इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
स्वाध्याय
प्रकरण 12 – उत्तर भारतातील प्राचीन राजघराणी
मौर्य
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा
1. सेल्यूकसने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मेगॅस्थनीस या राजदूताला पाठवले.
2. ‘सर्व प्रजा माझ्या मुलांसारखी आहे’ असे सांगणारा सम्राट अशोक.
3. आपले राष्ट्रचिन्ह सिंहमुद्रा हे आहे.
4. कनिष्काने आपल्या अधिकारावर येण्याची आठवण म्हणून शके वर्ष सुरू केले.
II.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?
उत्तर – चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
2. मौर्यांच्या राजधानीचे नाव सांगा.
उत्तर – पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी होती.
3. कौटिल्याने लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर – कौटील्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला.
4. मेगॅस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय?
उत्तर – मेगॅस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव इंडिका असे होते.
5. “सर्व प्रजा माझ्या मुलासारखी आहे” असे म्हणणारा सम्राट कोण?
उत्तर – “सर्व प्रजा माझ्या मुलासारखी आहे” असे सम्राट अशोकाने म्हटले आहे.
6. धर्ममहामात्र करत असलेली कार्ये कोणती?
उत्तर – जनतेमध्ये चांगल्या वागणुकीचा प्रचार करणे.धार्मिक नितीन नियमांचा प्रचार करणे.अनाथ विधवा आणि वयोवृद्धांची निगा राखणे.ही धर्ममहामात्रांची कार्ये होती.
7. कनिष्काने बौद्ध महासभा कोठे घेतली?
उत्तर – कनिष्काने काश्मीरमध्ये बौद्ध महासभा घेतली.
III. गटात चर्चा करून उत्तरे लिहा.
1. कलिंग युध्दाचे महत्व लिहा.
सम्राट अशोक गादीवर आल्यानंतर आठव्या वर्षी त्याने कलिंग राज्यावर आक्रमण केले.युद्धात हजारो लोक मरण पावले आणि लाखो लोक जखमी झाले.युद्धभूमीवरील मृतदेह आणि लोकांच्या वेदनांनी सम्राट अशोकाचे मन दुःखी झाले.हे पाहून सम्राट अशोकांनी युद्धाचा मार्ग सोडून शांती आणि धर्मप्रसाराचा मार्ग स्वीकारला.बौद्ध धर्माचा स्वीकार करून अशोकाने दयाळू आणि अहिंसक प्रशासन चालविले.माणुसकी, अहिंसा आणि सहनशीलता या तत्त्वांचा प्रचार करणे सुरू केले.
कलिंग युद्ध सम्राट अशोकाच्या जीवनातील आणि भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. युद्ध झाल्यानंतर अशोकाच्या जीवनात मोठा बदल झाला, आणि त्याने हिंसेच्या मार्गाऐवजी शांतीचा मार्ग स्वीकारला.
IV. खालील ‘अ’ आणि ‘ब’ यादीलील शब्दाच्या जोड्या जुळवा:
अ ब
1. अशोक (अ) कनिष्कपूर
2. कनिष्क (आ) बुध्दचरित
3. अश्वघोष (इ) कलाकेंद्र
4. गांधार (ई) देवनामप्रिय
उत्तर –
अ ब
1. अशोक (ई) देवनामप्रिय
2. कनिष्क (अ) कनिष्कपूर
3. अश्वघोष (आ) बुध्दचरित
4. गांधार (इ) कलाकेंद्र
गुप्त घराणे
तुम्हाला माहिती असू द्या
❇️ गुप्त साम्राज्य सुमारे 1600 वर्षापूर्वी स्थापन झाले आणि त्यांनी सुमारे 200 वर्षे राज्य केले.
❇️ कालिदासाची नाटकेः अभिज्ञान शाकुंतल, मालविकाग्निमित्र आणि विक्रमोर्वशिय; काव्येः रघुवंश, कुमारसंभव, ऋतुसंहार व मेघदूत ही होत.
❇️ गुप्त काळातील देवालये प्रारंभी चौकोनाकृती पायावर बांधली जात असत. गाभारा आणि ओसरी मात्र असायचे.
❇️ भित्ती म्हणजे भिंत. भिंतीवर काढलेल्या चित्राना भित्तिचित्र असे म्हणतात. भित्तिचित्रे अजंठा येथील बौद्ध गुहांमध्ये चितारलेली आहेत. सामान्य कुंचल्याच्या सहाय्याने व नैसर्गिक उपलब्ध रंगांनी ही चित्रे चितारलेली आहेत. शतकानुशतके या गुहा अनभिज्ञ होत्या. 1819 साली या गुहांचा शोध लगाला.
❇️ मेहरौली येथील लोखंडी स्तंभाचे वजन सहा टन आणि उंची 23 फूट आहे. 19 व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत कोणत्याही युरोपियन लोहाराला देखील असा लोखंडी खांब बनविता आलेला नाही.
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
1. गुप्तांची राजधानी: पाटलीपुत्र
2. कविराज ही पदवी मिळविलेला गुप्तांचा राजा: सम्राट चंद्रगुप्त (द्वितीय)
3. ‘मुद्राराक्षस’ कृतीची रचना केलेले: विशाखदत्त
4. ‘कविकुलगुरु’ ही पदवी धारण केलेले महाकवी: कालिदास
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. अलाहाबाद (प्रयाग) येथील स्तंभाच्या शिलालेखात कोणत्या सम्राटाचे वर्णन आढळते?
उत्तर – प्रयाग येथील स्तंभाच्या शिलालेखात समुद्रगुप्ताचे वर्णन आढळते.
२. गुप्त राजवटीत भारताला भेट देणारा चिनी प्रवासी कोण होता?
उत्तर – फाहियाना हा गुप्त राजवटीत भारताला भेट देणारा चिनी प्रवासी होता.
3. कालिदासाने लिहिलेल्या कोणत्याही एक नाटकाचे नाव लिहा.
उत्तर – ‘अभिज्ञान शाकुंतल’ हे कालिदासांनी लिहिलेले नाटक आहे.
4. ‘मृच्छकटिक’ कोणी लिहिले?
उत्तर – शूद्रक या साहित्यकारने मृच्छकटिक हे नाटक लिहिले.
5. अमरसिंह यांनी रचलेला शब्दकोश कोणता ?
उत्तर – अमरसिंह यांनी ‘अमरकोश’ नावाचा शब्दकोश लिहिला.
6. गुप्त काळातील प्रसिद्ध गणित तज्ञाचे नाव काय ?
उत्तर – आर्यभट्ट हा गुप्तकाळातील प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होताIII. गटात चर्चा करून उत्तरे लिहा:
1. समुद्रगुप्ताच्या योगदानाचे वर्णन करा:
उत्तर – समुद्रगुप्त हा गुप्त साम्राज्याचा एक महापराक्रमी राजा होता. त्याच्या दिग्विजय मोहिमांमुळे त्याला एक श्रेष्ठ सेनानी मानले जाते. प्रयाग (अलाहाबाद) येथील शिलालेखातून कळते की त्याने उत्तर भारतातील नऊ राजांचा पराभव केला आणि अनेक दक्षिण भारतीय राजांना नमवले. यामुळे त्याचे वर्चस्व संपूर्ण भारतात प्रस्थापित झाले. त्याच्या काळात अफगाणिस्तानातील कुशाण आणि गुजरातमधील शक राजांनी त्याच्या श्रेष्ठत्वाला मान्यता दिली. तो शिक्षणप्रेमी होता आणि संगीत आणि काव्य दोन्ही क्षेत्रात पारंगत होता. समुद्रगुप्ताने ‘अश्वमेध यज्ञ’ करून आपल्या विजयाची आठवण ठेवली.
2. संस्कृत साहित्याला गुप्तांच्या देणगीबद्दल वर्णन करा:
उत्तर – गुप्तकाल हा संस्कृत साहित्याच्या भरभराटीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात महाकवी कालिदासासारख्या महान कवींचे नाट्य आणि काव्य सृजन घडले. कालिदासाने ‘अभिज्ञान शाकुंतल,’ ‘मेघदूत,’ आणि ‘रघुवंश’ यांसारखी अप्रतिम साहित्यकृती लिहिल्या. ‘मुद्राराक्षस’ हा विशाखदत्ताने लिहिलेला नाटकही या काळात प्रसिद्ध झाले. तसेच अमरसिंहाच्या ‘अमरकोश’ या शब्दकोशाचे योगदानही महत्त्वपूर्ण मानले जाते. गुप्तकाळातील साहित्य आणि विद्वानांनी संस्कृतीला आणि शिक्षणाला एक महत्वपूर्ण देणगी दिली.
IV. खालील ‘अ’ आणि ‘ब’ यादीलील शब्दाच्या जोड्या जुळवाः
अ ब
1. कविराज (अ) घो-को-की
2. विक्रमादित्य (आ) खगोलगास्त्रज्ञ
3. फाहियान (इ) समुद्रगुप्त
4. मेहरौली ई) दुसरा चंद्रगुप्त
5. वराहमिहीर उ) लोखंडी खांब
उत्तर – अ ब
1. कविराज (इ) समुद्रगुप्त
2. विक्रमादित्य ई) दुसरा चंद्रगुप्त
3. फाहियान (अ) घो-को-की
4. मेहरौली (उ) लोखंडी खांब
5. वराहमिहीर (आ) खगोलगास्त्रज्ञ
वर्धन घराणे
रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा:
1. हर्षवर्धनाचा मित्र असलेला चिनी प्रवासी हयु-एन-त्संग
2. हयु-एन-त्संगच्या प्रवास वर्णन पुस्तकाचे नाव सि-यु-की (Records of Western Kingdom)
3. नालंदा विश्वविद्यालय सध्या बिहार राज्यात आहे
4. हर्षवर्धनाला नर्मदा नदीच्या तीरावर पराभूत केलेला कन्नड राजा इम्मडी पुलकेशी
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. हर्षवर्धनाच्या भाऊ व बहिणीचे नाव:
उत्तर – भाऊ: राजवर्धन
बहीण: राजश्री
2. हर्षवर्धनाची राजधानी कोणती?
उत्तर – कनोज
3. हर्षचरित ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर – बाणभट्ट
4. हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या नाटकांची नावे:
उत्तर – प्रियदर्शिका, रत्नावळी, नागानंद
5. प्राचीन भारतातील प्रसिद्ध विश्वविद्यालय कोणते? आणि ते कोठे आहे?
उत्तर – नालंदा विश्वविद्यालय, बिहार राज्यात
काश्मीरचे कार्कोटा राज्य
रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा:
1. कार्कोट वंशाचा प्रसिद्ध राजा ललितादित्य.
2. गीतगोविंद लिहिलेले कवी जयदेव.
3. अहोम राजवंशाने आसाम प्रदेशावर राज्य केले.
4. गुर्जर प्रतिहार वंशाचा राजा भोजच्या दरबारात भेट दिलेला अरब प्रवासी सुलेमान.
II.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. रजपूतांचे गुणधर्म कोणते?
❇️रजपूत पराक्रमी, साहसी आणि शौर्यवान होते.
❇️त्यांनी गोरक्षण आणि स्त्रिया व दुर्बल लोकांचे रक्षण धर्म मानला.
❇️युद्धामध्ये वीरगाथा गात आत्मसन्मानासाठी लढत असत.
❇️स्त्रिया पतीचे निधन झाल्यास अपमानित जीवन जगण्यापेक्षा ‘जौहर’ परंपरेने आत्मसमर्पण करीत असत.
2. रजपूतांच्या तीन प्रसिद्ध वास्तुशिल्पाची नावे आणि स्थान:
खजुराहो मंदिर – मध्य प्रदेश
दिलवारा मंदिर – माउंट अबू, राजस्थान
हवामहल – जयपूर, राजस्थान
3. ‘पृथ्वीराज चौहान’ यांच्या विषयी टिपा:
उत्तर – पृथ्वीराज चौहान हा चौहान वंशातील प्रसिद्ध राजा होता.त्यांनी मुघल शासक महमद घोरीच्या आक्रमणाला विरोध केला.घोरीच्या दुसऱ्या आक्रमणात त्यांचा पराभव झाला आणि त्यांना कैदेत ठार मारण्यात आले. पृथ्वीराज चौहान यांना त्यांच्या शौर्य आणि धैर्यासाठी ओळखले जात असे.
4. बप्पारावळ कोण होता?
उत्तर – बप्पारावळ हा गुहील वंशातील पराक्रमी राजा होता. त्याने अरबांच्या आक्रमणांपासून राज्याचे रक्षण केले. त्याला 32 किल्ल्यांचे बांधकाम केल्याचे श्रेय दिले जाते.
5. राणा संग्रामसिंहावर टिपा:
उत्तर – राणा संग्रामसिंह, उर्फ राणा संग, हा गुहील वंशातील राजा होता.त्यांनी अनेक लढाया केल्या आणि त्यांच्या शरीरावर 80 जखमा होत्या.त्यांनी दिल्लीच्या सुलतानांविरुद्ध अनेक युद्धे लढली.
6. रजपूतांच्या सामाजिक स्थितीवर टिपा:
उत्तर – महिलांना समाजात आदराचे स्थान होते, आणि त्या साहित्य, नृत्य व कलांमध्ये पारंगत होत्या.समाजात वर्गव्यवस्था प्रचलित होती, जिथे व्यापारी आणि शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावत होते.राजे पुण्यक्षेत्रात स्नान करणे आणि धार्मिक अनुष्ठान करणे पवित्र मानत असत.