इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – अर्थशास्त्र
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
31.श्रम आणि उद्योग
31.LABOUR AND EMPLOYMENT
1. रिकाम्या जागी
योग्य शब्द भरा.
1. अॅडम स्मिथचे प्रसिद्ध
पुस्तक द वेल्थ ऑफ नेशन्स आहे.
2. वेठबिगारी पद्धत बंद कायदा 1976
या वर्षी करण्यात आला.
3. जेव्हा एखाद्या श्रमाची उत्पादकता शून्य
असते.तेव्हा ती पद्धत छुपी बेरोजगारी म्हणून ओळखली जाते.
4. श्रम विभागणीमुळे कार्यक्षमता
वाढते.
5. बालकामगार पद्धत कायदा 1986
मध्ये अस्तित्वात आला.
2. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
1. श्रम विभागणी
म्हणजे काय ?
उत्तर – उत्पादन प्रक्रियेतील निरनिराळ्या
कामगारांकडे निरनिराळी कामे सोपविणे म्हणजे श्रम विभागणी होय.
2. बालकामगार पद्धत म्हणजे काय?
उत्तर – 14 वर्षाखालील मुलांकडून
मजुरीची कामे करून घेणे म्हणजे बालकामगार पद्धत असे म्हणतात.
3. बेकारीचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर – बाजारातील मजुरी दराप्रमाणे जो काम करू
इच्छितो पण त्या व्यक्तीस काम मिळत नाही तेंव्हा अशा परिस्थितीस बेरोजगारी
म्हणतात.
4. श्रम विभागणीचे फायदे स्पष्ट करा.
श्रम विभागणीने खालील फायदे होतात.
1. कार्यक्षमता वाढते.
2. उत्पादनाच्या प्रमाणात वाढ होते
3.उत्पादनात वाढ व गुणवत्तेत वाढ झाल्यामुळे
प्रचंड नफा होतो.
4. सरासरी खर्च कमी होतो.
5.वेगवेगळी नवीन उत्पादने निर्माण होतात.
5. श्रम विभागणीच्या तोट्यांची यादी करा.
उत्तर –
- कामाचा कंटाळा
- गुणवत्तेसाठी कोणालाही जबाबदार धरता येत नाही.
- कामगारांच्यात एकमेकांवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती
वाढते. - बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते.
- समाजात काम करणारे व काम न करणारे असे दोन वर्ग निर्माण होऊ
शकतात.
6. उत्पादक आणि पुनरुत्पादक श्रमाचा अर्थ स्पष्ट
करा.
उत्तर – जे श्रम केल्यामुळे उत्पन्न मिळते किंवा
उत्पन्न मिळविण्यासाठी ज्या श्रमाचा उपयोग होतो असे श्रम म्हणजे उत्पादक श्रम.
घरी करण्यात येणाऱ्या श्रमांना पुनरुत्पादक श्रम
म्हणतात.यालाच घरगुती श्रम असेही म्हणतात.
7. बेरोजगारीच्या प्रकारांची यादी करा.
उत्तर – बेरोजगारीचे प्रकार खालीलप्रमाणे -:
1. घर्षणात्मक बेरोजगारी
2. रोजंदारी बेरोजगारी
3. रचनात्मक बेरोजगारी
4. तांत्रिक बेरोजगारी
5. चक्रीय बेरोजगारी
6. दीर्घकालीन बेरोजगारी
8. छुपी बेरोजगारी आणि हंगामी बेरोजगारी यातील फरक
सांगा.
उत्तर –
छुपी बेरोजगारी | हंगामी बेरोजगारी |
1.काही कामगाराची उत्पादकता शून्य असते.तेंव्हा छुपी 2.गरजेपेक्षा जास्त कामगार काम करतात. 3.कृषी क्षेत्र किंवा ग्रामीण भागात छुपी बेरोजगारी जास्त | 1.जेंव्हा हंगाम संपतो तेंव्हा हंगामी बेरोजगारी होते. 2.वर्षातील कांही काळ कामगार काम करतात. 3.कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग साखर कारखाना,भात,गिरण्या येते आढळते. |