KTBS KARNATAKA
STATE SYLLABUS
CLASS – 10
MARATHI MEDIUM
SUBJECT – SOCIAL STUDIES
PART – 2
HISTORY
प्रकरण 17
17.THE FIRST WAR OF INDIAN INDEPENDENCE (1857)
भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध – (1857)
महत्त्वाच्या नोंदी:
1. पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची कारणे:
– ब्रिटिशांनी दत्तक वारस नाकारून स्थानिक राज्ये इंग्रज राज्यात समाविष्ट केली (खालसा धोरण).
– आर्थिक संकटामुळे भारतीय कारागीर आणि शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली.
– सैन्यातील भारतीय सैनिकांच्या असंतोषाने बंड उभे केले.
2. तात्कालीन कारणे:
– नवीन रायफल काडतुसे गाई आणि डुकराच्या चरबीने बनवल्याची अफवा.
– मंगल पांडेचा बंड, मीरत येथे सैन्याचा उठाव, दिल्लीकडे कूच.
3. बंडाचे प्रमुख नेते:
– नाना साहेब (कानपूर), राणी लक्ष्मीबाई (झांशी), तात्या टोपे (कानपूर आणि झांशी).
4. बंडाचे अपयश:
– नेतृत्वाचा अभाव, असंघटितपणा, स्थानिक राजांचे इंग्रजांना समर्थन.
5. परिणाम:
– ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपली.
– ब्रिटन राणीने भारताचा ताबा घेतला, ‘मॅग्ना चार्टा’ जाहीरनामा प्रसिद्ध केला.
स्वाध्याय
1. खालील गाळलेल्या जागा योग्य पदानी भरा :
1.युरोपियन इतिहासकारांनी 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाला ‘शिपायांचे बंड‘ असे म्हटले आहे.
2. 1857 च्या बंडात बराकपूर येथे मंगल पांडेने शिपायाने ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले.
3. झांसीच्या राणीने इंग्रजांविरूद्ध ग्वाल्हेर प्रदेश ताब्यात घेतले.
4. 1857 मध्ये भारतासाठी ब्रिटिश राणीने केलेल्या घोषणेला ‘मॅग्ना चार्टा’ म्हणतात.
II. समुहात चर्चा करुन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
5. दत्तक वारस नामंजूर या तत्वाचे परिणाम काय झाले?
उत्तर – इंग्रजांच्या खालसा धोरणामुळे ज्या राजांना दत्तक वारस नव्हता, त्यांची राज्ये इंग्रजांनी ताब्यात घेतली.यामुळे अनेक राज्ये इंग्रजांच्या हातात गेली, आणि अनेक राजे, शिपाई, आणि जनता असंतुष्ट झाली.
6. या काळातील आर्थिक परिस्थिती 1857 च्या बंडाला कसे कारणीभूत ठरली?
उत्तर – 1.इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीमुळे भारतातील कुटिरोद्योगांचा नाश झाला.
2.अनेक कामगार,कारागीर बेरोजगार झाले.
3. कर वाढविला व कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून जमिनी काढून घेतल्या.
4.जमिनदार शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले.त्यामुळे सामान्य लोकांमध्ये असंतोष वाढला.
7. 1857 च्या युद्धात शिपायांच्या धार्मिक भावना कशा दुखवल्या गेल्या?
उत्तर – नवीन बंदुकींच्या काडतुसांमध्ये गाईची आणि डुकराची चरबी असल्याची अफवा पसरली. हिंदू शिपायांसाठी गाईची चरबी आणि मुस्लिम शिपायांसाठी डुकराची चरबी धार्मिक दृष्ट्या अधार्मिक होती.यामुळे शिपाई असंतुष्ट झाले व त्यांच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या.
8. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला कारणीभूत असलेली तत्कालीन कारणे कोणती?
उत्तर – इंग्रजांच्या सैन्यातील काडतुसांच्या मुद्द्यावरून शिपाय दुःखी झाले.हिंदू शिपायांसाठी गाईची चरबी आणि मुस्लिम शिपायांसाठी डुकराची चरबी धार्मिक दृष्ट्या अधार्मिक होती. तरीही इंग्रजांनी शिपायांना जबरदस्तीने काडतुस दातांनी फोडायला सांगितले. हेच पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे तात्कालिक कारण ठरले.
9. बंडाच्या अपयशाची कारणे कोणती होती?
1.ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरलीच नाही.
2.बंडात एकता नव्हती.
3.योग्य नेतृत्वाचा अभाव,बेशिस्तपणा,जनतेचा पाठिंबा नव्हता.
4.इंग्रजी सैन्यातील एकी व भारतीय सैनिकातील असंघटीतपणा.
5.अनेक संस्थानिकांनी बंड मोडून काढण्यास इंग्रजांना मदत केली.
10. 1858 मध्ये ब्रिटनच्या राणीने दिलेली आश्वासने कोणती होती?
उत्तर – 1858 मध्ये ब्रिटनच्या राणीने खालील आश्वासने दिली-:
1.भारतीयांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप केला जाणार नाही.
2.कायद्यामध्ये समानता ठेवली जाईल.
3.स्थिर सरकार देण्याचे आश्वासन दिले.
4.स्थानिक राजांशी करार स्वीकृत करण्याचे आश्वासन दिले.
एक गुणाचे प्रश्न व उत्तरे:
1. 1857 च्या बंडाला युरोपियन इतिहासकार काय म्हणतात?
उत्तर – शिपायांचे बंड.
2. 1857 च्या बंडात कोणत्या शिपायाने ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले?
उत्तर – मंगल पांडे.
3. झांसीच्या राणीने कोणते राज्य ताब्यात घेतले?
उत्तर – ग्वाल्हेर.
4. 1858 मध्ये ब्रिटनच्या राणीने दिलेल्या घोषणेला काय म्हणतात?
उत्तर – मॅग्ना चार्टा.
5. ‘दत्तक वारस नामंजूर’ धोरणाचा परिणाम काय झाला?
उत्तर – राज्ये इंग्रजांच्या ताब्यात गेली.
6. 1857 च्या बंडात कोणत्या शस्त्रांमुळे शिपाय असंतुष्ट झाले?
उत्तर – काडतुसे (चरबीयुक्त).
7. 1857 च्या बंडात कोणते मुख्य ठिकाण होते?
उत्तर – मीरत.
8. तात्या टोपे कोणाच्या मदतीला झांशीला आला?
उत्तर – राणी लक्ष्मीबाईच्या.
9. 1857 चे बंड कोणत्या राज्यात उग्र स्वरूपात झाले?
उत्तर – कानपूर.
10. अवधचा नवाब कोणाच्या धोरणामुळे सत्ता गमावतो?
उत्तर – खालसा धोरण.
11. 1857 चे बंड मुख्यतः कोणाच्या विरुद्ध होते?
उत्तर – इंग्रजांच्या विरुद्ध.
12. 1857 च्या बंडाचे आर्थिक कारण कोणते होते?
उत्तर – कुटिरोद्योगांचा नाश.
13. 1857 चे बंड कोणत्या बंदुकींवरून सुरू झाले?
उत्तर – रॉयल एन्फिल्ड.
14. झांसीच्या राणीने कोणत्या मुलाला पाठीशी बांधले होते?
उत्तर – दत्तक मुलाला.
15. 1857 च्या बंडामुळे कोणत्या संस्थेची सत्ता संपुष्टात आली?
उत्तर – ईस्ट इंडिया कंपनी.