10TH SS 23. COLLECTIVE BEHAVIOUR AND PROTESTS 23. सामुहिक वर्तन आणि प्रतिरोध

STATE SYLLABUS

PART – 2

सामुहिक वर्तन आणि प्रतिरोध

I. रिकाम्या जागी योग्य शब्द भराः

1. चिपको आंदोलन उत्तराखंड या राज्यात सुरु झाले.

2. नर्मदा आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर यानी केले.

3. डॉ. शिवराम कारंत यानी कैगा येथे अणुशक्ती केंद्र उभारण्यास विरोध केला.

II. खालील प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे द्याः

4. सामूहिक वर्तन म्हणजे काय

उत्तर:  मनुष्य जेंव्हा समूहाचा सदस्य अ सदस्य असतो. यावेळी त्याचे वर्तन व तो जेंव्हा एकटा असतो त्यावेळच्या वर्तनापेक्षा एकदम भिन्न असणे या प्रकारच्या वागण्याला सामूहिक वर्तन असे म्हणतात.

किंवा

असंख्य किंवा असंघटित लोकांचे विचार, भावना आणि वर्तन अपघाताने किंवा अचानक एकत्र येणे त्यालाही सामुहिक वर्तन म्हणतात.

5. चिपको चळवळीचे नेते कोण

उत्तर: चिपको चळवळीचे नेते सुंदरलाल बहुगुणा होते.

6. महिला स्व-सहाय्य संघटना म्हणजे काय

उत्तर: महिलांनी एकत्र येऊन परस्पर सहाय्याने आर्थिक आणि सामाजिक सबलीकारणासाठी आणि महिलांना समान हक्क,संधी व अधिकार मिळवून देणारी संघटना म्हणजे महिला स्व-सहाय्य संघटना होय.

7. कामगार चळवळ म्हणजे काय

उत्तर: कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि कामगारांच्या हिताचे रक्षण करणे यासाठी कामगारांकडून चालवलेली चळवळ म्हणजे कामगार चळवळ होय.

III. समूहामध्ये चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे:

8. सामूहिक वर्तनामध्ये काय समाविष्ट असते

उत्तर: सामूहिक वर्तनामध्ये जमाव, सामाजिक चळवळी, क्रांती, आणि सार्वजनिक मत यांचा समावेश होतो. लोक एकत्र येऊन विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र कृती करतात.

9. जमाव म्हणजे काय? उदाहरण द्या. 

उत्तर: जमाव म्हणजे कोणतेही नियोजन न करता तात्पुरत्या काळासाठी लोक एकत्र येणे.

  उदा.: अपघातस्थळी जमलेली लोकांची गर्दी.

10. जमावाच्या स्वरूपाचे वर्णन करा. 

उत्तर: जमाव अनियंत्रित आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. यात लोकांच्या परस्पर भावना, क्रिया आणि निर्णयांचा एकमेकांवर प्रभाव पडतो. काही वेळा हा जमाव हिंसक होऊ शकतो.

11. पर्यावरण प्रदूषणाचे अर्थ आणि स्वरूप स्पष्ट करा. 

उत्तर:  पर्यावरण प्रदूषण म्हणजे माती, पाणी, हवा यासारख्या नैसर्गिक घटकांमध्ये विषारी रसायनांचा प्रवेश होणे.याचा परिणाम पर्यावरणातील प्राणी, वनस्पती आणि मानवी आरोग्यावर होतो.

12. महिला स्व-सहाय्य संघाचे महत्व स्पष्ट करा. 

उत्तर:  महिला स्व-सहाय्य संघाने महिलांना आर्थिक, सामाजिक, आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून सशक्त केले आहे. यामुळे महिलांना स्वावलंबनाचे मार्ग उपलब्ध झाले आहेत.तसेच महिलांना समान हक्क,संधी व अधिकार मिळवून देण्यात महिला स्व-सहाय्य संघ महत्वाची भूमिका निभावतात.

1. प्रश्न: जमाव म्हणजे काय

 उत्तर: कोणतेही पूर्व नियोजन नसताना एकत्र आलेल्या लोकांच्या समूहाला जमाव म्हणतात. 

2. प्रश्न: दंगल म्हणजे काय

उत्तर: हिंसक आणि विध्वंसक स्वरूपाच्या सामूहिक वर्तनाला दंगल म्हणतात. 

3. प्रश्न: चिपको चळवळ कोठे सुरू झाली

 उत्तर: चिपको चळवळ उत्तराखंडमध्ये सुरू झाली. 

4. प्रश्न: अप्पिको चळवळ कोणत्या राज्यात झाली

उत्तर: कर्नाटकमध्ये अप्पिको चळवळ झाली. 

5. प्रश्न: नर्मदा आंदोलनाचे प्रमुख नेते कोण होते

उत्तर: मेधा पाटकर आणि बाबा आमटे. 

6. प्रश्न: सायलेंट व्हॅली आंदोलन कोठे झाले

 उत्तर: केरळमध्ये सायलेंट व्हॅली आंदोलन झाले. 

7. प्रश्न: महिलांच्या स्व-सहाय्य गटांचा उद्देश काय आहे

उत्तर: महिलांना आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणासाठी मदत करणे. 

8. प्रश्न: शेतकरी आंदोलनाचा मुख्य उद्देश काय होता

उत्तर: शेतकऱ्यांना जुलूम व अन्यायापासून मुक्त करणे. 

9. प्रश्न: MRPL विरोधातील आंदोलन कोठे झाले? 

   उत्तर: मंगळूरमध्ये MRPL विरोधातील आंदोलन झाले. 

10. प्रश्न: अस्पृश्यता विरोधी चळवळ कोणी सुरू केली

उत्तर: डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी. 

11. प्रश्न: पर्यावरणीय चळवळ कशासाठी केली जाते

 उत्तर: पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि प्रदूषणाच्या विरोधात. 

12. प्रश्न: सिरी हा उद्योग कोणत्या योजनेशी संबंधित आहे

उत्तर: धर्मस्थळ ग्रामीण विकास योजनेशी. 

13. प्रश्न: जमावात लोकांचे वर्तन कसे असते

उत्तर: जमावात लोकांचे वर्तन अनियंत्रित आणि भावनाप्रधान असते. 

14. प्रश्न: कर्नाटक रयत संघाचे नेतृत्व कोणी केले

उत्तर: डॉ. एम. डी. नंजुंडस्वामी यांनी. 

15. प्रश्न: महिला चळवळीत प्रमुख सहभाग कोणाचा होता

उत्तर: महिलांनी धर्म आणि शोषणाविरोधात सहभाग घेतला. 

Share with your best friend :)