5th EVS 5.Natural Resources नैसर्गिक स्त्रोत

कर्नाटक राज्य अभ्यासक्रम

माध्यम – मराठी

विषय – परिसर अध्ययन

इयत्ता – पाचवी

आपली पृथ्वी ही जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्त्रोतांपासून बनली आहे.पाणी, माती, हवा, खनिजे, वनस्पती आणि प्राणी इत्यादी हे सर्व नैसर्गिकरित्या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.यांना स्त्रोत म्हणतात.मानवासह सर्व सजीवांना या स्त्रोतांची आवश्यकता असते.मानवाच्या प्रगतीमध्ये यांचे अतिशय महत्व आहे.

1. माझ्याशिवाय तू जगू शकत नाहीस,
सर्व झाडे, रोपे, प्राणी यांना माझी गरज,
मला कोणी पाहू शकत नाही.
तर मी कोण ?

2. पृथ्वीचा अधिक भाग मी व्यापतो,
सर्वांची तहान मी भागवतो,
प्राणी आणि वनस्पतींना मी गारवा देतो.
तर मी कोण?

3. माझ्या वरती तुम्ही रहाता,
रोपे आणि झाडे यांच्या वाढीला मी मदत करते,
माझ्यावर रहाणाऱ्यांना मी आधार देते.
तर मी कोण ? जमीन

5. बस, ट्रक, कार माझ्यामुळे धावतात,
माझ्या निर्मितीला हजारो वर्षे लागतात,
भू-गर्भातून मला तुम्ही खेचून घेता.
तर मी कोण ?

6. ताट, तांब्या, भांडी माझ्यापासून बनतात,
सुंदर दागिने माझ्यापासून तयार करतात,
माझे खनिजरूप तुझ्यामुळे घनरूपात येते.
तर मी कोण?

7. माझ्यापासून अंधार दूर पळतो,
प्रखर प्रकाश मी देतो,
ऊर्जेचे स्त्रोत, मी आहे एक.
तर मी कोण ?

कोळसा

लोखंड

पेट्रोल

डिझेल

स्वयंपाकाचा वायू

पाणी

ऑक्सिजन

जंगल

सोने

जंगली प्राणी

सौर ऊर्जा

पुनर्भवी स्त्रोतअपुनर्भवी स्त्रोत
पाणीकोळसा
ऑक्सिजनलोखंड
जंगलपेट्रोल
सोनेडिझेल
जंगली प्राणीस्वयंपाकाचा वायू
सौर ऊर्जा

प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी

▶विहीरीतून वाणी उपसा

▶विद्युत निर्मिती

▶अन्न शिजवणे

▶पाणी गरम करण्यासाठी

▶गोबर गॅस

▶सोलार दिवे

▶पवन चक्की

▶सोलार कुकर

उत्तर – 15 दिवसानंतर सूर्यप्रकाशात ठेवलेल्या कुंडीतील रोपांची पाने हिरवी होती मात्र अंधारात ठेवलेल्या कुंडीतील रोपांची पाणी पिवळी व कोमेजलेली दिसत होती.

मातीचा वापर खालील कामासाठी केला जातो-
1. घर बांधण्यासाठी
2. शेतीसाठी
3. विटा तयार करण्यासाठी
4. मडके बनविण्यासाठी
5. वनस्पतीच्या वाढीसाठी

• जोराने वारा वाहताना.
• पावसानंतर पाण्याचा प्रवाह वाहताना.
जमिनीच्या वरील थराची धूप रोखण्यासाठी खालील उपाय केले जातात.चित्रांचे निरीक्षण कर आणि तू काय शिकलास याची नोंद कर.

1.शेतीच्या भोवतीने बांध घातले जातात. 2.बांधावर झाडे लावली आहेत. 3.डोंगरभागात मोठे बांध घातले जातात.

उत्तर – जंगले देखील नैसर्गिक स्त्रोतांपैकी एक आहेत.जंगले फळे, फुले, वैद्यकीय वनस्पती,लाकूड इत्यादी देतात.जंगले आदिवासींसाठी आश्रयस्थान आहेत.जंगले जमिनीची धूप रोखतात.येथील झाडे ऑक्सिजन देतात आणि वातावरणात त्याचे प्रमाण वाढवतात. शहरीकरण,औद्योगिकीकरण,धरणे बांधणे इत्यादी विविध कार्यांसाठी जंगलतोड केल्यामुळे सर्वात मौल्यवान जंगले नष्ट होत आहेत.जंगलतोड म्हणजे पृथ्वीवरील जीवन नष्ट करणे हे आपण विसरू नये.

जंगलांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.का? खाली दिलेल्या जागेत कारणे लिही.

उत्तर – जंगलांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण –

1. जंगले आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतात.
2. ते प्राणी आणि वनस्पतींसाठी घरे देतात.
3. जंगले पाऊस पाडण्यास आणि हवामान थंड ठेवण्यास मदत करतात.
4. झाडे मातीची धूप आणि पुरापासून बचाव करतात.
5. अनेक लोक अन्न आणि उपजीविकेसाठी जंगलांवर अवलंबून असतात.
6. जंगले आपल्याला औषधे आणि महत्त्वाची संसाधने देतात.
7. जंगले निसर्गाचा समतोल राखतात.
8. जंगलांचे संरक्षण केल्याने सर्वांसाठी निरोगी वातावरण मिळते.
9. आपल्या भविष्यासाठी आपण जंगले वाचवली पाहिजेत.

उत्तर –पेट्रोल,डिझेल,रॉकेल

उत्तर – गॅस,विजेची शेगडी,रॉकेल

घनरूप इंधन : दगडी कोळसा
द्रवरूप इंधन : पेट्रोल डिझेल
वायुरूप इंधन : एलपीजी गॅस

स्वयंपाकाचा गॅसडिझेल / पेट्रोल
प्रेशर कुकरचा वापर करावा.वाहनांचा जास्त वापर टाळावा.
स्टोव्ह गरजेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवू नये.वाहनांची नियमित तपासणी करावी.
पर्यायी इंधनाचा वापर करावा.सिग्नलवर वाहने बंद करावी.

उत्तर

घर बांधकाम – लोखंड किंवा स्टील
गेट – लोखंड,स्टील,सळई इत्यादी
भांडी – स्टील,अल्युमिनियम
कढई – अल्युमिनियम,लोखंड
पिठाची गिरणी – स्टील,लोखंड
दागिने – सोने

दिलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचे उपयोग खालील तक्त्यात लिही.

नैसर्गिक स्त्रोतउपयोग
माती / जमीन –घर बांधण्यासाठी,शेतीसाठी,विटा तयार करण्यासाठी
जंगले –फळे,फुले,लाकडे,औषधे इत्यादी मिळतात.
सौर ऊर्जा – विद्युत निर्मिती,अन्न शिजवणे,पाणी गरम करण्यासाठी
प्राणी –दूध देतात,शेतीकामासाठी,खत मिळते
जैविक इंधने –वाहनांचे इंधन,उष्णता निर्मितीसाठी
खनिजे –दागिने,भांडी,घरबांधकाम,विविध

1. विटा √
2. सिमेंट
3. वाळू √
4. माती √
5. कौले
6. फरशी √
7. खिडक्या,दरवाजे √
8. सळई

पर्वत, जंगले, खनिजे, प्राणी, माती, पाणी यासारख्या नैसर्गिक वस्तूंना अलिकडेच नैसर्गिक स्त्रोत म्हणून गणले गेले आहे. हल्ली त्यांना अतिशय महत्व देण्यात आले आहे. काळानुसार स्त्रोत या शब्दाचा अर्थ बदलत आहे.

एका वस्तूला एकेकाळी स्त्रोत म्हणून गणले गेल्यास त्याच वस्तूला दुसऱ्या वेळी तसेच संबोधले जाऊ शकत नाही. उदाहरणार्यः आता नैसर्गिक वायू हे एक स्त्रोत आहे. परंतु हजार वर्षापूर्वी नैसर्गिक वायूला स्त्रोत समजले जात नव्हते.

सूर्यप्रकाश, पाणी, माती हे स्त्रोत पृथ्वीवर सर्वत्र आढळतात म्हणून यांना वैश्विक स्रोत असे म्हणतात.

जर जंगल स्त्रोत हे जळावू लाकूड आणि लाकडाचे ओंडके म्हणून वापरले तर त्याचा

पुनर्वापर करता येत नाही. याचा परिणाम म्हणून जंगले ही अपुनर्भवी स्रोत होतील. अधिकाधिक झाडे वाढविणे आणि लाकडाचा मर्यादीत वापर यामुळे जंगले पुनर्भवी खोत होऊ शकतील.

हल्ली काही पद्धतींचा उपयोग करून समुद्राचे पाणी पिण्यास योग्य बनविले जात आहे. परंतू या पद्धती फार खर्चिक आहेत.

मानवाची बुद्धीमता, निर्मिती कौशल्य, प्राविण्य, सौंदर्याभिरुची मानवाच्या ठायी असल्यामुळे त्यालाही एक नैसर्गिक स्त्रोत म्हणून गणले जाते.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *