मार्च/एप्रिल 2024 मध्ये झालेल्या SSLC परीक्षा-1 च्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी,उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत किंवा पुन्हा पेपर तपासणी यासाठी अर्ज प्रक्रिया…
Applications for SSLC ANSWER SHEET SCAN COPY,RETOTALING & REVALUATION.
- State – Karnataka
- Board – KSEAB Bengaluru
- Exam -SSLC exam- 1
- Year – 2023-24
- Result – Declared
मार्च/एप्रिल 2024 मध्ये झालेल्या SSLC परीक्षा-1 चा निकाल 09.05.2024 रोजी सकाळी 10.30 वाजता घोषित करण्यात आला आहे. परीक्षा बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व विद्यार्थ्यांचे निकाल अपलोड करण्यात आले असून विद्यार्थी आपला रजिस्टर नंबर आणि जन्मतारीख टाईप करुन आपला निकाल घरबसल्या ऑनलाईन तपासू शकतात.तसेच 09.05.2024 रोजी 1.00 वाजेपर्यंत शाळेच्या लॉगिन मध्ये सर्व निकाल उपलब्ध होतील.संबंधित शाळांचे मुख्याध्यापक तो निकाल जाहीर करतील.
सर्व विद्यार्थ्यांनी निकाल तपासल्यानंतर जर आपल्या निकालाबाबत काही शंका असतील.तर ते आपल्या निकालाबाबत किंवा आपल्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पुन्हा मोजणी,उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत किंवा पुन्हा पेपर तपासणी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना मार्च/एप्रिल 2024 SSLC परीक्षा-1 च्या मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत (Scan Copy)/ गुणपडताळणी (Retataling) आणि पुनर्मूल्यांकनासाठी Revaluation) अर्ज करायचा आहे ते ऑनलाइन अर्ज करू शकतात.
उत्तरपत्रिकांची स्कॅन प्रत/ गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे…
अर्ज | कालावधी |
उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी अर्ज करण्याची निर्धारित अवधी | 09.05.2024 ते 16.05.2024 |
अर्जाची फी कशी भरावी? ज्यांच्याकडे डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ऑनलाइन बँकिंग सुविधा नाही त्यांनी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी अर्ज केल्यानंतर ऑफलाइन चलन डाऊनलोड करून अर्जाची फी बँकेत भरण्याचा अवधी | 09.05.2024 ते 17.05.2024 |
अर्ज | कालावधी |
उत्तरपत्रिका गुणपडताळणी आणि पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीसाठी अर्ज करण्याचा निर्धारित अवधी: | 13.05.2024 ते 22.05.2024 |
अर्जाची फी कशी भरावी? ज्यांच्याकडे डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ऑनलाइन बँकिंग सुविधा नाही त्यांनी उत्तरपत्रिकातील गुणांची पुन्हा मोजणी आणि पुन्हा उत्तरपत्रिकासाठी अर्ज केल्यानंतर ऑफलाइन चलन डाऊनलोड करून अर्जाची फी बँकेत भरण्याची अंतिम तारीख : | 23.05.2024 |
सूचना –
विद्यार्थी थेट उत्तरपत्रिका गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकत नाहीत. जर विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकातील गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाचा असेल तर त्यापूर्वी त्यांनी उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतीसाठी अर्ज करावा. व स्कॅन प्रति मध्ये गुणांची मोजणी करून त्यामध्ये तफावत असल्यास ते उत्तरपत्रिकेतील गुणांच्या पुन्हा मोजणीसाठी अर्ज करू शकतात.
उत्तरपत्रिकेतील गुणांच्या पुन्हा मोजणीसाठी फक्त ऑनलाईन अर्ज करावा.
उत्तरपत्रिकेतील गुणपडताळणी विनामूल्य आहे आणि त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही.फेरमोजणीमध्ये गुणांच्या गणनेत काही तफावत आढळल्यास सुधारित निकालाची यादी संबंधित शाळा व विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे पाठविली जाईल.
पुनर्मूल्यांकनासाठी स्कॅन कॉपीसाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
गुणपडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन सेवेची मागणी करताना स्कॅन कॉपीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
स्कॅन कॉपी आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा बोर्डाची अधिकृत वेबसाइट :- https://kseab.karnataka.gov.in वर उपलब्ध आहे.
अर्जाची फी डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ऑनलाइन बँकिंगद्वारे ऑनलाइन भरू शकतात.ज्यांच्याकडे डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/ऑनलाइन बँकिंग सुविधा नाही ते ऑनलाइन अर्ज केल्यानंतर चलन डाउनलोड करू शकतात आणि युनियन बँक ऑफ इंडिया/बंगलोर-वन/कर्नाटक-वन केंद्रावर शुल्क भरू शकतात.
वरीलप्रमाणे स्कॅन कॉपी / पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर, अर्ज स्वीकृत झाल्याची माहिती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर sms द्वारे पाठवली जाईल.
ज्या उमेदवारांनी वर नमूद केल्याप्रमाणे सर्व विषयांची किंवा इच्छित विषयाची स्कॅन कॉपी प्राप्त केली आहे ते उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी विनामूल्य अर्ज करण्यास पात्र आहेत.
निर्धारित तारखेपूर्वी अर्ज केल्यानंतर अर्ज करताना सर्व वर्षांची फी खालील प्रमाणे असेल.
अर्ज व अर्जाची फी.
पद्धत | स्कॅन कॉपी एका विषयास | पुनर्मूल्यांकन |
ऑनलाईन | ₹ 410 + 10 (सेवा शुल्क) | ₹ 800 + 10 (सेवा शुल्क) |
ऑफलाईन बंगलोर-वन/कर्नाटक-वन | ₹ 400 + 20 (सेवा शुल्क) | ₹ 800 + 20 (सेवा शुल्क) |
ऑफलाईन युनियन बँक ऑफ इंडिया | ₹ 400 + 10 (सेवा शुल्क) | ₹ 800 + 10 (सेवा शुल्क) |
स्कॅन कॉपीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून बोर्डाच्या वेबसाइटवर अपलोड केल्या जातील.अपलोड केलेल्या उत्तरपत्रिकांची माहिती विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवली जाईल.ही माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात.