7वी समाज विज्ञान
17.कर्नाटकातील समाजाभिमुख चळवळी
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
विषय – स्वाध्याय
17.कर्नाटकातील समाजाभिमुख चळवळी
एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. ‘तुंगेचा उगम (तुंगा
उगम) वाचवा‘ आंदोलन का सुरू झाले?
उत्तर – सह्याद्री पर्वतातील तुंगा ही
प्रमुख नदी प्रदूषित होत असलेली पाहून तुंगा बचाव आंदोलन सुरू झाले.
2. ‘अप्पिको‘ चळवळ म्हणजे काय ?
उत्तर -सह्याद्री पर्वत रांगा मधील करणे
झाडे वाढविण्याच्या उद्देशाने त्यांचा होणारा नाश थांबविण्यासाठी भारतातील विविध
भागांमध्ये चिपको अथवा अप्पीको चळवळ सुरू झाली.
3. ‘सामाजिक वनीकरण‘ म्हणजे काय?
उत्तर – वनविभागाच्या वतीने निलगिरी,ताकेशी सारख्या किमती झाडांची लागवड करण्यास सुरुवात केली या योजनेला
सामाजिक अरण्य असे म्हणतात.
4. कर्नाटकच्या पहिल्या बी. ए. (ऑनर्स) पदवीधारक
महिला कोण होत्या ?
उत्तर – कर्नाटका च्या पहिल्या बी.ए.ओनर्स
महिला पदवीधर श्रीरंगम्मा आणि रुक्मिनेम्मा या होय.
II दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1.प्राचीन तलावाना
आम्ही का वाचविले पाहिजेत ?
उत्तर – आपल्या पृथ्वीवरील दगड,माती,हवा,पाणी, प्रकाश
या घटकांवर अवलंबून असणारे पशुपक्षी झाडे झुडपे आणि मानवासह इतर सर्व सजीव जगले
पाहिजेत.पृथ्वीवर नैसर्गिक समतोल आहे.येथे मानवाची नागरिक म्हणून वाढ होत असली तरी
माणूस आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी परिसराचा नाश करीत आहे.अशा पद्धतीने
परिसराचा नाश होत गेल्यास एक दिवशी मानवाचे जीवन धोक्यात येईल.त्यामुळे आपण
पर्यावरणाचे प्रदूषण थांबविले पाहिजे आणि पृथ्वीवरील सर्व घटकांना जीवन देण्याचे
काम आणि करते.असे पाणी प्राचीन तलाव,विहिरी,नद्या
त्यामार्फत सर्व घटकांना पोचविले जाते.म्हणून आपण प्राचीन तलावांना वाचविले
पाहिजे.
2.प्रमुख परिसर चळवळींची नावे लिहा.
उत्तर – प्रमुख परिसर चळवळींची नावे खालील
प्रमाणे-
*तुंगा बचाव आंदोलन चिपको अथवा अप्पीको
आंदोलन
*कारवारचा सी बर्ड बंदर विरुद्ध आंदोलन
*कब्बन पार्क बचाव
*कारवार सीड्स संस्थेविषयी आंदोलन
*औद्योगिक नगरांच्या विरुद्ध आंदोलन
*सेंद्रिय कृषी मिशन
3.दलित चळवळींची सुरुवात का झाली ?
उत्तर – वर्णव्यवस्थेत दलितांना स्थान
नव्हते.ते शूद्रातिशूद्र झाले होते. सामाजिक दृष्ट्या कोणतेच स्थान नसलेल्या
अस्पृश्य जातींमध्ये जन्म झाला.फक्त या एकाच कारणामुळे हा समुदाय समाजाच्या मुख्य
प्रवाहापासून बाहेर राहिला. या समाजाला भारतीय समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त
करून देण्यासाठी अनेक समाजसुधारक क्रांतिकारकांनी राजे यांनी पुढाकार
घेतला.त्यातूनच दलित चळवळीची सुरुवात झाली.
4.दलित चळवळीचे बिज मंत्र कोणते ?
उत्तर – शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा.हे दलित चळवळीचे बिज मंत्र होय.
सरावासाठी
अधिक प्रश्न -:
1.बेंगळूरूच्या
पहिल्या महापौर महिला कोण?
उत्तर -बेंगळुरूच्या पहिला महापौर महिला
इंदिरम्मा या होय.
2. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष कधी आचरणास सुरुवात
झाली?
उत्तर -आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आचरणास
इ.स. 1975
पासून सुरुवात झाली.
3.कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांचे पहिले आंदोलन कधी झाले?
उत्तर -कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांचे पहिले
आंदोलन 1951
मध्ये झाले.
4.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी
कर्नाटकामध्ये कोण कोणत्या संघटनांनी आवाज उठवला?
उत्तर -शेतकऱ्यांना न्याय मिळवून
देण्यासाठी कर्नाटकामध्ये कर्नाटक प्रांत रयत संघ,किसान सभा,दलित संघर्ष
समिती,
शेतकरी मजूर कामगार संघ इत्यादी संघटनांनी आवाज उठवला.
5.परिसर म्हणजे काय?
उत्तर – पृथ्वीवर असणारे सजीव व निर्जीव
घटक म्हणजेच परिसर होय.
- सहावी समाज विज्ञान भाग-1
- सातवी समाज विज्ञान भाग – 1
- सातवी समाज विज्ञान भाग – 2
- आठवी समाज विज्ञान
- नववी समाज विज्ञान भाग-1
- नववी समाज विज्ञान भाग- 2