कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
माध्यम – मराठी
विषय – परिसर अध्ययन
इयत्ता – पाचवी
पाठावरील स्वाध्याय नमुना उत्तरे
पाठ-6.हवा
हवा ही एक नैसर्गिक स्त्रोत आहे. पृथ्वीभोवती हवेचे विविध थर आहेत त्याला वातावरण असे म्हणतात.
प्राणी आणि वनस्पतींच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध वायूंचे हवा एक मिश्रण आहे.
• हवा आपल्याला दिसत नाही परंतू तिचे अस्तित्व जाणवते. तुझ्या सभोवती हवा आहे हे तू कसे ओळखशील? यासंबंधी तुझे तीन अनुभव खाली लिही.
▶झाडाची पाने हालने.
▶हवेमुळे तापलेल्या अंगाला गारवा मिळतो.
▶ध्वजाचे लहरणे,केसांचे उडणे
वरील चित्रात दाखविलेले हवेचे संयोजन बघ व त्याचा अभ्यास कर आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1. हवेतील प्रमुख घटक असलेला वायू कोणता?
नायट्रोजन (78%)
2. आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असलेल्या वायूचे हवेमध्ये शेकडा प्रमाण किती आहे?
शेकडा (21%) प्रमाण आहे.
3. सामान्यपणे कार्बन-डायऑक्साईडचे हवेतील शेकडा प्रमाण किती आहे ?
कार्बन-ऑक्साईडचे शेकडा (0.04%) इतके प्रमाण आहे.
4. हवेमध्ये कमीतकमी प्रमाणात असलेला घटक कोणता?
कार्बन-ऑक्साईड (0.04%)
विचार कर –
वाहनाचा टायर पंक्चर झाल्यास टायरला काय होते?
उत्तर – वाहनाचा टायर पंक्चर झाल्यास टायरमधील हवा जाते.
येथे महिला शेगडी पेटविण्यासाठी काय करत आहे?यापासून तू काय शिकशील ?
उत्तर – ज्वलनास हवेची मदत होते.
तुझे शिक्षक किंवा वडीलधाऱ्यांच्या मदतीने हवेचे प्रदुषण रोखण्याचे दोन उपाय लिही.
1.सौर ऊर्जा,पवन ऊर्जा यासारख्या नैसर्गिक ऊर्जेंचा वापर करावा.
2.जास्तीत जास्त झाडे लावणे.
खाली दिलेल्या चित्रांच्या जोड्यांचे निरीक्षण करून हवेच्या प्रदुषणासंबंधी चुक आणि बरोबर ओळखून कारणे लिही.
बाईकचा वापर केल्याने प्रदूषण होते म्हणून सायकलचा वापर करावा.कारण सायकलीमुळे प्रदूषण होत नाही.
कचरा जाळण्यापेक्षा तो संग्रहित करावा व कुजवावा.कारण कचरा जाळल्याने हवा प्रदूषण होऊ शकते.
कोळशावर चालणाऱ्या आगगाडीपेक्षा विद्युत आगगाडीचा वापर करावा.