SSLC SS 2: THE EXTENSION OF THE BRITISH RULE

2.ब्रिटिश राजवटीचा विस्तार

1. खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा :

  1. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाच्या शेवटी ब्रिटिश व मराठ्यांमध्ये सालबाईचा करार हा करार झाला.
  2. ‘सहाय्यक सैन्य पद्धती’ यांने लॉर्ड वेलस्ली अंमलात आणली.
  3. पंजाब संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीनीकरण करणारा ब्रिटिश जनरल लॉर्ड डलहौसी होते.
  4. खालसा धोरण (दत्तक वारसा नामंजूर) लॉर्ड डलहौसी यांने अवलंबिले.

II. समूहात चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

5. पहिल्या अँग्लो- मराठा युद्धाची कारणे द्या.

उत्तर – पहिले अँग्लो-मराठा युद्ध (1775-1782) अनेक कारणांमुळे सुरू झाले. बक्सारच्या लढाईनंतर मुघल सम्राट शाह आलम-दुसरा ब्रिटिशांच्या ताब्यात होता.त्याने कारा आणि अलाहाबाद मराठ्यांना दिले.जे पूर्वी इंग्रजांना दिले होते.त्यामुळे मराठे आणि इंग्रजांमध्ये वैर निर्माण झाले.मराठा नेते माधवराव पेशवे यांचा मृत्यू आणि त्यानंतर मराठ्यांमधील अंतर्गत संघर्षांमुळे त्यांची स्थिती आणखी कमकुवत झाली. इंग्रजांनी या अंतर्गत कलहाचा गैरफायदा घेत राघोबाला पेशवे पदावरील दाव्याचे समर्थन केले. परिणामी सालबाई कराराने हा संघर्ष संपुष्टात आला.

6. सहाय्यक सैन्य पद्धतीमधील अटी सविस्तरपणे लिहा.

सहाय्यक सैन्य पद्धतीमधील अटी -:

1. सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणाऱ्या भारतीय राजांना ब्रिटिश सैन्य त्यांच्या राज्यात ठेवावे लागले.

2. सैन्याची देखभाल आणि सैनिकांच्या वेतनाचा खर्च संबंधित राजाने करावा किंवा जमिनीवरील ठराविक महसूल द्यावा.

3. राजाला त्याच्या दरबारात ब्रिटिशांचा वकील ठेवणे आवश्यक होते.

4. ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय राजाला इतर कोणत्याही युरोपियनांची नेमणूक करता येणार नाही.

5. राज्यकर्त्यांनी इतर राज्यांशी तसेच इतर संस्थानांशी स्वतंत्र करार करावयाचे नाहीत. त्यासाठी त्यांना गव्हर्नरची परवानगी घेणे बंधनकारक होते.

6. वरील सर्व सेवांच्या बदल्यात त्या राजाला ईस्ट इंडिया कंपनी कडून अंतर्गत किंवा बाह्य आक्रमणापासून संपूर्ण संरक्षण मिळेल.

7. तिसऱ्या अँग्लो- मराठा युद्धाचे वर्णन करा.

उत्तर – तिसरे अँग्लो-मराठा युद्ध (1817-1818) मराठा घराण्यांनी आपले स्वातंत्र्य आणि सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे झाले.पेशव्यांनी पुणे येथील ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला करून ते जाळले. नागपूरचे आप्पासाहेब,मल्हारराव होळकर या मराठा नेत्यांनीही इंग्रजांविरुद्ध बंड केले पण ते पराभूत झाले. दुसरा बाजीराव पेशवाने कोरेगाव आणि आष्टी येथे इंग्रजांशी लढा दिला पण शेवटी शरण गेला. इंग्रजांनी पेशवे पद रद्द केले, बाजीरावला पेन्शन दिली आणि प्रताप सिंह यांना साताऱ्याच्या गादीवर बसवले. त्यामुळे मराठ्यांचा विरोध संपुष्टात आला.

8. खालसा धोरण (दत्तक वारसा नामंजूर) भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या विस्ताराला कसे पूरक ठरले?

उत्तर – लॉर्ड डलहौसीने अंमलात आणलेल्या खालसा धोरणाने (दत्तक वारसा नामंजूर) ने दत्तक घेतलेल्या राजांच्या मुलांना वारसा हक्क नाकारण्यात आला.या धोरणानुसार,जर एखाद्या निपुत्रिक राजाचा मृत्यू झाला तर त्याच्या दत्तक पुत्रांना गादीवर बसण्याचा कायदेशीर हक्क नव्हता आणि त्याचे राज्य ब्रिटीश साम्राज्यामध्ये आपोआप विलीन केले जात असे.या धोरणामुळे ब्रिटीशांना अनेक संस्थाने खालसा केली व आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.

9. खालसा धोरणांतर्गत कोणकोणती संस्थाने विलीन झाली ?

उत्तर – खालसा धोरणांतर्गत सातारा, नागपूर, संबळपूर, उदयपूर, झाशी, जयपूर यासारखी अनेक संस्थाने विलीन झाली.

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now