विषय: LKG, UKG आणि इयत्ता 1 साठी मुलांच्या शाळा प्रवेश नोंदणीसाठी पात्र असलेल्या कमाल वयोगटात सुधारणा करण्याबाबत.
प्रस्ताव:
शिक्षण हक्क कायदा-2009 आणि सक्तीचे शिक्षण नियम, 2012 नुसार शासकीय आदेश क्रमांक (1) मध्ये,1 जून रोजी 06 वर्षे पूर्ण केलेल्या मुलाला पहिलीच्या वर्गात दाखल करण्याची वयोमर्यादा निर्धारीत केलेली आहे.
दिनांक: 26.07.2022 रोजीच्या आदेशात सुधारणा करून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी 1 जून रोजी 06 वर्षे पूर्ण असणे अनिवार्य असून शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून ही वयोमर्यादा लागू असेल असा आदेश देण्यात आला आहे.
आयुक्त, शालेय शिक्षण विभाग, बंगलोर यांच्या 01.04.2024 रोजीच्या आदेशात LKG, UKG आणि इयत्ता 01 ली च्या प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा आधीच निश्चित केली आहे.परंतु कमाल वयोमर्यादा सुधारित केलेली नाही.सुधारित कमाल वयोमर्यादा केल्यामुळे (शाळाबाह्य) Drop Out मुलांच्या संख्येवरही परिणाम होऊ शकतो या वस्तुस्थितीमुळे,जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करणे आणि सुधारणे आवश्यक आहे कारण मुलांच्या नोंदणीसाठी सुधारित किमान वयोमर्यादा आधीच निश्चित करण्यात आली आहे.पण LKG,UKG आणि 01ली साठी सुधारित कमाल वयोमर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे.खालीलप्रमाणे सुधारित वयोमर्यादा निश्चित करण्याची विनंती केली जात आहे.
इयत्ता | LKG | UKG | 1st |
प्रस्तुत असलेला आदेश (SATS) | किमान 4 वर्षे ते 5 वर्षे | किमान 4 वर्षे ते 5 वर्षे | किमान 4 वर्षे ते 5 वर्षे |
लागू होणारे वर्ष | 2023-24 | 2024-25 | 2025-26 |
किमान वयोमर्यादा | 4 वर्षे | 5 वर्षे | 6 वर्षे |
लागू होणारे वर्ष | 2023-24 | 2024-25 | 2025-26 |
कमाल वयोमर्यादा | 6 वर्षे | 7 वर्षे | 8 वर्षे |
लागू होणारे वर्ष | 2023-24 | 2023-24 | 2023-24 |
वरील प्रस्तावाचा सर्व बाजूंनी विचार करून पुढीलप्रमाणे आदेश दिला आहे.
सरकारी आदेश संख्या: EP 100 PGC 2024
बंगळुरू, दिनांक: 26 जून 2024.
प्रस्तावात नमूद केलेल्या बाबी लक्षात घेता,2023-24 या वर्षापासून LKG, UKG आणि इयत्ता 01 च्या प्रवेशासाठी खालील प्रमाणे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्याचा आदेश दिला आहे.