इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
पाठ 18. राज्य धोरण मार्गदर्शक तत्त्वे
I. खालील प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दांत
1. राज्य धोरण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय?
उत्तर – राज्य धोरण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे सरकारने देशाच्या कल्याणासाठी कोणते निर्णय घ्यावेत आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे यासाठी दिलेली मार्गदर्शक सूत्रे आहेत. हे तत्त्वे संविधानाच्या चौथ्या भागात समाविष्ट आहेत.
2. महिला आणि बालकल्याणासाठी राज्य घटनेत कोणत्या सूचना दिल्या आहेत?
उत्तर – महिला आणि बालकल्याणासाठी राज्य घटनेत खालील सूचना दिल्या आहेत.
❇️महिलांना आणि पुरुषांना समान वेतन द्यावे.
❇️महिलांना मातृत्व लाभ मिळावा.
❇️मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण द्यावे.
❇️मुलांचे शोषण थांबवावे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
3. राज्य धोरण मार्गदर्शक तत्त्वे कृषी आणि पशुसंगोपनाला महत्व देण्याचे उद्देश काय आहेत?
उत्तर – राज्य धोरण मार्गदर्शक तत्त्वे कृषी आणि पशुसंगोपनाला महत्व देण्याचे उद्देश खालीलप्रमाणे –
❇️शेती आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने करावी.
❇️चांगल्या जातीचे प्राणी संगोपन करावे.
❇️दूध देणाऱ्या आणि भार वाहणाऱ्या प्राण्यांची हत्या रोखावी.
4. राज्यात मद्यपान बंदी करण्याची सूचना का दिली आहे?
उत्तर – मद्यपानामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होतो.महिलांवर होणारे शोषण वाढते.त्यामुळे मद्यपान बंदी लागू करावी,अशी सूचना देण्यात आली आहे.
II. गटात चर्चा करून उत्तरे लिहा.
1. दुर्बलांसाठी सामाजिक न्याय:
उत्तर – गरीब आणि दुर्बलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात.त्यांचे आर्थिक शोषण थांबवावे.त्यांना शिक्षण आणि कायद्याची मोफत मदत मिळावी.हे दुर्बलांसाठी सामाजिक न्याय आहेत.
2. मद्यपान बंदी निषेध:
उत्तर – मद्यपानावर बंदी घालणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे आरोग्याचे नुकसान होते आणि कुटुंबे आर्थिक अडचणीत येतात.
3. ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण:
उत्तर – ऐतिहासिक वास्तूंचा वारसा टिकवणे महत्त्वाचे आहे. सरकारने त्यांचे जतन आणि देखभाल करावी. उदा., हम्पी, म्हैसूर, पट्टदकल इत्यादी.
4. मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काय करावे?
उत्तर – मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी खालील कार्ये करावी.
❇️मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे.
❇️शाळांमध्ये चांगले वातावरण निर्माण करावे.
❇️गरीब आणि दुर्बल मुलांना शैक्षणिक मदत द्यावी.