अध्ययन सुचके प्राप्त करण्यासाठी आवश्यक क्रिया योजना तयार करताना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आवश्यक तंत्रांची यादी देण्यात आली आहे.
मूलभूत साक्षरता कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तंत्रे:
वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यतंत्रे:
> स्पष्ट उच्चारांसह वर्णमाला अक्षरे वाचणे.प्रत्येक मुलाला वाचण्याची संधी देणे. या आधी शिक्षकाने आदर्श वाचन करावे.
> मुख्य विषयांतील काही परिच्छेद वाचण्यास संधी देणे.
> भाषा शिकण्यासाठी पूरक खेळ/कृतींची रचना आणि आयोजन.
> वाचन स्पर्धा आयोजित करणे आणि सर्व मुलांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे.
> शिकण्यात पुढे आणि मागे असलेल्यांना जुळवून घेऊन वर्गात योग्य आसनव्यवस्था करणे.
>शाळेत मुलांसाठी वाचन स्पर्धा आयोजित करणे.
लेखन सामर्थ्य संबंधित कार्यतंत्रे
> वर्णमालेतील अक्षरांचा आकारावर आधारित लेखनाचा सराव करणे.
> शब्दांमधील अक्षरांमधील योग्य अंतर,वाक्यातील शब्दांमधील अंतर,विरामचिन्हे इत्यादी लक्षात घेऊन सराव करणे. (कॉपी बुक, डबल लाइन्ड, फोर लाइन्ड नोटबुक इ. वापरणे)
> स्पष्ट उच्चारांसह अक्षरे, बाराखडी आणि जोडाक्षरे लिहिण्याचा सराव करणे.
> सर्व मुलांना सतत श्रुतलेखन देणे.
> लेखनातील चुका सुधारण्यासाठी शिक्षक वर्गात तपासणी करून आवश्यक मारागदास देतात.
> लेखनाचा सराव स्वतंत्रपणे जोपासण्यासाठी आवश्यक उपक्रमांचे आयोजन करणे.
> लेखन स्पर्धा आयोजित करणे.चांगले लेखन शाळेच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करून त्याचे कौतुक करणे.
> लेखनाशी संबंधित खेळांचे आयोजन करणे.
> विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेनुसार शुद्ध लेखनाचा सराव करू द
घेणे.
> कित्ता वही वापरून सर्व विद्यार्थ्यांना स्पष्टपणे आणि चुका न करता लिहिता येईल अशी व्यवस्था करणे.
> गृहपाठ आणि विषयवर प्रश्नोत्तरे स्पष्ट आणि व्यवस्थित लिहतात याची खात्री करणे.
पायाभूत संख्याज्ञान सामर्थ्य संबंधित कार्यतंत्रे
> वर्गानुसार संख्या सांगणे आणि लिहिणे.
> स्थानमुल्यानुसार संख्या वाचणे आणि लिहिणे.
> स्थानमूल्य कोष्टक समजून घेणे.
>स्थानमुल्यानुसार संख्या वाचन आणि लिहिण्याच्या कौशल्यांचा सराव करा.
>दशकरहित आणि दशकसहित संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करणे.
> बेरीज आणि वजाबाकी करण्याचे कौशल्ये विकसित करणे.
>गुणाकार आणि भागाकार गणिते सोडविण्याचे कौशल्य विकसित करणे.
>गुण्य,गुणक आणि गुणाकार यांच्यातील संबंधांचा अर्थ लावणे.
> भाज्य, भाजक, भागलब्ध आणि बाकी यांच्यातील संबंध समजून घेणे.
> दैनंदिन जीवनावर आधारित गणिते सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे.
> मापनाचे साधने (औपचारिक आणि अनौपचारिक) संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरणा देणे.
> DSERT वेबसाईटवर ‘मॅट्रिक मेळा’ हस्तपुस्तिका वापरणे.
> लांबी, आकार, वजन,वेळ-आधारित दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी कौशल्ये विकसित करा.
> घड्याळ वापरून वाचन आणि वेळ सांगणे.
> वजनाचे यंत्र,मापन पट्टी वापरण्याची संकल्पना विकसित करणे.
> अपूर्णांकांचा समावेश असलेली गणिते सोडविण्याचे कौशल्य विकसित करा.
> आकृत्या ओळखणे आणि रचना करण्यासाठी प्रोत्साहन द्या.
> माहिती संग्रहित करणे आणि त्याचे विश्लेषण करणे.
> आवश्यक T.L.M. वापरून गणिती संकल्पना विकसित करणे.
> मजेदार गणित कोडी,खेळ आयोजित करणे.
>गणित कोडी सोडवण्याचा सराव, सुडोकू इ.