Class 6 Bridge Course Marathi Pre-Test Model Question Paper 6वी मराठी पूर्व परीक्षा

  • Bridge Course
  • सेतूबंध
  • Sub. – Marathi
  • Competencies
  • Model Question Papers
  • Pre Test (पूर्व परीक्षा)
  • Post Test
a group of colored pencils on a yellow background

सेतुबंध पूर्व परीक्षा/ साफल्य परीक्षेसाठी नमुना प्रश्न
इयत्ता – सहावी
विषय – मराठी

1) तुम्ही वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कोणत्याही एका गोष्टीचे नाव सांगा.

2) तुम्ही उन्हाळी सुट्टी कशी घालवली ते सांगा

3.भाषेतील सूक्ष्म अंश जाणून घेऊन हे वाक्य बरोबर कर

रामाला घरात गेला.

4. हा अभिनय करून दाखव

ज्याच्या घरी मुले आहेत तो गरीब नाही

5. वडिलांना पत्र लिहिताना कोणते संबोधन वापरतो?

6. झेब्रा क्रॉसिंग काय सुचविते

  1.सत्कार       2.सावकार      3.डॉक्टर      4.कर्तव्य

8.हे वृत्तपत्र वाच (शिक्षक वृत्तपत्रातील वाचन घेतात)

9.तुम्ही तुमच्या गावामध्ये पाहिलेल्या सरकारी इमारतींची यादी करा

10. पाणी अमूल्य स्त्रोत आहे स्पष्ट करा

11. या वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा बैल बैलगाडी ओढतात.

12. देवालय ही कोणती संधी आहे?

13. या वाक्यातील दीक् वाचक शब्द कोणता?

सूर्य पूर्वेला उगवतो

14. योग्य विरामचिन्हांचा वापर करून लिहा

ब्रिटिशांनी चालते व्हा भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला

15. न्याय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा

16. सदाहरित या शब्दाचा वाक्यात उपयोग करा.

17. स्वातंत्र्य दिन कसा साजरा करतात चार ओळी लिहा

18. तालबद्ध शब्द लिहा. खेळ

19. वयस्कर लोकांना रस्ता ओलांडण्यास मदत करणे, चूक की बरोबर लिहा

20. खालील उतारा वाचून उत्तरे लिहा

एक होता उंदीर मामा रस्त्याने जाताना त्याला एक फडके मिळाले. ते फडके घेऊन तो एका धोब्याकडे गेला व त्याला म्हणाला “धोबी दादा मला हे फडके धुवून द्या “धोबी दादा ने फडके धुवून दिलं. ते घेऊन तो शिंप्याकडे गेला व म्हणाला “शिंपी दादा शिंपी दादा मला एक टोपी शिवून द्या व त्याला तुरा लावून द्या “शिंपीदादाने त्याला टोपी शिवून दिली.

1) या गोष्टीत कोणत्या प्राण्याचे नाव आले आहे ?

2) दोन या गोष्टीतील व्यावसायिकांची नावे लिहा?

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 281

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *