9TH SS 24.SOCIALISATION AND FAMILY RELATIONSHIPS (सामाजिकीकरण आणि कौटुंबिक नातेसंबंध )

 

imageedit 2 6110217497

 

राज्य – कर्नाटक

इयत्ता – नववी

विषय – समाज विज्ञान

विभाग – समाजशास्त्र 

सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार

प्रकरण – 24.सामाजिकीकरण आणि कौटुंबिक नातेसंबंध

स्वाध्याय

1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. मानव प्राण्याला समाजशील प्राणी बनविण्याच्या प्रक्रियेला सामाजिकीकरण म्हणतात.
2.
आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते.
3.
सामाजिकीकरण मुळे बालकांची मने कळीप्रमाणे हळूवार विकसित होतात.

2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1.
सामाजिकीकरणामध्ये समवयस्कांच्या भूमिकेबद्दल चर्चा करा.

उत्तर –समवयस्क देखील सामाजिकीकरणासाठी हातभार लावणारे मुख्य घटक आहेत. वर्ग मित्रमैत्रीणी खेळातील सवंगडी किंवा मित्र यामध्ये मोडतात.समवयस्क समुहातील सदस्य एकाच वयाचे असल्याने पालक किंवा शिक्षकांकडून ज्या गोष्टी शिकू शकत नाहीत,त्या या सदस्याकडून शिकवल्या जातात.
2.
कौटुंबिक वातावरणात मुले कोणती मूल्ये शिकतात?

उत्तर  कौटुंबिक वातावरणात, मुले प्रेम,आपुलकी, विश्वास,संयम ,दयाळूपणा,सहकार्य, शिस्त, नैतिक  तत्त्वे आणि सामाजिक नियम यांसारखी मूल्ये शिकतात.पालक त्यांच्या वर्तनातून, परस्पर संवादातून आणि मार्गदर्शनाद्वारे ही मूल्ये शिकवतात.
3.
सामाजिकीकरणात धर्माची भूमिका काय असते ?

उत्तर
  सामाजिकीकरणाच्या
प्रक्रियेत धर्माची भूमिका महत्वाची असते.सामाजिक जिवनाचा पाया दृढ करण्याचे कार्य
धर्म करतो.धर्मामध्ये नैतिकतेच्या मार्गावरून जीवन व्यतीत करणयाचे शिक्षण दिले
जाते.धार्मिक श्रद्धा
, पालक,
नातेवाईक व ज्येष्ठ यांच्या सोबतीने धार्मिक स्थळाला दिलेली
भेट (तीर्थयात्रा) यांचे मुले निरीक्षण करतात. सणवार
, यात्रा, धार्मिक सण या कार्यक्रमात सहभागी झाल्यामूळे दानशुरपणा,
सेवाभाव, समाजसेवेची वृत्ती इ. गोष्टी विकसीत होतात.
4.
सामाजिकीकरणाचे महत्व काय?

उत्तर – सामाजिकीकरणाचे महत्व सांगणारे कांही घटक खालीलप्रमाणे :
मानवाला समाजशील होण्यास सहाय्यक होते.
व्यक्तीमत्वाचा विकास होतो.
जीवनात शिस्त येते.
वेगवेगळी जीवनावश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्राप्त होते.
समाजातील भेदभाव (अंतर) कमी केले जाते.
उज्वल भविष्याला आकार निर्माण करण्याची संधी मिळते.
संस्कृती,परंपरा सतत पुढे जपण्यासाठी सहाय्य होते.
सामाजिक व्यवस्था सुरक्षित राखली जाते.
5.
सामाजिकिकरणाच्या प्रक्रियेत शिक्षक कोणती भूमिका निभावतात ?

उत्तर –   शाळा हा सामाजिकीकरणा महत्त्वपूर्ण घटक आहे.कारण शाळा औपचारिक शिक्षण देतात, मुलांची वर्तणूक,ज्ञान,चारित्र्य आणि दृष्टीकोन यांना आकार देतात.विद्यार्थ्यांची मूल्ये आणि वर्तन घडवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते.शाळेत मुलांना विविध अनुभव,कल्पना आणि कलागुणांचे
अनुभव येतात त्यामुळे
समाजातील त्यांच्या भूमिकांसाठी विद्यार्थी तयार होतात.
6.
आधुनिक समाजात प्रसारमाध्यमे सामाजिकीकरणास कशा प्रकारे सहाय्य करतात ?
उत्तर –   टेलिव्हिजन, चित्रपट, वृत्तपत्रे आणि इंटरनेट यासारखी प्रसारमाध्यमे आधुनिक समाजातील मूल्ये आणि वर्तणूक घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.प्रसारमाध्यमांचा दैनिक जीवनावर प्रभाव पडतो. दूरदर्शन, चित्रपट, नाटक, वृत्तपत्रे, रेडिओ ही प्रसार माध्यमे साहित्याचा उपयोग आणि सादरीकरण प्रभावीपणे करून सामाजिकीकरणास मदत करतात. याच बरोबर शैक्षणिक दृष्टीकोनातून महत्वाचे कार्यक्रम नवीन स्थळे, शोध, संशोधन याबद्दल माहिती देत व्यक्तिच्या विकासाला सहाय्यक ठरतात.

*इयत्ता – आठवी*

 

*विषय – समाज विज्ञान*

 

*सत्र -2*

 

*प्रश्नोत्तरे*

 

*7.मौर्य आणि कुशाण घराणे*

 

 

*8.गुप्त आणि वर्धन घराणे*

 

 

┈┉━❀❀❀❀❀❀❀━┉┈

 

*Please Subscribe Our YouTube Channel -*

 

 

*┈┉━❀SmartGuruji❀━┉┈*

 





Share with your best friend :)