इयत्ता – दहावी
कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
विषय – समाज विज्ञान
स्वाध्याय
11.भारताचे हवामान
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा :
1) भारतातील राजस्थानमधील गंगानगर हा अति जास्त उष्णता असलेला प्रदेश आहे.
2) भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो.
3) भारतात अत्यंत कमी पाऊस पडणारा प्रदेश राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील ‘रोयली’.
4) भारतातील जास्त पाऊस पडणारा प्रदेश मेघालयातील ‘मौसीनराम’
II. खालील प्रश्नांची उत्तरे समूहात चर्चा करून लिहा :
5) भारतात कोणकोणत्या प्रकारचे हवामान आहे ?
उत्तर – भारतात उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे.
6) मान्सूनचे वारे म्हणजे काय ?
उत्तर – मान्सून वारा म्हणजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये विरुद्ध दिशेने वाहणारे मोसमी वारे.ते या प्रदेशात मुसळधार पाऊस आणतात.
7) परतीच्या मान्सून काळात भारतात चक्रीवादळे निर्माण होण्याची कारणे कोणती ?
उत्तर – परतीच्या मान्सून काळात भारतात जमीन आणि समुद्र यांच्यातील तापमान आणि दाबाच्या फरकामुळे चक्रीवादळ तयार होतात.सूर्याची किरणे दक्षिण गोलार्धात उभी पडत असल्याने, उत्तर गोलार्धातील तापमान कमी होऊन उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते.यामुळे दक्षिण-पश्चिम मोसमी वारे कमी होतात.विशेषत: बंगालच्या उपसागरात जमीन आणि समुद्र यांच्यातील तापमान आणि दाबातील फरकांमुळे अनेकदा उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण होतात. या चक्रीवादळांमुळे विशेषत: किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
8) भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते ?
उत्तर – भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अक्षांश, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचे अंतर, वाऱ्याची दिशा, पर्वतरांगा आणि सागरी प्रवाह यांचा समावेश होतो.
III. जोड्या जुळवा :
उत्तर – A B
i) काल बैसाखी इ) पश्चिम बंगाल
ii) आंधिस अ) उत्तर प्रदेश
iii) कॉपी करंजा ब) कर्नाटक
iv) मँगो शॉवर्स क) केरळ
सरावासाठी अधिक माहिती
1. मान्सून हा शब्द ‘मौसम’ या अरबी शब्दापासून आला आहे.
2. भारतीय हवामान चार ऋतूंमध्ये विभागलेले आहे.
3. उन्हाळी हंगाम मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो.
4. राजस्थानच्या गंगानगरमध्ये उन्हाळ्यात कमाल 52°C तापमान नोंदवले जाते.
5. भारतात उन्हाळ्यात वार्षिक पाऊस फक्त 10% पडतो.
6. नैऋत्य मोसमी वारे खूप दमट असतात आणि देशाच्या बहुतांश भागात पाऊस पडतो.
7. बंगालच्या उपसागरातील मान्सून वाऱ्यांमुळे म्यानमार, बांगलादेश आणि ईशान्य भारतीय भागात पाऊस पडतो.
8. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील प्रदेशांना पर्जन्यछायेचे प्रदेश म्हणतात.
9. ऑक्टोबरच्या अखेरीस, नैऋत्य-पश्चिम मोसमी वारे कमी होऊ लागतात.
10. हिवाळ्याच्या हंगामात, काही ठिकाणी तापमान शून्याच्या खाली जाते.
11. भारतात हिवाळ्याच्या हंगामात वार्षिक पावसाच्या फक्त 2% पाऊस पडतो.
12. राजस्थानच्या थारच्या वाळवंटात सर्वात कमी वार्षिक 8.3 सेमी पाऊस पडतो.
13.भारतीय शेती मान्सूनच्या पावसावर जास्त अवलंबून आहे. पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी पुरेसा मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा आहे. तथापि मान्सूनची परिवर्तनशीलता आणि अनिश्चितता यामुळे दुष्काळ किंवा पूर येऊ शकतो, ज्यामुळे कृषी उत्पादनावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. म्हणून भारतातील कृषी व्यवसाय हा मान्सूनचा जुगार असे संबोधले जाते.