6th SS 13.Sultans of Delhi दिल्लीचे सुलतान

 इयत्ता – सहावी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

कालगणना (सा. श. )

•सिंध प्रांतावर अरबांचे आक्रमण -: 712

•महंमद गझनीच्या स्वाऱ्या -:  1000-1026

•तराईचे युद्ध (महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील) -: 1191-1192

•दिल्लीच्या सुलतानांची कारकीर्द -: 1206-1526

•कुतुबुद्दीन ऐबक-:  1206-1210

• रजिया सुलताना-:  1236 1240

• अल्लाउद्दीन खिलजी-:  1296-1316

• महंमद बिन तुघलक-:  1325-1351

•पानिपतची लढाई आणि मोगल साम्राज्याचा उदय -: 1526

I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:

1. पहिल्या तराईच्या युद्धात पृथ्वीराज चौहानकडून महमद घोरी पराभूत झाला.


2. अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीमध्ये सिरी या किल्ल्याची निर्मिती केली.


3. पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबर याने इब्राहिम लोदीचा पराभव केला.


4. गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होता.

II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
1. दुसऱ्या तराईच्या युध्दात महमद घोरीने कोणाविरुध्द विजय मिळविला ?

उत्तर – दुसऱ्या तराईच्या युद्धात महमद घोरीने पृथ्वीराज चौहान विरुद्ध विजय मिळविला.


2. कुतुबमिनार कोणी बांधला ?


उत्तर – कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधायला सुरुवात केली; ते इल्तुतमिशने पूर्ण केले.


3. दिल्ली सुलतानांच्या काळात राज्यकारभार केलेली एकमेव महिला कोण ?

उत्तर – दिल्ली सुलतानांच्या काळात राज्यकारभार केलेली एकमेव महिला म्हणजे रजिया सुलताना होती.

4. दक्षिण भारतावर स्वारी केलेला अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार कोण?

उत्तर – अल्लाउद्दीन खिलजीचा दक्षिण भारतावर स्वारी करणारा सरदार मलिक कपूर होता.

5. महमद बिन तुघलकाने राजधानी कोठून कोठे स्थलांतरित केली?

उत्तर – महमद बिन तुघलकाने राजधानी दिल्लीवरून दौलताबाद येथे स्थलांतरित केली.

6. ‘स्वतःला देवाचा प्रतिनिधी मानणारा’ दिल्लीचा सुलतान कोण?


उत्तर – स्वतःला देवाचा प्रतिनिधी मानणारा दिल्लीचा सुलतान म्हणजे बल्बन होता.

गटात चर्चा करून उत्तरे लिहा :

1. महंमद गझनीच्या स्वाऱ्याचे परिणाम लिहा.

उत्तर – महंमद गझनीने भारतावर  17 वेळा स्वाऱ्या करून मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर आणि गुजरातमधील सोमनाथ मंदिर यासारख्या धार्मिक स्थळे उध्वस्त केली.भारतातील समृद्ध शहरे आणि श्रीमंत मंदिरे लुटली गेली व नष्ट झाली हे महमद गझनीच्या स्वाऱ्यांचे  परिणाम होते.

2. महंमद घोरीची कामगिरी लिहा.

उत्तर –  महंमद घोरीच्या कामगिरीमध्ये भारतातील सिंध आणि पंजाब प्रांत सुरक्षित करणे समावेश होतो. त्याने पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याला ठार मारले व  दिल्ली जिंकली.त्याने जिंकलेले प्रदेश आपल्या सेनापती कुतुबुद्दीन ऐबककडे स्वाधीन केले. कुतुबुद्दीन दिल्लीचा सुलतान म्हणून राज्य करू लागला.

3. कुतुबुद्दीन ऐबकाची कामगिरी लिहा.

उत्तर –  कुतुबुद्दीन ऐबक हा सुरुवातीला महंमद घोरीचा गुलाम होता.त्यामुळे त्यांना ‘गुलाम वंश’ म्हणतात.त्याने शत्रूला जिंकून तुर्कांचे राज्य बळकट केले.आपल्याला मिळालेल्या विजयाची आठवण म्हणून दिल्ली येथील मेहरोली मध्ये कुतुब मिनार बांधण्यास सुरुवात केली. सुलतान इल्तुमिशच्या काळात तो पूर्ण झाला.

4. अल्लाउद्दीन खिलजीने राज्यकारभारात केलेले विविध प्रयोग कोणते ? त्यांचे परिणाम सांगा.

उत्तर – अल्लाउद्दीन खलजीने आपल्या राजवटीत अनेक धोरणे आणली. त्यांनी सामान्यतः वापरल्या जाणार्‍या वस्तूंच्या किमती नियंत्रित केल्या,दिल्लीत दारू आणि जुगार खेळण्यावर बंदी घातली आणि या कृती करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही केली.संपूर्ण भारत जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणावा अशी अल्लाउद्दीन यांची महत्वकांक्षा होती आणि ती साध्य करण्यासाठी लष्करी ताकदीचा वापर केला.त्याच्या लष्करी मोहिमांमुळे उत्तर भारतावर ताबा मिळविला.आपला गुलाम मलिक कपूर याला पाठवून दक्षिण भातातातील अनेक राज्ये त्यांच्या राजधान्या व अनेक देवालये लुटून भरपूर धनसंपत्ती गोळा केली.

5. महंमद बिन तुघलकाने केलेले राज्यकारभारातील प्रयोग असफल का झाले ?

उत्तर –   तुघलक घराण्यामध्ये महम्मद बिन तुघलक हा प्रमुख सुलतान होऊन गेला.त्याने आपली राजधानी दिल्ली ऐवजी भारताच्या मध्यभागी असलेल्या देवगिरी येथे केल्यास ते आपल्या साम्राज्याचे मध्यवर्ती ठिकाण होईल असा विचार करून राजधानी दिल्लीहून देवगिरीला स्थलांतरीत केली.  महम्मद तुघलकने चांदीच्या नाणे ऐवजी तांब्याची तेवढ्याच तांब्याची नाणी चलनात आणली.परंतु तांब्याची नाणी छापण्याचा अधिकार फक्त सरकारलाच असेल अशी राजाज्ञा केली नाही.त्यामुळे राज्याचा खजिना रिकामा झाला इत्यादी महम्मद बिन तुघलकने केलेले प्रयोग होय.या धोरणांमुळे असंतोष आणि बंडखोरी माजली.

6. दिल्लीच्या सुलतानाच्या काळातील राज्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती कशी होती ?

उत्तर – दिल्ली सुलतानांच्या राजवटीत,जमीन महसुलाचा बोजा शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पडला, ज्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापक बंद केले.विणकाम हा एक प्रमुख व्यवसाय होता आणि शहरात बांधकाम व्यवसाय मोठ्या परमाणात चालत असे त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळत अस.गुलामगिरी प्रचलित होती, सुलतान भारतीयांना गुलाम बनवून बाजारात विकत होते.

7. दिल्लीच्या सुलतानांनी वास्तुशिल्पकला व साहित्याला दिलेले योगदान कोणते ?

उत्तर – दिल्ली सुलतानांनी वास्तुशिल्प आणि साहित्यात महत्वपूर्ण योगदान दिले. दिल्ली सुलतानांच्या काळातील प्रमुख वास्तुशिल्प म्हणजे प्रसिद्ध कुतुबमिनार (71 मी.उंच),अलाई दरवाजा हे सुंदर द्वार,कव्वत-उल-इस्लाम मशीद आणि सिरी किल्ला हे होत.

साहित्याच्या दृष्टीने उर्दू भाषेचा विकास झाला आणि अमीर खुस्त्रो अमीर हसन यांसारख्या कवींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.हा संगीतकार  होता.जयशी कवीने ‘पद्मावत’ हे सुफी काव्य लिहिले.रामानंद,कबीर,रोहिदास,मीरा हे या काळातील संत होते.

IV. खालील ‘अ’ आणि ‘ब’ गटाच्या जोड्या जुळवा.

          अ                           ब

1. जयशी                            अ. अलाई दरवाजा

2. दौलताबाद                       आ. सितार

3. अल्लाउद्दीन खिलजी          इ. पद्मावत

4. अमीर खुस्रो                     ई. देवगिरी

उत्तर –

अ                           ब

1. जयशी                            इ. पद्मावत


2. दौलताबाद                       ई. देवगिरी

3. अल्लाउद्दीन खिलजी          अ. अलाई दरवाजा

4. अमीर खुस्रो                     आ. सितार

Share with your best friend :)