7th SS 18.KARNATAKA-ECONOMIC AND SOCIAL TRANSFORMATION कर्नाटक – आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन

   7वी समाज विज्ञान 

18.कर्नाटक – आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन




कर्नाटक राज्य पाठ्यपुस्तक मंडळ   

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

विषय – स्वाध्याय 

18.कर्नाटक – आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन

I. रिकाम्या
जागी योग्य शब्द लिहा.

1) बी.डी.
जत्ती भारताचे
 उपराष्ट्रपती होते.

2)डी.देवराज अरस हे 1974 मध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री
होते.

3)
1975 
मध्ये नेमलेल्या प्रथम मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एल.जी.हावनुर होते.

II. दोन-तीन
वाक्यात उत्तरे लिहा..


1) 
जमीन सुधारणा म्हणजे काय?

उत्तर – जमिनीच्या
वाटणीत असणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी अमलात आणलेल्या

उपायांना भूसुधारणा असे
म्हणतात.

 2) कर्नाटकातील प्रमुख भूसुधारणा कोणत्या?

उत्तर कर्नाटकात लागू करण्यात आलेल्या प्रमुख भूसुधारणां खालीलप्रमाणे
जमीनदारी
पद्धतीचे निर्मूलन

महसूल
पद्धतीत सुधारणा

शेती
वाटपाची मर्यादा

आर्थिक व
उत्पादनाची रचना

सहकार
शेतीचा विकास इत्यादी होय.

3) आर्थिक
उत्पादन म्हणजे काय
?

उत्तर – शेतकरी
कोणत्याही उत्पादनातून शेतीसाठी लागणारा खर्च वजा करून आपले कुटुंब सुखी
होण्यासाठी आवश्यक उत्पन्न मिळवू शकतो.अशा जीवनाधार उत्पादनांना आर्थिक उत्पादने
म्हणतात.

4) कर्नाटक
सरकारने शेतीच्या मालकी हक्काची जास्तीत जास्त मर्यादा का ठरविली
?

उत्तर – कारण
कर्नाटकातील महसूलदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.त्या समस्या
म्हणजे अधिक प्रमाणातील महसूल
, जमिनीच्या मालकी हक्कांचे असुरक्षितता आणि मालक नसलेले
भूमिहीन मजूर या सर्व समस्यांना दूर करण्यासाठी कर्नाटक सरकारने शेतीच्या मालकी
हक्काची जास्तीत जास्त मर्यादा ठरविली.

 5) सहकारी शेती पध्दत म्हणजे काय ?

उत्तर –
शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेने सहकार संघाची स्थापना करून आपले सर्व मालकी हक्क
संघाच्या व्यवस्थापनाकडे सोपवून सर्वांनी मिळून शेती करणे.उत्पन्न हाती आल्यानंतर
जमिनीच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक भांडवल काढून राहिलेल्या उत्पादनाचा भाग
सर्वानी
  मिळून वाटून
घेणे याला सहकार शेती पद्धती म्हणतात.


6) एल.जी.
हावनूर आयोगाने मागासवर्गातील जाती कोणत्या निकषावर ठरविल्या
?
उत्तर –
एल.जी. हावनूर यांच्या नेतृत्वाखाली प्रथम मागासवर्ग आयोगाची नेमणूक केली मागास
वर्ग ठरविण्यासाठी इ. स.
1975 मध्ये SSLC परीक्षेमध्ये विविध जातीतील
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण हे मागास वर्गातील जाती
ठरण्यासाठी एक निकष म्हणून मानण्यात आले.

) पंचायत
राज व्यवस्था महत्त्वाची का आहे
?

 उत्तर – पंचायत राज
प्रणाली महत्त्वपूर्ण आहे
.कारण ती प्रशासनाचे विकेंद्रीकरण करते,स्थानिक लोकांना निर्णय घेण्याचे आणि प्रशासनात सहभागी
होण्याचे अधिकार देते.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *