9TH SS 32.MARKETING MANAGEMENT (बाजाराचे व्यवस्थापन )

कर्नाटक राज्य अभ्यासक्रम

imageedit 1 9063932924

Karnataka Textbook Society 

इयत्ता – नववी

विषय – समाज विज्ञान

विभाग – व्यवहार अध्ययन

सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार

प्रकरण – 32. बाजाराचे व्यवस्थापन 

स्वाध्याय
1. योग्य शब्द भरून रिकाम्या जागा पूर्ण करा.

2. सामान्यपणे विक्रेते आणि खरेदी करणारे वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी जेथे जमतात त्या जागेस बाजार म्हणतात.

2. एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात जो बाजार भरला जातो त्यास स्थानिक बाजार म्हणतात.

3.खरेदी आणि विक्री बाजार नियमित बाजार या कायद्याद्वारे नियंत्रित केले जातात.

4.उत्पादनाची वेळ आणि विक्रिची वेळ यामध्ये वस्तू जेथे साठवून ठेवतात त्या जागेस साठाग्रह किंवा वखार म्हणतात.

5. ग्राहकांनी उत्पादित केलेल्या वस्तू विकत घ्याव्यात. म्हणून ज्या क्रिया केल्या जातात त्यास वाढीचे मिश्रण म्हणतात.

6. उत्पादकाकडून प्रत्यक्षरित्या ग्राहकाला मिळणारी वस्तू याचे उत्तम उदाहरण म्हणजे थेट विक्री

7. उत्पादनाची व्यापारी खूण त्या गठ्यावर उमटवलेली असते.त्यातून विक्रेत्याची ओळख सूचित होते.

8. वस्तूच्या गुणवत्तेच्या दर्जाची खात्री ग्राहकाला मिळते त्यास वर्गीकरण म्हणतात.

2. खालील प्रश्नांची एक किंवा दोन वाक्यात उत्तरे द्या.
1. भौगोलिक दृष्ट्या आधारित बाजाराचे चार प्रकार कोणते ?
उत्तर –भौगोलिक दृष्ट्या आधारित बाजाराचे चार प्रकार खालीलप्रमाणे –
1.स्थानिक बाजारपेठा
2.प्रादेशिक बाजारपेठा
3.राष्ट्रीय बाजारपेठा
4.आंतरराष्ट्रीय बाजारपेठा

2. मनी मार्केट म्हणजे काय? कॅपिटल मार्केट पेक्षा ते कसे वेगळे आहे?
उत्तर – मनी मार्केट हा एक आर्थिक बाजार आहे जेथे व्यावसायिक संस्थांसाठी अर्थपुरवठा,खरेदी व विक्री केली जाते.
मनी मार्केट मध्ये अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो तर कॅपिटल मार्केटमध्ये दीर्घकालीन कर्ज पुरवठा केला जातो.

3. विक्रेत्यांची बाजारपेठ म्हणजे काय? ग्राहकांची बाजारपेठ म्हणजे काय ?
उत्तर – जेथे पुढील उत्पादन प्रक्रियेसाठी वस्तू खरेदी केल्या जातात त्याला विक्रेत्यांची बाजारपेठ म्हणतात. तर जेथे ग्राहक वैयक्तिक वापरासाठी वस्तू खरेदी करतात त्याला ग्राहकांची बाजारपेठ म्हणतात.
4. स्थानिक बाजारपेठ म्हणजे काय ? भविष्यकालीन बाजारपेठापेक्षा हे वेगळे कसे आहे?
उत्तर – जेथे जागच्या जागी वस्तूचा व्यवहार होतो त्याला स्थानिक बाजारपेठ म्हणतात.
स्थानिक बाजारपेठेत जागच्या जागी वस्तूचा व्यवहार होतो तर भविष्यकालीन बाजारपेठेत पैसे अगोदर घेऊन वस्तूचा पुरवठा कांही दिवसांनी केला जातो.
5. अपारंपारिक बाजारपेठचे चार प्रकार वर्णन करा.
उत्तर – अपारंपारिक बाजारपेठचे चार प्रकार
1.पोस्ट ऑफिसमधून विक्री करणाऱ्या संस्था (Mail order Houses)
2. दूरस्थ व्यापार (Tele Shopping)
3.प्रस्ताविक दुकाने (Virtual Shops)
4.रोज व्यवहार बदलणाऱ्या बाजारपेठा (Catalogue Market)
5.अंतरजाळे बाजारपेठा (Online Market)
6. विक्री व्यवस्थापनाचे मिश्रण म्हणजे काय?
उत्तर – विक्री व्यवस्थेच्या पद्धतीची मांडणी आणि या पद्धती अमंलात आणणे, यालाच विक्री व्यवस्थापनाचे मिश्रण म्हणतात.
7. ग्राहक संरक्षणाची गरज का आहे?
उत्तर –शोषण,फसवणूक, उत्पादन व व्यापारात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षणाची गरज आहे.
8. वस्तूंचे व्यापारी चिन्ह खूण म्हणजे काय?
उत्तर –वस्तूंचे व्यापारी चिन्ह खूण म्हणजे विक्रेत्याची ओळख होय . वर्तुळात R या अक्षराने ही खूण दर्शवली जाते.
3. खालील प्रश्नांची आठ ते दहा वाक्यात उत्तरे लिहा.
1. विक्री व्यवस्थापनाची कार्ये सांगा.त्यापैकी कोणतेही एक कार्य स्पष्ट करा?

उत्तर –
1. खरेदी आणि एकत्रीकरण (Buying and Assembling)
2. विक्री (Selling)
3. वाहतूक व्यवस्था (Transportation)
4. साठाग्रह आणि वखार (Storage and Ware housing)
5. बाजार संशोधन (Marketing Research)
6. प्रमाणीकरण आणि प्रतवारीकरणे (Standardisation)
7. वर्गीकरण (Grading)
8. व्यापाराची खूण (Branding)
9. विमा (Insurance)
विक्रीः विक्रत्याकडून खरेदीदार पर्यंत योग्य विक्रीची वस्तू व्यवस्थित ठेवणे व त्यांना नफ्यासह हस्तांतरित करतात.
2. विक्री व्यवस्थापन मिश्रणाचे घटक कोणते? त्यापैकी एकावर टिपा लिहा ?

उत्तर – 
1) उत्पादनाचे मिश्रण
2) किंमतीचे मिश्रण
3) वाढीचे मिश्रण
4) जागेचे मिश्रण
हे विक्री व्यवस्थापन मिश्रणाचे घटक आहेत.
3)वाढीचे मिश्रण (Promotion): यालाच दळणवळणाचे मिश्रण असेही म्हणतात.जाहिरात,विक्रेत्याचे कौशल्य, विक्री वाढ,प्रसिद्धी हे घटक यात येतात.थोडक्यात ग्राहकांनी वस्तू खरेदी करावी म्हणून करावी लागणारी प्रक्रिया म्हणजे वाढीचे मिश्रण होय.

3. विक्री व्यवस्थापनाचे महत्त्व काय ? राहणीमानाचा दर्जा आणि नोकरीच्या संधीमध्ये त्यांची कशी मदत होते?

उत्तर – ग्राहकांचे समाधान होते आणि उत्पादनात वाढ होते. नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.म्हणून विक्री व्यवस्थापनाला महत्व आहे.
    विक्री व्यवस्थापनामुळे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने आणि सेवांची उपलब्धता आणि उपभोग यावर राहणीमानाचा दर्जा वाढतो आणि ब-याच समस्या विक्री व्याव प्रक्रियेत गुंतलेल्या आहेत.या संस्था म्हणजे घाऊक विक्रेते,किरकोळ विक्रेते,वाहतुकीची सेवा पुरविणाऱ्या संस्था,बँक,विमा, वस्तू पुरवठा करणाऱ्या या संस्था इत्यादी.या सर्व संस्थांम ध्ये अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
*┈┉━❀SmartGuruji❀━┉┈*






 



 

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now