KTBS KARNATAKA
STATE SYLLABUS
CLASS – 10
MARATHI MEDIUM
SUBJECT – MARATHI
PART – 2
मराठी
पाठ 8
पाठ-8: मेळघाटचे शिल्पकार
लेखिका: मृणालिनी चितळे
लेखिका परिचय:
मृणालिनी चितळे (1957) यांची 18 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यात कथासंग्रह, नाटकं, आणि शब्दांकनाचा समावेश आहे. त्यांच्या “कर्ताकरविता” या संपादित पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला. “मेळघाटावरील मोहर” या पुस्तकासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी महर्षी कर्वे संस्थेच्या संचालक मंडळावरही 12 वर्षे काम केले आहे.
पाठाचा सारांश:
लेखात डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे यांनी अतिदुर्गम भागातील बैरागडमध्ये केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख आहे. शिक्षण, आरोग्य, आणि शेती यावर त्यांनी भर दिला. त्यांनी गावातील गरीब कुटुंबांना शाळेत मुलांना पाठवण्याचा आग्रह धरला. मात्र, मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांचं आचरण आणि वर्तन फारसं बदललं नाही. काही मुलं शिक्षण अर्धवट सोडून रिकामं बसू लागली तर काहींनी फक्त पोशाखात बदल केला.
डॉक्टरांनी फक्त संस्था न उभारता लोकांमध्ये प्रबोधन करण्यावर भर दिला. त्यांनी शिबिरं घेतली आणि मुलांना शेती, आरोग्य, पर्यावरण, आणि शासकीय योजना यांची माहिती दिली. या शिबिरांमधून तरुणांना शिकवून त्यांनी सामाजिक बांधिलकी वाढवली आणि गावातील तरुण वर्ग जागरूक बनवला. या प्रयत्नांमुळे मेळघाट भागात आत्महत्या थांबवण्यात यश मिळाले.
मूल्य – सामाजिक बांधिलकी
प्र. 1 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. टपरीपाशी उभ्या असलेल्या तरुणाच्या हातात कोणते पाकीट होते?
उत्तर: टपरीपाशी उभ्या असलेल्या तरुणाच्या हातात गुटक्याचे पाकीट होते.
2. डॉक्टरांनी त्या मुलाला कोणता प्रश्न केला?
उत्तर: डॉक्टरांनी त्या मुलाला,अरे बाबू,तुझी तब्येत केवढी तरी उतरली,काय करतो रे?” असा प्रश्न केला.
3. पँट-शर्ट घालणाऱ्या मुलाला काय म्हणतात?
उत्तर: पँट-शर्ट घालणाऱ्या मुलाला शहरातल्या पद्धतीनुसार बदललेला म्हणतात.
4. डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मुले कोणत्या शाळेत भरती झाली?
उत्तर: डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मुले आश्रम शाळेत भरती झाली.
5. शाळेत जाऊन मुलांनी किती मार्क मिळविले?
उत्तर: शाळेत जाऊन मुलांनी जेमतेम 35-40 गुण मिळविले.
6. शहरात जाऊन मुलांनी कोणता पोशाख स्वीकारला?
उत्तर: शहरात जाऊन मुलांनी जिन्स पँट आणि पुर्ण बाह्याचा शर्ट घालायला सुरुवात केली.
7. शिबिरं कोणासाठी घ्यावीत असे डॉक्टरांना वाटले?
उत्तर: शिबिरं तरुणांसाठी घ्यावीत असे डॉक्टरांना वाटले.
8. कोणत्या वयोगटातील मुलं शिबिरात दाखल झाली?
उत्तर: 18 ते 20 वयोगटातील मुलं शिबिरात दाखल झाली.
9. शिक्षणामुळे माणसांमध्ये कोणता बदल होतो?
उत्तर: शिक्षणामुळे परिपक्वता आणि संधींविषयी जागरूकता येते.
10. डॉक्टरांनी संस्था न काढता काम करण्याविषयी कोणाशी चर्चा केली?
उत्तर: डॉक्टरांनी संस्था न काढता काम करण्याविषयी डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी चर्चा केली.
प्र. 2 रिकाम्या जागा भरा
1. अरे बाबू तुझी तब्येत केवढी तरी उतरली.
2. मुलं शाळेत गेली तर गुराढोरं कोण बघेल?
3. शिक्षणामुळे माणसांमध्ये परिपक्वता यायला मदत होते.
4. त्यांनी अक्षरशः आपलं तनमनधन पणाला लावलं.
5. आदिवासी वातावरणाशी जुळवून घेताना त्यांची चिडचिड व्हायची.
6. या कार्यकर्त्यांनी गावांमध्ये जाऊन शेतीविषयक प्रयोग सुरू केले.
प्र. 3 खालील प्रश्नांची तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(1) आईबाबा मुलांना शाळेत का पाठवत नसत?
उत्तर: आईबाबांना वाटत असे की मुलं शाळेत गेली तर गुराढोरांचं आणि शेतातलं काम कोण पाहणार? शिवाय स्वयंपाक आणि घरकामसुद्धा कोण करणार याची चिंता त्यांना सतावत असे.शाळेतील शिक्षणामुळे रोजच्या जीवनातील गरजा सोडवता येतील का? याबद्दलही त्यांना शंका होती. म्हणून आईबाबा मुलांना शाळेत पाठवत नसत.
(2) आदिवासी आईबाबांकडे डॉक्टरांनी कोणता आग्रह धरला?
उत्तर: शिक्षणामुळे मुलांना वेगवेगळ्या संधी मिळतील आणि जगातील घडामोडी समजतील, असे डॉक्टरांचे मत होते. म्हणून डॉक्टरांनी प्रत्येक आईबाबांनी किमान एका मुलाला तरी शाळेत पाठवावे,असा आग्रह आदिवासी आईबाबांकडे धरला.
(3) डॉक्टरांनी कोणासाठी शिबिर घेण्यास सुरुवात केली?
उत्तर: डॉक्टरांनी 18-20 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी शिबिरं आयोजित केली.यामुळे तरुणांना शेती, आरोग्य, पर्यावरण, आणि शासकीय योजनांविषयी माहिती मिळाली.
(4) पर्यावरण या विषयाचं महत्त्व डॉक्टर कसे पटवून देत?
उत्तर: आदिवासींचे पूर्वज जंगलाचे संवर्धन करत आले आहेत.शहरातील लोक शुद्ध हवेसाठी येथे येतात, त्यामुळे आदिवासींनी स्वतःच्या नैसर्गिक संपत्तीचा फायदा कसा करून घ्यावा. अशा शब्दात पर्यावरण या विषयाचं महत्त्व डॉक्टर पटवून देत.
(5) डॉक्टरांनी सुरू केलेल्या शिबिरांचा उद्देश कोणता होता?
उत्तर: या शिबिरांचा उद्देश मुलांच्या जीवनाशी संबंधित ज्ञान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणे होता. मुलांना शेती, आरोग्य, पर्यावरण, आणि सरकारी योजनांची उपयुक्तता शिकवणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट होते.
प्र. 4 खालील प्रश्नांची पाच ते सहा वाक्यांत उत्तरे लिहा.
(1) शिक्षणामुळे मुलांमध्ये कोणता बदल झाला होता?
उत्तर: शिक्षणामुळे मुलांचा पोशाख बदलला होता; ते जिन्स पँट, शर्ट आणि गॉगल घालू लागले. मात्र, मुलांना शेतात काम करण्याची लाज वाटू लागली आणि त्यांनी गुटखा खाण्यासारख्या सवयी लावल्या. शिक्षणाच्या जोरावर अर्थार्जन करण्याचे कौशल्य त्यांच्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी शहरात तात्पुरते काम करून चैन करायला सुरुवात केली.
(2) टपरीपाशी उभ्या असलेल्या मुलाचे वर्णन डॉक्टरांनी कसे केले?
उत्तर: डॉक्टरांनी पाहिले की टपरीपाशी एक तरुण पाठमोरा उभा होता.तो जिन्स पँट, पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि गॉगल घालून उभा होता व गुटका खात होता. गुटका खाताना समोर डॉक्टर दिसताच त्याने गुटखा खिशात टाकत डॉक्टरांना नमस्कार केला.त्याच्या चेहऱ्यावरून काहीच काम नसल्याचे जाणवत होते.
(3) शिबिर घेण्यासाठी येणारे शिक्षक नाखूष का असत?
उत्तर: हे शिक्षक बाहेरगांवाहून आले असल्यामुळे आदिवासी वातावरण व परिस्थीतीशी जुळवून घेताना त्यांची चिडचिड व्हायची.त्यांना आदिवासी मुलांच्या शिकण्यात फारसा रस वाटत नव्हता.म्हणून ते “हे आदिवासी कधीच बदलणार नाहीत” असे म्हणत असत.
प्र.5 – संदर्भासह स्पष्टीकरण
(1) मुलं शाळेत गेली तर गुराढोरांचं कोण बघेल?
संदर्भ: हे वाक्य ‘‘मेळघाटचे शिल्पकार’’ या पाठातून घेतले असून या पाठाच्या लेखिका मृणालिनी चितळे या आहेत.
स्पष्टीकरण : जेंव्हा डॉक्टर मुलांना शाळेत पाठवा असे गावात सांगता असत तेंव्हा त्या मुलांचे आई वडील डॉक्टरांना उद्देशून मुलं शाळेत गेली तर गुराढोरांचं कोण बघेल? असा प्रश्न विचारायचे.
(2) ‘ये आदिवासी कभी नहीं बदलेगा‘
संदर्भ: हे वाक्य ‘‘मेळघाटचे शिल्पकार’’ या पाठातून घेतले असून या पाठाच्या लेखिका मृणालिनी चितळे या आहेत.
स्पष्टीकरण : जेंव्हा बाहेर गावाहून आलेल्या शिक्षकांना आदिवासी मुलांमध्ये कोणताही बदल होणार नाही.असे वाटायचा नाही त्यावेळी ‘ये आदिवासी कभी नहीं बदलेगा‘ असा त्यांचा दृष्टीकोन असायचा.
(3) ‘परंतु हे बदल घडवून आणणे एकट्या दुकट्याचं काम नाही.‘
संदर्भ: हे वाक्य ‘‘मेळघाटचे शिल्पकार’’ या पाठातून घेतले असून या पाठाच्या लेखिका मृणालिनी चितळे या आहेत.
स्पष्टीकरण : शाळेत शिक्षकांची अनुपस्थिती,पाठ्यपुस्तकांची भाषा तसेच मूल्यशिक्षणाचा अभाव या सर्वांमुळे
पटकन आदिवासी लोकांच्यात बदल होणार नाही हे डॉक्टरांनी ओळखलं तेंव्हा डॉक्टरांनी ‘परंतु हे बदल घडवून आणणे एकट्या दुकट्याचं काम नाही.’ असे म्हटले आहे.
प्रश्न 6: खालील प्रश्नांची उत्तरे सात ते आठ वाक्यात लिहा.
(1) डॉक्टरांनी शिबिरामध्ये कोणकोणत्या गोष्टींची माहिती दिली?
उत्तर: शिबिरामध्ये डॉक्टरांनी शेती,आरोग्य,पर्यावरण आणि शासकीय योजनांची माहिती दिली.त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास कसा फायदा होतो हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवले.आरोग्याच्या संदर्भात कुपोषण टाळण्यासाठी आहार आणि लसीकरणाचे महत्त्व समजावले.पर्यावरणाविषयी सांगताना त्यांनी जंगल संवर्धन आणि त्यातून मिळणाऱ्या संधींवर भर दिला. शासकीय योजनांबाबत जागरूकता निर्माण केली आणि शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा हे स्पष्ट केले.पटवारी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे उकळण्यास विरोध करण्याचे धैर्य कसे वाढवावे हे शिकवले.या सर्व विषयांचा संबंध मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेला.
(2) या शिबिराचा अदृश्य परिणाम कोणता होता?
उत्तर: या शिबिराचा अदृश्य परिणाम म्हणजे जवळपास 500 कार्यकर्ते तयार झाले, जे मेळघाटातील गावे सुधारण्यासाठी काम करू लागले. त्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती दिली आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यास मदत केली. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या वर्तणुकीला विरोध करण्याचे धाडस निर्माण झाले. गावासाठी ही तरुण मंडळी उपयुक्त ठरू लागली आणि जागरूक नागरिक घडले. शेतकऱ्यांना कर्जाची योग्य माहिती दिल्याने आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले. डॉ. कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मेळघाटात सकारात्मक बदल घडू लागला.
भाषाभ्यास
विरुद्धार्थी शब्द
1. उत्तीर्ण – अनुत्तीर्ण
2. उपयुक्त – अनुपयुक्त
3. जागरूक – उदासीन
4. नैराश्य – आशा
सराव प्रश्न आणि उत्तरे:
1. टपरीपाशी उभ्या तरुणाच्या हातात कोणते पाकीट होते?
गुटक्याचे पाकीट
2. डॉक्टरांनी त्या मुलाला कोणता प्रश्न केला?
“तुझी तब्येत केवढी तरी उतरली, काय करतोस?”
3. पँट शर्ट घालणाऱ्या मुलाला काय म्हणतात?
बाबू
4. डॉक्टरांच्या सांगण्यामुळे मुलं कोणत्या शाळेत भरती झाली?
आश्रम शाळेत
5. शाळेत जाऊन मुलांनी किती मार्क मिळविले?
35/40 गुण
6. शहरात जाऊन मुलांनी कोणता पोशाख स्वीकारला?
जिन्स आणि शर्ट
7. शिबिरं कोणासाठी घ्यावीत असे डॉक्टरांना वाटले?
तरुणांसाठी
8. कोणत्या वयोगटातील मुलं शिबिरात दाखल झाली?
18 ते 20 वयोगटातील
9. शिक्षणामुळे माणसामध्ये कोणता बदल होतो?
परिपक्वता येते
10. डॉक्टरांनी कोणाशी चर्चा करून संस्था न काढण्याचा निर्णय घेतला?
डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी
11. डॉक्टरांनी शिबिरांमध्ये कोणत्या विषयांवर भर दिला?
शेती, आरोग्य, पर्यावरण, शासकीय योजना
12. शिबिरातील पहिला दिवस कोणत्या विषयावर असायचा?
शेती
13. आरोग्याच्या प्रबोधनात कोणते महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट होते?
आहार आणि लसीकरण
14. डॉक्टरांनी पर्यावरणाविषयी कोणती शिकवण दिली?
जंगल संवर्धनाचं महत्त्व
15. शिबिरातील तिसरा दिवस कोणत्या विषयावर होता?
शासकीय योजना
16. डॉक्टरांच्या मते शिक्षणामुळे कोणता धोका वाढला?
मुलं शेतात काम करायला लाजू लागली
17. शिबिरांतून तयार झालेले कार्यकर्ते काय करू लागले?
शासकीय योजनांची माहिती देऊ लागले
18. शिबिरांचा अदृश्य परिणाम कोणता होता?
पाचशे कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली
19. मुलांनी पटवारीच्या वागणुकीला कसा विरोध केला?
दहा-वीस रुपये मागितल्यास नकार दिला
20. मेळघाट भागात आत्महत्या थांबण्याचे कारण काय होते?
डॉक्टरांचे प्रबोधन आणि शिबिरं
21. मेळघाटचे शिल्पकार पाठाचे लेखक कोण ?
मृणालिनी चितळे
22. मेळघाटचे शिल्पकार या पाठाचा वाङ्मय प्रकार कोणता?
संपादित लेख
23. मेळघाटचे शिल्पकार पाठाचे मूल्य कोणते ?
सामाजिक बांधीलकी
24. मेळघाटचे शिल्पकार हा पाठ या पुस्तकातून घेण्यात आला आहे?
मेळघाटातील मोहोर
25. मेळघाटाचे शिल्पकार असे कोणाला म्हटले आहे ?
डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे
26. कोल्हे दांपत्य कोणत्या ठिकाणी आपले कार्य करीत आहे ?
बैरागड (महाराष्ट्र)
27. कोल्हे दांपत्याला मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार कोणते ?
महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर व बाया कर्वे पुरस्कार.