इयत्ता – पाचवी
विषय – माय मराठी
नमुना प्रश्नोत्तरे
22.बोधाचा स्पर्श
नवीन शब्दांचे अर्थ–
अती – प्रमाणाबाहेर
भूषणे – दागिने
घोकणे – पाठ करणे
कोपणे – संतापणे, चिडणे
बोध – चांगली शिकवण
गद्य – कथा, निबंध, माहिती
इत्यादींना गद्य म्हणतात.
पद्य – काव्य, कविता, इत्यादींना
पद्य म्हणतात.
स्वाध्याय
अ. खालील
प्रश्नांची नेमकी उत्तरे लिही.
1. अती थाट कोणाचा
असतो?
उत्तर – अती थाट नटाचा असतो.
2. आपण कसे रहावे असे कवीना वाटते?
उत्तर – आपण प्रमाणामध्ये रहावे असे कवीना वाटते.
3. अतिशय संतापले तर काय होऊ शकते ?
उत्तर – अतिशय संतापले तर आपले काम होणार नाही.
4. शीण कशाने येतो ?
उत्तर – सतत कविता पाठांतर केल्याने शीण येतो.
आ. तीन ते चार वाक्यात उत्तरे
लिही.
1. कधी गद्य तर कधी
पद्य वाचत जावे असे कवीना का वाटते ?
उत्तर – कारण सतत गद्य वाचल्याने त्रास होतो आणि सतत पद्य पाठांतर
केल्याने शीण (कंटाळा) येतो.म्हणून कधी गद्य तर कधी पद्य वाचत जावे असे कवीना वाटते.
2. कोणत्या गोष्टी अति करणे हे वाईट असे कविला
सांगायचे आहे?
उत्तर – दागिने घालणे,थाट करणे,पद्य घोकणे,गद्य वाचणे,रागावणे,नम्र राहणे,अभ्यास करणे,खेळणे या गोष्टी अती करणे हे वाईट असे कवीला सांगायचे आहे.
इ. गाळलेल्या जागेत नेमके शब्द
भर.
1.
आपल्या वागण्यात सर्व काही प्रमाणामध्ये असावे.
2. स्वतःला नेहमी ……………..गुंतवून
घेण्यात शहाणपणा आहे.
3. अती दागिने धारण करणे हे संकटाला आमंत्रण
देण्यासारखे आहे.
ई. जोड्या जुळवा.
अ ब
1.
अभंग 1. कबीर
2. ओवी 2. बसवेश्वर
3. भारुड 3. ज्ञानेश्वर
4. मनाचे श्लोक 4. तुकाराम
5. भजन 5. एकनाथ
6. दोहे 6. रामदास
7. वचन 7. मीराबाई
उत्तर –
1.
अभंग 4. तुकाराम
2. ओवी 3. ज्ञानेश्वर
3. भारुड 5. एकनाथ
4. मनाचे श्लोक 6. रामदास
5. भजन 7. मीराबाई
6. दोहे 1. कबीर
7. वचन 2. बसवेश्वर