7th SS Textbook Solution Lesson 9.INTRODUCTION TO LEGISLATIVE, EXECUTIVE AND JUDICIAL TERMINOLOGIES शासकांग, कार्यांग आणि न्यायांग शब्दावलीचा परिचय

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान

नागरिक शास्त्र

पाठ 9

INTRODUCTION TO LEGISLATIVE, EXECUTIVE AND JUDICIAL TERMINOLOGIES

I. एका वाक्यात उत्तरे द्या.

1. विधिमंडळाचा (शासकांग) मूळ शब्द काय आहे ?

उत्तर – विधानमंडळ किंवा संसद हा शब्द फ्रेंच शब्द पार्लर आणि लॅटिन शब्द पार्लमेंटम् या शब्दापासून बनला आहे.

2. कायदेमंडळ म्हणजे काय ?

उत्तर – कायदेमंडळ हे आपल्या कायद्यांद्वारे नागरिकांची इच्छा व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे.

3. एक सदनी विधीमंडळ म्हणजे काय?

उत्तर – ज्या विधिमंडळात फक्त एकच सभागृह असते त्याला एक सदनी विधीमंडळ असे म्हणतात.

4. द्विसदनी विधीमंडळ म्हणजे काय?

उत्तर – ज्या विधिमंडळात दोन सभागृह असतात त्याला द्विसदनी विधिमंडळ असे म्हणतात.

I. रिकाम्या जागा भरा.

1. कायद्याची अंमलबजावणी करणारे अंग कार्यांग हे आहे.

2. सर्व आधुनिक राज्यांमध्ये कल्याणकारी राज्य स्थापनेचे ध्येय आहे.

II. एका वाक्यात उत्तरे द्याः

1. कार्यांग हा शब्द कोणत्या मूळ शब्दापासून आला आहे ?

उत्तर – कार्यांग हा शब्द मध्ययुगीन लॅटिन भाषेतील एक्सिक्यू या मूळ शब्दापासून आला आहे.

2. प्रशासकीय अवयव कोणाला म्हणतात ?

उत्तर – कार्यांगाला प्रशासकीय अवयव असे म्हणतात.

3. कार्यांगाचा खरा प्रमुख कोण आहे ?

उत्तर – पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे कार्यांगाचे खरे प्रमुख असतात.

4. थेट निवडणूक पद्धत काय आहे?

उत्तर – जेथे कार्यांगाचा प्रमुख थेट नागरिकांकडून निवडला जातो त्याला थेट निवडणूक पद्धत असे म्हणतात.

III. पुढील प्रश्नांची उत्तरे द्याः
1. कार्यांगाचा अर्थ सांगा.
उत्तर – कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे कार्यांग होय.ते राष्ट्राचा एकूण कारभार सांभाळणारे प्रशासकीय अवयव आहे.
2. कार्यांगाचे कोणतेहीं दोन महत्व सांगा.
उत्तर – कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कार्यांग जबाबदार असते.विधिमंडळाने कितीही चांगले कायदे केले तरी त्यांची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यांगाची असते.
आंतरराष्ट्रीय संबंध वाढवणे करार पूर्ण करणे यासाठी कार्यांग मंडळाची महत्त्वाची भूमिका असते.
3. कार्यकारिणीने केलेली चार कार्ये लिहा.
1.कार्यकारिणी कायदेमंडळाने केलेले कायदे अंमलात आणते.
2.सरकारची यंत्रणा म्हणून काम करते.
3.कल्याणकारी राज्याचे साधन म्हणून काम करते.
4.करार पूर्ण करणे आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करून आंतरराष्ट्रीय संबंध वाढवते.

I. रिकाम्या जागा भरा.
1. न्यायांग याचा मूळ शब्द जस्टिशीया
2. हक्कांच्या रक्षकाला न्यायांग असे म्हणतात.
3. आपण घटनेच्या अधिपत्याखाली आहोत,तर संविधान हे न्यायाधीशांनी सांगीतले आहे का? असे न्यायमूर्ती ह्युग्ज यांनी सांगितले.
4. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे आहेत.

II. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
1. न्यायांगाचे दोन महत्व सांगा.
➤कायद्याचे संरक्षण
➤नागरिकांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे.
➤लोकांचे जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे.
➤कायद्याची अंमलबजावणी करणे आणि त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करणे.

2. न्यायांगाची कोणतीही दोन कार्ये सांगा.
➤लागू असलेल्या कायद्यानुसार न्यायनिवाडा करणे हे न्यायांगाचे मुख्य कार्य आहे.
➤आवश्यकतेनुसार अस्पष्ट आणि अतिशय संक्षिप्त कायद्यांचा अर्थ लावणे.
➤कठीण प्रसंगी न्यायव्यवस्था सरकारला सल्ला देणे.
➤लागू केलेल्या कायद्याची वैधता आणि अवैधता घोषित करणे.













Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *