NMMS exam Blood Relations नाते संबंध

8TH NMMS EXAM GMAT 

विभाग – GMAT  मानसिक योग्यता चाचणी 

NMMS परीक्षेसाठी महत्वाची माहिती व स्पष्टीकरणimageedit 4 5886582628

NMMS परीक्षेत नातेसंबंध या घटकावर प्रश्ने येतात त्यासाठी खालील कांही दिलेले नातेसंबंध यादी दिलेली आहे.ते पाठ करून अथवा सराव करून खालील उदाहारे सोडविण्याचा प्रयत्न करावा.
  

  •  माझ्या आई वडीलांचा मुलगा -: मी
  •  माझ्या आई वडीलांची मुलगी-: मी
  • आईचा भाऊ          -: मामा
  • वडिलांचा भाऊ,     -: काका
  • आईची बहिण        -: मावशी
  • आईचे किंवा वडिलांचे वडिल -:  आजोबा
  • आईची किंवा वडिलांची आई -:  आजी
  • वडिलांची बहिण    -: आत्या
  • मामाची पत्नी       -: मामी
  • काकाची पत्नी      -: काकू
  • मावशीचे पती / आत्याचे पती -: काका
  • मुलीचा नवरा जावई
  • मुलाची बायको     -: सून
  • नवऱ्याची
    बहिण
         -: नणंद
  • नवऱ्याचा भाऊ        : दीर 
  • भावाची बायको     -: भावजय
  • पती /
    पत्नीचे आईवडील
    -: सासूसासरे
  • पत्नीचा
    भाऊ / बहिण
         -: मेव्हणा / मेव्हणी
  • बहिणीचा नवरा     -: भाऊजी
  • काकाचा
    मुलगा / मुलगी
            -: चुलत
    भाऊ / बहिण
  • आत्याचा
    मुलगा / मुलगी
            -: आते
    भाऊ / बहिण
  • मामाचा मुलगा / मुलगी -: मामे भाऊ / बहिण
वरील नातेसंबंध समजून घेतल्यानंतर खालील स्पष्टीकरणासह दिलेली उदाहरणे पाहा व सराव टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा.

 

1)अनिता हरीशला म्हणाली, “माझी आई तुझ्या वडिलांची मुलगी आहे” तर तुझी आई माझ्या वडिलांची कोण ?
1) आई
2) सासू
3) आजी
4) आत्या

स्पष्टीकरण व उत्तर – 
    अनिताची आई – हरीशच्या वडिलांची मुलगी…..म्हणजे हरीश अनिताचा मामा.
    मामाची आई तिच्या वडिलांची – सासू
पर्याय  -: 2) बरोबर

2) मनोजचे वडिल हे हर्षदाचे मामा आहेत. तर मनोजची आई हर्षदाच्या आईची कोण?
1) बहिण
2) भाचा
3) वहिनी
4) मामी

स्पष्टीकरण व उत्तर – 
        मनोजचे वडिल हर्षदाच्या आईचे → भाऊ …
        
मनोजची आई हर्षदाच्या आईची – वहिनी
पर्याय 3) बरोबर 


3) P हे R चे वडील आहेत.S हा Q चा मुलगा आहे.T हा P चा भाऊ आहे.R ही S ची बहीण आहे.मग Q चे T शी नाते काय?
(अ) पत्नी
(ब) वहिनी
(क) दीर
(ड) सून

स्पष्टीकरण व उत्तर –  

imageedit 1 3650886954

4) गुप्तेदादा एका स्त्रीकडे पाहून म्हणाले, “हिची सासू माझ्या आईला सासूबाई म्हणते ” तर ती
स्त्री गुप्तेदादाची कोण
?
A)  मुलगी
B) पत्नी
C)  नात
D) सून 

त्या स्त्रीची
सासू गुप्तेदादाच्या आईला सासूबाई म्हणते म्हणजे…

त्या स्त्रीची सासू ही –
गुप्तेदादाची पत्नी असेल. ..

ती स्त्री गुप्तेदादाची
सून..

उत्तर : पर्याय (D) सून


नातेसंबंध या घटकाचा सराव चांगला व्हावा यासाठी खालील दिलेल्या लिंकवर स्पर्श करून आकर्षक ऑनलाईन टेस्ट सोडवा..

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *