विठ्या । दाव देवपण;
4. मग हा कसया । गदारोळ?
5. अभंगाचे बळ । अमर्याद

प्र.3) खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. भुके जीव काय काय करतील असे कवी म्हणतो?
उत्तर: कवी म्हणतो की, भुकेलेले जीव काहीही करायला तयार होतात. त्यांना भूक लागल्यावर ते एकमेकांना सुद्धा खाऊ शकतात.

2. या कवितेत विठ्ठलाला कोणती विनवणी केली आहे?
उत्तर:
या कवितेत विठ्ठलाला विनवणी केली आहे की, त्याने आपलं देवपण दाखवून भुकेलेल्यांना अन्न द्यावं.

प्र.4) खालील आळींचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
1. आम्ही भुके जीव। देतसूं इशारा आमच्या पुढारा। नको येऊ.
संदर्भ :
सदर काव्यपंक्ती ‘पाठ आणि पोट यांचा झाला टाळ’ या कवितेतील असून कवी विंदा करंदीकर आहेत.

स्पष्टीकरण: भुकेलेले जीव इशारा देत आहेत की,आता पुढे कोणी येऊ नका कारण ते एवढे भुकेले आहेत की कोणालाही खाऊ शकतात.असे कवी सदर काव्यपंक्ती मधून सांगत आहेत.


2. पाठ आणि पोट। यांचा झाला टाळ अभंगाचें बळ । अमर्याद

संदर्भ : सदर काव्यपंक्ती ‘पाठ आणि पोट यांचा झाला टाळ’ या कवितेतील असून कवी विंदा करंदीकर आहेत.


स्पष्टीकरण:
सदर काव्यपंक्ती मधून सांगत आहेत की,पाठीमागे आणि पोटामध्ये संघर्ष चालू आहे.भुकेने माणसाचं बल अमर्याद असतं.


प्र.5) खालील प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा.
या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर:
कवितेत भुकेची तीव्रता दाखवली आहे. भुकेलेले लोक आपली भूक शमविण्यासाठी देवाला आळवतात. ते विठ्ठलाला विनंती करतात की, त्याने आपले देवपण दाखवून त्यांना अन्न द्यावे. भुकेले लोक एवढे अस्वस्थ असतात की त्यांना देवाचे रक्तसुद्धा चालेल.त्यांना इतकी तीव्र भूक आहे की काहीही करायला तयार होतात. देवाला विचारले जाते की, जर त्याच्या पोटात माया आहे, तर मग माणसांच्या पोटात का नाही? कवितेत भूक आणि परमेश्वर यांचा संघर्ष दाखवला आहे.

एक गुणांचे प्रश्न आणि उत्तरे सरावासाठी
1.
कवी कोणत्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतली आहे?
उत्तर:  ‘धृपद’ या काव्यसंग्रहातून.

2. कवितेत कोणत्या देवाचे नाव घेतले आहे?
उत्तर:  विठ्ठल.


3. भुकेलेली पोरं कशी धावतात?
उत्तर:
 सैरावैरा धावतात.

4. भुकेले जीव कोणता इशारा देतात?
उत्तर:  पुढाऱ्याला न येण्याचा इशारा देतात.

5. कवितेत विठ्ठलाला कोणती विनवणी केली आहे?
उत्तर:  भाकरी मिळवून देण्याची विनवणी केली आहे.


6. विठ्ठलाच्या पोटी काय आहे?
उत्तर:  माया.

7. कवितेत कोणता घण माथी पडेल असे म्हटले आहे?
उत्तर:  भुकेमुळे पडणारा घण.

8. कवितेत कोणते दोन अंग टाळ झाल्याचे सांगितले आहे?
उत्तर:  पाठ आणि पोट.

9. भुकेले जीव कशाचे भक्त आहेत?
उत्तर:  अन्नाचे भक्त आहेत.

10. कवितेतील ‘अभंगाचे बळ’ कसे आहे?
उत्तर:  अमर्याद आहे.

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *