9वी व 10वी वार्षिक मूल्यमापन प्रक्रिया वेळापत्रक 2024-25
EVALUATION 2024-25
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये, कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या 1 ली ते 10 वी वर्गासाठी 2024-25 या वर्षाच्या शैक्षणिक कृतींसाठी वार्षिक कृती आराखडा आणि शैक्षणिक मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.त्या आधारे शाळांमधील अभ्यासक्रमाचे अध्यापन आणि मूल्यमापन याबाबत आवश्यक उपक्रम कृती योजनांची कार्यवाही खालील सूचनांनुसार करण्यात यावी.
1. राज्यातील सरकारी,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 29-05-2024 पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये, ‘ अध्ययन पुनर्प्राप्ती’ उपक्रम आणि 2023-24 मध्ये ‘ कलिका बलवर्धने’ कार्यक्रमांतर्गत, अध्ययन निष्पत्तीवर आधारित विद्यार्थी कृतीपुस्तके आणि शिक्षक हस्तपुस्तिका तयार करून अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत अवलंब केले जात आहेत.याशिवाय, विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी तयार करण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जून महिन्यात ‘सेतुबंध’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.इयत्ता 1 ते 10 पर्यंतचे सेतुबंध साहित्य DSERT वेबसाइटवर अपलोड केले आहे.कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सेतुबंध परिपत्रकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
2. शालेय दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी 2024-25 मध्ये पाठ्यपुस्तके भाग-1 आणि भाग-2 म्हणून स्वतंत्रपणे छापण्यात आली आहेत.भाग-1 मध्ये 50% आणि भाग-2 मध्ये 50% एकूण 100% अभ्यासक्रम मूल्यमापनासाठी देण्यात आला आहे.
3. संदर्भ परिपत्रक आणि 2024-25 या वर्षातील शैक्षणिक मार्गदर्शीकेच्या आधारे,वार्षिक पाठ नियोजन केले जावे, अध्ययन सुलभ केले जावे,आकारिक आणि संकलित मूल्यमापन केले जावे आणि मुलांच्या अध्ययन प्रगतीची नोंद केली जावी. या संदर्भात,मुलांच्या शिक्षणाला सहकार्य होण्यासाठी शिक्षकांनी आवश्यक तयारीने वार्षिक कृती आराखडा तयार करावा.
4. 2024-2025 या शैक्षणिक वर्षात,सेतुबंध कार्यक्रम,आकारिक आणि संकलित मूल्यमापन संबंधी माहिती देण्यात आली आहे.त्यानुसार शाळा स्तरावर विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
विवरण | गुण | कृती कालावधी |
सेतुबंध शिक्षण: ➤ विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ‘इंद्रधनुष्य’ साहित्यातील उपक्रम राबवणे. हे साहित्य डीएसईआरटी वेबसाइटवर उपलब्ध आहे. ➤ संबंधित वर्गातील अध्ययन निष्पत्ती आणि विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या मागील वर्गाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित उपक्रम राबवणे. ➤ इयत्ता पहिलीसाठी 30 दिवसांचे विद्याप्रवेश,दुसरी आणि तिसरीच्या वर्गासाठी 30 दिवस (कली-नली)- सेतुबंध आणि इयत्ता चौथी ते दहावीसाठी जून महिन्याच्या सुरुवातीचे 15 दिवस सेतुबंध कार्यक्रम आयोजीत करणे.साफल्य परीक्षेच्या निकालावर आधारित शैक्षणिक क्रिया योजना(SAP) तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याने अध्ययन निष्पत्ती प्राप्त करण्यास योग्य कार्यवाही करणे. ➤ DSERT वेबसाइटवर उपलब्ध सेतुबंध साहित्य वापरणे. ➤ सेतुबंध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत शासनाकडून स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात आले आहे. | — | जून 2024 |
विवरण | गुण | कृती कालावधी |
आकारिक मूल्यमापन -1 (FA-1): ➤ इयत्ता 9वी व 10वी च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-1 चा 25% विषयनिहाय पाठ्यक्रम FA-1 साठी विचारात घ्यावा. (दि.:15.06.2024 ते 15.07.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ (2 Activity [15 + 15 गुण ] ) + ( 1 लेखी परीक्षा {20 गुण } ) एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे. | 50 | 18.07.2024 ते 20.07.2024 पर्यंत संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत मूल्यमापन कार्य पार पाडणे. |
विवरण | गुण | कृती कालावधी |
आकारिक मूल्यमापन -2 (FA-2): ➤ इयत्ता 9वी व 10वी च्या FA-1 नंतरचा पाठ्यपुस्तक भाग-1 चा 25% विषयनिहाय पाठ्यक्रम FA-2 साठी विचारात घ्यावा. ( दि.:21.07.2024 ते 04.09.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ (2 Activity [15 + 15 गुण ] ) + ( 1 लेखी परीक्षा {20 गुण } ) एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे. | 10 | 09.09.2024 ते 11.09.2024 पर्यंत संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत मूल्यमापन करणे. |
विवरण | गुण | कृती कालावधी |
संकलित मूल्यमापन -1 (SA-1): ➤ संबंधित वर्ग आणि विषयासाठी विहित केलेल्या पाठ्यपुस्तकातील भाग-1 मधील संपूर्ण पाठ्यक्रम विचारात घेणे. (दि. 15.06.2024 ते 25.09.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ इयत्ता 10 वी साठी दि. 15.06.2024 ते 25.09.2024 कालावधीतील पाठ्यक्रमावर आधारित अर्धवार्षिक परीक्षा. ➤प्रथम भाषा 100 गुण,द्वितीय भाषा ,तृतीय भाषा आणि मुख्य विषय 80 गुणांची परीक्षा म्हणजेच 100 + 80 + 80 + 80 + 80 + 80 = 500 गुणांची लेखी परीक्षा घेणे. ➤ अंतर्गत मूल्यमापन – 9वी व 10वी वर्गांसाठी घेण्यात आलेले 50 गुणांचे FA 1,FA2 परीक्षेचे एकूण 100 गुणांचे प्रथम भाषा 25 गुण तसेच इतर विषय 20 गुणांचे म्हणजे 25+20+20+20+20+20 = 125 गुणात रुपांतर करून अंतर्गत मूल्यमापन करणे. | 625 | 25.09.2024 ते 30.09.2024 पर्यंत दि. 30.10.2024 रोजी माध्यमिक शाळा समुदाय दत्त शाळा कार्यक्रमात विद्यार्थी कृती संचयीका च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती पालकांच्या निदर्शनास आणणे. |
विवरण | गुण | कृती कालावधी |
आकारिक मूल्यमापन -3 (FA-3): ➤ इयत्ता 9वी व 10वी च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-2 चा 40% विषयनिहाय पाठ्यक्रम FA-2 साठी विचारात घ्यावा. (दि.: 01.11.2024 ते 25.12.2024 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ (2 Activity [15 + 15 गुण ] ) + ( 1 लेखी परीक्षा {20 गुण } ) एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे. | 50 | 26.12.2024 ते 28.12.2024 पर्यंत संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत मूल्यमापन करणे. |
विवरण | गुण | कृती कालावधी |
आकारिक मूल्यमापन -4 (FA-4): ➤ इयत्ता 9वी व 10वी च्या पाठ्यपुस्तकाच्या भाग-2 चा 10% विषयनिहाय पाठ्यक्रम FA-4 साठी विचारात घ्यावा. (दि.: 29.12.2024 ते 31.01.2025 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ (2 Activity [15 + 15 गुण ] ) + ( 1 लेखी परीक्षा {20 गुण } ) एकूण 50 गुणांमध्ये रुपांतर करणे. | 50 | 04.02.2025 ते 06.02.2025 पर्यंत संबंधित विषयाच्या अध्यापन कालावधीत मूल्यमापन करणे. |
विवरण | गुण | कृती कालावधी |
इयत्ता 9वी पूर्व सिद्धता परीक्षा – ➤ प्रथम भाषा 100 लेखी + 25 अंतर्गत = 125 गुणांची लेखी परीक्षा घेणे. ➤ द्वितीय भाषा व तृतीय भाषा तसेच मुख्य विषयांची 80 लेखी + 20 अंतर्गत = 100 गुणांची लेखी परीक्षा घेणे. (दि. 01.11.2024 ते 28.03.2025 कालावधीतील पाठ्यक्रम) ➤ सूचना – फक्त अभ्यासासाठी | 625 | 18.02.2025 ते 25.02.2025 पर्यंत |
To be continued…………
CLICK HERE TO DOWNLOAD CIRCULAR