इयत्ता – दहावी
कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
विषय – समाज विज्ञान
स्वाध्याय
3. भारतावरील ब्रिटीश सत्तेचे परिणाम
1. रिकाम्या जागी योग्य शब्द भराः
1. दिवाणी अदालत (नागरी कोर्ट) ची स्थापना वॉरन हेस्टिंग कडून झाली.
2. पोलिस अधीक्षकाचे पद लॉर्ड कॉर्नवालीस कडून निर्माण केले गेले.
3. बंगाल व बिहारमध्ये (कायमधारा) जमीनदारी पद्धती 1793 मध्ये सुरू करण्यात आली.
4. अलेक्झांडर रीडने सुरू केलेली जमीन महसूल पद्धत रयतवारी पद्धत होय.
5. भारतामध्ये आधुनिक शिक्षण पद्धती होय. पुरस्कृत करणारा ब्रिटिश अधिकारी मेकॉले होय.
6. रेग्युलेटिंग अॅक्टची अंमलबजावणी 1773 या वर्षी झाली.
II. खालील प्रश्नांची उत्तरे समूहात चर्चा करून लिहाः
7. ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिशांनी भारतात सुरू केलेल्या न्यायव्यवस्थेबद्दल चर्चा करून माहिती लिहा.
उत्तर – ईस्ट इंडिया कंपनीने तयार केलेल्या न्यायव्यवस्थेमध्ये 1772 साली वॉरन हेस्टिंग्जच्या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात दिवानी अदालत (नागरी न्यायालय) आणि फौजदारी न्यायालये स्थापन करण्यात आली.दिवाणी अदालतमध्ये हिंदूंसाठी हिंदू धर्मग्रंथांवर आधारित दिवाणी खटले आणि मुस्लिमांसाठी शरियतनुसार न्याय दिला जात असे.फौजदारी न्यायालयांमध्ये हळूहळू ब्रिटीश कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आणि दिवाणी न्यायालये युरोपीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली आली,तर फौजदारी न्यायालये काझींच्या अधिपत्याखाली असली तरी युरोपीय अधिकाऱ्यांच्या कार्यरत होती.
8. भारतामध्ये ब्रिटिश राजवटी दरम्यान पोलीस व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या?
उत्तर – लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात प्रथमच अत्यंत प्रभावी पोलीस यंत्रणा राबवली. त्यांनी पोलिस अधीक्षक (एसपी) हे नवीन पद निर्माण करून आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस ठाणे निर्माण केली व पोलीस ठाण्यावर कोतवालाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे प्रत्येक खेड्यात एका चौकीदाराची नेमणूक केली.1770 च्या दुष्काळामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा ब्रिटीशांच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली.1781 मध्ये ब्रिटीश दंडाधिकारी नेमण्याची पद्धत सुरू झाली आणि 1861 च्या स्वतंत्र भारतीय पोलीस कायदा अंमलात आला. हा कायदा एक उत्तम प्रशासनाचा व कायद्याचा मूलभूत पाया होता.1902 मध्ये पोलीस आयोगाने पात्र भारतीयांना अधिकारी बनण्याची परवानगी दिली.या सर्व उपाययोजना करूनही भारतीयांविरुद्ध भेदभाव कायम होता.
9. ब्रिटिश जमीन महसूल पद्धतीने भारतीय शेतकऱ्यांना ‘कर्जात जन्मण्यास, कर्जातच राहण्यास, कर्जातचं मरण्यास’ कसे भाग पाडले? ते स्पष्ट करा.
उत्तर – कायमधारा जमीनदारी पद्धत,महालवारी आणि रयतवारी पद्धती या ब्रिटीश जमीन कर पद्धतीमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कराचा बोजा पडला.उच्च कर,कृषी उत्पादकतेकडे दुर्लक्ष करून,दुष्काळ इत्यादी कारणांनी शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागे.पण कर्जाची रक्कम फेडता आली नाही तर त्यांना आपली जमीन विकावी लागे.कर्जाच्या या चक्रामुळे जमीनदारांच्या शोषणाला बळी पडलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांचा एक वर्ग निर्माण झाला.ज्यामुळे गरीबी आणि असुरक्षितता कायम राहिली.
10. रयतवारी पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती?
रयतवारी पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये -:
- अलेक्झांडर रीड यांनी रयतवारी पद्धती प्रथम बारामहल प्रांतात लागू केली आणि नंतर थॉमस मन्रोने यांनी मद्रास व म्हैसूर प्रांतात तशी चालू ठेवली.
- या पद्धतीत शेतकरी व कंपनीचा एकमेकांशी थेट संबंध आला.
- जो जमीन कसत असे तोच जमीन मालक म्हणून ओळखले जात होते.
- उत्पादनाच्या 50% जमीन रक्कम मालकाला कर म्हणून भरावे लागत होते.
- या जमीन महसुलाचा कालावधी 30 वर्षांचा होता.
11. ब्रिटिशांच्या जमीन महसूल पद्धतीचे परिणाम कोणते ?
ब्रिटीश जमीन महसूल पद्धतीचे परिणामः
1. शेतकऱ्यांचे शोषण करणारा जमीनदारांचा नवा वर्ग निर्माण झाला.
2. जमीनदारांच्या शोषणाला बळी पडलेले शेतकरी हळूहळू भूमिहीन झाले.
3. जमीन म्हणजे एक वस्तू समजली जाऊ लागली जमिनी गहाण ठेवून कर्ज उपलब्ध होऊ लागले.
4. अनेक जमीनदारांना जमिनीचा कर भरण्यासाठी त्यांच्या जमिनी गहाण ठेवाव्या लागल्या,
5. कृषी क्षेत्र हे इंग्लंडमधील कारखान्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाचे उत्पादन करणारे व्यावसायिक क्षेत्र बनले.
6. सावकार लोक गबर झाले.
12. भारतामध्ये आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे झालेल्या परिणामांची माहिती लिहा.
भारतामध्ये आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे खालील परिणाम झाले -:
– आधुनिकता,निधर्मीपणा, लोकशाही वृत्ती आणि राष्ट्रवादाचा विकास झाला.
– स्थानिक साहित्य आणि भाषांना उत्तेजन मिळाले.
– सरकारी कामकाजाची आणि धोरणांची छाननी करणाऱ्या नियतकालिकांचा उदय झाला.
– नवीन सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी सुरू झाल्या.
– जगभरातील स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव भारतीयांवरही पडला.
– भारताच्या समृद्ध परंपरांचे संवर्धन करण्याची जाणीव निर्माण झाली.
13. ‘रेग्युलेटिंग अॅक्ट’ मधील तरतुदी कोणत्या ?
1773 च्या रेग्युलेटिंग अॅक्टने अनेक तरतुदी लागू करण्यात आल्या:
– मद्रास व बाँबे प्रेसिडेन्सीवर बंगाल प्रेसिडेन्सीचे नियंत्रण आले.
– बंगालचा गव्हर्नर हा तिन्ही प्रेसिडेन्सीजचा गव्हर्नर जनरल बनला.
– बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या परवानगीशिवाय बॉम्बे व मद्रास प्रेसिडेन्सी युद्ध घोषित करू शकत नव्हते किंवा शांतता करार करू शकत नव्हते.
– कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना.
– कंपनीच्या भारतातील कारभारावर नियंत्रण ठेवणे हेच या कायद्याचे प्रमुख उद्दिष्ट होय.
14. 1858 च्या भारत सरकारच्या कायद्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या ?
उत्तर – 1858 च्या भारत सरकारच्या कायद्यातील प्रमुख तरतुदी -:
– ईस्ट इंडिया कंपनीची मान्यता रद्द करून भारत देशावर राणीचा राज्यकारभार सुरू झाला.
– गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव बदलून त्याला व्हाईसरॉय असे संबोधण्यात आले.लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले.
– ब्रिटीश मंत्रिमंडळात भारतीय राज्य सचिव पदाची निर्मिती करून भारताचा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली.
– सचिवांना मदत करण्यासाठी पंधरा सदस्यांची एक भारतीय परिषद अस्तित्वात आली.
15. 1935 चा भारत सरकारचा कायदा म्हणजे भारतीय संविधानाचा मूळ पाया होय’ याचे समर्थन करा.
उत्तर –
- या कायद्याने ब्रिटिश शासित प्रदेश स्थानिक संस्थांनी व मांडलिक राज्ये मिळून भारतीय संघराज्याची कल्पना मांडली.
- भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली.
- दुहेरी राज्यव्यवस्था स्थापन करण्यात आली.
- भारतात संघराज्य न्यायालय स्थापन करण्यात आले.
या कायद्यातील संघराज्य कल्पना आणि प्रशासकीय रचना यासारख्या अनेक तरतुदी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केल्या गेल्या आहेत.म्हणून 1935 चा भारत सरकारचा कायदा म्हणजे भारतीय संविधानाचा मूळ पाया होय’ असे म्हटले जाते.
16. 1919 च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी कोणत्या?
उत्तर – 1919 च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी -:
- कनिष्ठ सभागृह आणि वरिष्ठ सभागृह या दोन ग्रहांचे सरकार स्थापन करण्याची पद्धत सुरू झाली.
- प्रांतीय सरकारांमध्ये केंद्राप्रमाणेच दोन गृही निर्माण करण्यात आली.
- भारतासाठी एका उच्चायुक्ताची नियुक्ती करण्यात आली.
- स्थानिक स्वराज्य संस्था सुधारण्याची आम्ही देण्यात आली. केंद्रीय अर्थसंकल्पापासून प्रांतीय अर्थसंकल्प वेगळा करण्यात आला.
- मुस्लिम, शीख,अँग्लो-इंडियन आणि युरोपियन लोकांसाठी ‘स्वतंत्र मतदार संघ’ सुरू करण्यात आला.