कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
Karnataka Textbook Society
इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – अर्थशास्त्र
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 30.पैसा आणि कर्ज
1. रिकाम्या जागा भरा.
1. भारतीय
रुपया रुप्या पासून घेतलेला आहे.
2. चेक ही बँक मनी (बँक
पैसा) ची व्यवस्था आहे.
3. ज्या बँका परकीय चलन व्यवहार करतात,अशा बँकांना विनिमय बँका म्हणतात.
4. भारतीय रिझर्व बँकेची स्थापना 1935 या वर्षी झाली.
5. जपानच्या पैशाला येन
म्हणतात.
6. भारत सरकारने 14 व्यापारी बँकाचे 1969 यावर्षी राष्ट्रीयीकरण केले.
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. वस्तुविनिमय पद्धत म्हणजे
काय ?
उत्तर – वस्तुविनिमय
पद्धत ही एक अशी प्रणाली आहे जिथे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करण्याचे माध्यम
म्हणून पैसे न वापरता इतर वस्तू आणि सेवांसाठी थेट देवाणघेवाण केली जाते.
2. पैशाचा अर्थ सांगा.
उत्तर – जे
देवाणघेवाणीचे एक माध्यम आहे व ज्याच्यापासून वस्तू व सेवा विकत घेता येतात.त्याला
पैसे म्हणतात.
3. भारताची केंद्रीय बँक कोणती?
उत्तर – भारताची
केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)
आहे.
4. पैशाची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर – पैशाचे
प्राथमिक कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम आणि वस्तू व सेवांचे मूल्य करणे. भविष्यात
रक्कम फेडता येणे, मूल्य संग्रह करणे यासारखी पूरक कार्ये पैशाने केली जातात.
याशिवाय भांडवलाच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी पैशांची मदत होते.
5. बँकाचे निरनिराळे प्रकार सांगा.
उत्तर – औद्योगिक
बँका,विनिमय
बँका, बचत बँका, सहकारी
बँका,जमीन तारण
बँका, व्यापारी
बँका इत्यादी बँकाचे प्रकार आहेत.
6. भारतीय रिझर्व बँकेची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर – रिझर्व्ह
बँक ऑफ इंडिया (RBI) खालील प्रमुख कार्ये करते.
1.₹ 5, ₹10, ₹100, ₹500, ₹2000 च्या
भारतीय चलनी नोटा व्यवहारात आणणे.
2. केंद्र व राज्य सरकारच्या ठेवी स्वीकारणे.
3. देशातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणे.
4. बँकांचे व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी क्लिअरिंगचे
काम करणे.
5. पत धोरणावर नियंत्रण ठेवते.